Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आरक्षणाशी निगडीत काही संदर्भ २.०

ब
बार्नी
Sat, 02/24/2018 - 20:09
💬 62 प्रतिसाद
आधीचा धागा भारतातील आरक्षणावर खासगीत आणि आंतरजालावर बरीच चर्चा केली जाते , परंतु बर्याचदा चुकीच्या माहितीच्या आधारावर ह्या चर्चा चालतात म्हणूनच आरक्षणाविरोधातील काही चुकीच्या युक्तिवादांना उत्तर देण्यासाठी केलेला हा प्रयत्न. १) आजकाल कुणीही जातपात पाळत नाही. परंतु खालील सर्व्हे बघता अजूनही भारतात जातीव्यवस्था अस्तित्वात असल्याचे आढळते . शहरांमध्ये सुदधा . "Going by respondents’ admissions, untouchability is the most widespread among Brahmins, followed by OBCs. Among religious communities, it is the most widespread among Hindus, Sikhs and Jains, shows the survey, which was conducted in over 42,000 households across India by the National Council of Applied Economic Research (NCAER) and the University of Maryland, US." IHDS Biggest caste survey: One in four Indians admit to practising untouchability २) लग्नामध्ये आजकाल कुणी जात बघत नाही , शहरांमध्ये तर मुळीच नाही . परंतु केवळ ५ टक्के लग्न ही आंतरजातीय होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सुशिक्षित असल्याचा कितीही आव आणला तरीही लग्नाच्या वेळी जात बघणे अजुनही थांबलेले नाही . marriage Just 5% of Indian marriages are inter-caste: survey Inter-caste Marriages in India: Has it really changed over time? ३) सर्व सरकारी नोकर्या "ह्यांनी " खाऊन टाकल्या आहेत. परंतु खालील माहिती बघता , SC /ST प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येते . विशेषतः वरच्या पोस्ट्स मध्ये तर हे प्रमाण अगदीच कमी दिसून येते. jobs खालील डेटा जर बघितला तर शिक्षणामध्येही हा वर्ग मागेच असल्याचे दिसून येते. education ४) पण.... पण ... प्रायव्हेट सेक्टर मध्ये फक्त मेरीट पाहिजे तिथे जात - बीत कुणी पाळत नाही ... फक्त गुणवत्ता पाहिजे . परंतु खालील सर्वे नुसार खाजगी क्षेत्रही काही वेगळे नसल्याचे दिसून येते. " This field experiment study of job applications observed a statistically significant pattern by which, on average, college-educated lower-caste and Muslim job applicants fare less well than equivalently-qualified applicants with high caste Hindu names, when applying by mail for employment in the modern private-enterprise sector. The only aspect of family background that was communicated in these applications was the applicant’s name, yet this was enough to generate a different pattern of responses to applications from Muslims and Dalits, compared to high caste Hindu names. These were all highly educated and appropriately qualified applicants attempting to enter the private sector, yet even in this sector, caste and religion proved influential in determining one’s job chances." "The study findings suggest that social exclusion is not just a residue of the past clinging to the margins of the Indian economy, nor is it limited to people of little education. On the contrary, it appears that caste favouritism and the social exclusion of Dalits and Muslims have infused private enterprises even in the most dynamic modern sector of the Indian economy" Urban labour market discrimination ५) पण आमच्या पूर्वजांच्या चुकांची शिक्षा आम्हाला का? वरील युक्तिवाद ऐकला की मला खालील कॉमिक ची आठवण येते . racism तुमच्या पूर्वजांनी चुका केल्या हे मान्य परंतु तुमच्या पूर्वजांकडून तुम्ही जी संपत्ती , जमीन , ज्ञान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जो "Privilege " inherit केला त्यांचं काय ? तो तुम्ही सोडायला तयार आहे का ? "It isn't about me being privileged compared to others from my caste in villages, it is about me having to struggle the most among the people who had a similar upbringing. Even though I went to an good school and lived in a good neighbourhood, we were the only tenants, my parents were the least educated among them and we were the only ones who didn't have any property to speak of. Everyone else in that neighbourhood, didn't have to worry about these. They had enough connections to get to the places they wanted to, had enough property which allowed them to take admission to the best colleges around the world and explore the best academic avenues. This is what privilege is. " And further claiming that reservation is inequality is like breaking the legs of a man and then challenging him to run a race by saying that- "Ok well, I know that you have been treated unfairly in the past but from today lets end all the discrimination. I won't beat you anymore. Let's run a race together, fairly" काही दुवे: Talking Discrimination and School Dropout Rates in India Why Reservations? | Yogendra Yadav | TEDxAIIMS Hidden Apartheid Caste Discrimination against India’s “Untouchables”

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 13436 views

💬 प्रतिसाद (62)
म
माहितगार Wed, 02/28/2018 - 08:15 नवीन
चर्चांमध्ये सर्व लक्ष अर्जदारांसाठीच्या आरक्षणावर केंद्रीत होते वस्तुतः निवड समिती हि वेल रिप्रेझेंटेड असेल आणि विविध जातींना रोटेशन नी संधी निवड समितीतून मिळाली तर समान संधी ची शक्यता आपसूक वृद्धींगत व्हावी पण .... आंतरजातिय आणि आंतर धर्मीय विवाह करणार्‍यांच्या संततीला आरक्षणत खरे तर प्राधान्य असावयास हवे पण तसे होतन्ना दिसत नाही. अजून एक मुद्दा आहे पण ३ --- --- २ वर चर्चेत उत्सुकता दाखवल्या गेल्या शिवाय मांडण्यात पॉईंट नाही.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Wed, 02/28/2018 - 12:00 नवीन
प्राधान्य देणार म्हणजे नेमके काय करणार ? तिसरी अजुन एक रिजर्वेशन लिस्ट बनवणार ?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 02/28/2018 - 12:33 नवीन
मला वाटते आंतरधर्मीय -जातीय विवाहीतांच्या संततीस सध्या वडीलांची जात लावून आरक्षणासाठी स्विकारले अथवा नाकारले जाते (चुभूदेघे) पद्धत तीच ठेवावी पण ज्या त्या आरक्षीत कॅटेगरीत प्राधान्य मिळावे , केवळ वडील ओपन मध्ये असतील अशा पाल्यांना ओपन मधले प्राधान्य देण्याचा विचार व्हावयास हवा. यातील क्रिमीलेयर ला आरक्षणातून टाळण्यास हरकत नसावी. खरेतर क्रिमीलेयर नसलेली सर्वसामान्य आंतरधर्मीय -जातीय विवाहीत कुटूंबांची स्थिती ना घरके ना घाटके अशी सर्वाधीक वाईट असते. दुसरे सध्याची आरक्षण पद्धतीचे ध्येय जाती अंत असूनही जाती अंत करणार्‍या सर्वाधिक महत्वाची आंतर-जातीय आंतरधर्मीय विवाहाची जोखीम उचलणार्‍या सामाजिक प्रगतीशईल एवढे मोठे पाऊल उचलणार्‍यांच्या साठी सध्या सबस्टँशीअल इन्सेंटीव्हचा अभाव आहे. क्रिमीलेयर नसलेली सर्वसामान्य आंतरधर्मीय -जातीय विवाहीत कुटूंबांची पाल्यांना सध्याची स्थिती अनाथ मुलांच्या खालो खाल असावी. बाकी अनाथ मुलांना कोणते आरक्षण मिळते याबद्दल अनभिज्ञ आहे या निमीत्ताने जाणकारांनक्डून माहिती घेणे आवडेल.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Wed, 02/28/2018 - 12:36 नवीन
नव्या कायद्यानुसार , वडील ओपन व आई मागासवर्गीय , अशा मुलाला आईच्या जातीनुसार रिझर्वेशन बेनेफिट घेता येतो
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ गुरुवार, 03/01/2018 - 12:23 नवीन
नाही केवळ वडील ज्या जातीचे आहेत त्याच जातीचे लाभ मुलाला मिळतात.
  • Log in or register to post comments
ए
एमी गुरुवार, 03/01/2018 - 13:44 नवीन
maanguच बरोबर आहे. आता आईची जातदेखील लावता येते मुलांना. In a judgment defining the right of children born out of inter-caste marriages, the Supreme Court on Wednesday ruled that the benefits of affirmative action or reservation could not be denied to a person born to a scheduled caste or scheduled tribe mother merely because the father belonged to the upper caste .
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com गुरुवार, 03/01/2018 - 15:45 नवीन
This is recent judgement .
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Sun, 03/04/2018 - 09:21 नवीन
It is not implemented at govt procedure. Can you show me any government resolution regarding this.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 03/04/2018 - 15:41 नवीन
आता गुगलले तर हे मिळाले. http://mr.upakram.org/node/3779
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Sun, 03/04/2018 - 19:11 नवीन
असं गुगलुन नाही चालणारं सरळ सरळ शासन निर्णय दाखवा. अजुनही पित्याचीच जात मुलाला लागु होते. अन्यथा खुप गोंधळ उडेल. तज्ञ लोकांनी यावर खुप उहा पोह केलेला आहे. बघा शासन निर्णय मिळतो का.
  • Log in or register to post comments
ए
एमी Fri, 03/02/2018 - 01:39 नवीन
तुमच्या प्रतिसादातल "आंतरधर्मीय -जातीय विवाहीतांच्या संततीस सध्या वडीलांची जात लावून आरक्षणासाठी स्विकारले अथवा नाकारले जाते" हे वाक्य चुकीचं असलं तरी बाकी प्रतिसाद विचार करण्यासारखा आहे. • ओपनमधेदेखील 'कोणालातरी' प्राधान्य देण्यास तुमचे समर्थन आहे. • त्यात परत क्रिमी, नॉनक्रिमी भेद करायला तुमची हरकत नाही. या दोन मुद्दयांसाठी Like! खरेतर क्रिमीलेयर नसलेली सर्वसामान्य आंतरधर्मीय -जातीय विवाहीत कुटूंबांची स्थिती ना घरके ना घाटके अशी सर्वाधीक वाईट असते. दुसरे सध्याची आरक्षण पद्धतीचे ध्येय जाती अंत असूनही जाती अंत करणार्या सर्वाधिक महत्वाची आंतर-जातीय आंतरधर्मीय विवाहाची जोखीम उचलणार्या सामाजिक प्रगतीशईल एवढे मोठे पाऊल उचलणार्यांच्या साठी सध्या सबस्टँशीअल इन्सेंटीव्हचा अभाव आहे. क्रिमीलेयर नसलेली सर्वसामान्य आंतरधर्मीय -जातीय विवाहीत कुटूंबांची पाल्यांना सध्याची स्थिती अनाथ मुलांच्या खालो खाल असावी. >> हेदेखील विचार करण्यासारखं आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 02/28/2018 - 10:27 नवीन
संदर्भार्थ दिलेला कॉर्पोरेट मधील जाती प्राधान्यता शोध अभ्यासण्याचा प्रयत्न रिपोर्ट आणि उद्देश चांगला असला तरी खूपच सिंप्लीफाईड वाटला. कॉर्पोरेट मध्ये समस्या नाहीतच असे नाही पण त्याच्या सविस्तर अभ्यासास वेगळ्या दृष्टीची आणि कॉर्पोरेट फक्शनईंगची जाण असलेले अभ्यासकाची सोबतीची गरज होती असे वाटून गेले. २००५ पर्यंत इंटरनेट आणि प्लेसमेंट सर्वीसेसचे प्राबल्य बर्‍यापैकी वाढलेले होते सोबतीने त्याचाही वापर करणे शक्य असावे पण का कोण जणे अभ्यासक वृत्तपत्रीय नौकरीच्या जाहीरातींवर अवलंबून राहीलेले दिसतात. वॉक ईन इंटर्व्ह्यू सुद्धा होत असतात त्यातून बाहेर आलेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेणे शक्य असते ते झालेले दिसत नाही. कॉर्पोरेटची एंट्री लेव्हल(सवर्णांसाठी सुद्धा) प्रॉब्लेमॅटीक आहे. उपरोक्त सर्वे मध्ये केवळ १० टक्के अर्जांनाच कॉल आले म्हणजे ९० टक्के अर्जदार बाजूस पडतात मग जत कोणतीही असो किंवा संधीची प्रोबॅबिलीटी १० टक्केच उरते अर्थात हे वृत्तपत्रिय जाहीरातींबद्दल झाले . पण डमीच अर्ज पाठवायचे तर जाहीरातीत सांगितलेल्या सर्व अटींची पुर्तता असल्याचे दाखवून अ‍ॅप्लिकेशन कितपत परफेक्टली पाठवल्या गेल्या या बद्दल तरीही साशंकता वाटते कारण केवळ १० टक्के रिस्पॉन्स हवे ते क्लेम करण्याच्या संधी असलेल्या डमी अर्जांना पाहता फार कमी वाटतो. हे तिन्ही अभ्यासक बहुधा नॉन टेक्निकल होते (चुभूदेघे) त्यांनी टेक्निकल रिक्वायरमेंट असलेल्या जाहीराती करताचे अर्ज कितपत नेटके पणाने लिहिता आले असतील या बद्दल साशंकता वाटते. कॉर्पोरेट मध्ये स्कीलसेट , अनुभव , आणि क्लास म्हणजे सॅलरी जस्टीफाय करण्याची सिद्ध केलेली क्षमता या अर्थाने यांच्याशी सहसा तडजोड केली जाताना दिसत नाही हे क्रायटेरीया सांभाळून जात पहाता आली तर पाहिली जात असावी ते ही मॅनेजमेंटच्या मिडल लेव्हल कडून . भारतीय कॉर्पोरेट मधील टॉप मॅनेजमेंटमध्ये स्थानिक बहुसंख्य नसतात किंवा असले तरी कमी असतात. स्थानिकाम्च्या जाती पातीचे त्यांना फार पडलेले असण्याचे कारण नाही पण मिडल मॅनेजमेंटला अशा बाबतीत स्कीलसेट , अनुभव , आणि क्लास आणि प्रॉफीटॅबिलीटीची शक्यता सांभाळलि गेल्यास बाकी क्रायटेरीआत अधिक स्वायत्तता लाभू शकत असावी. पण एकदा का एंट्री लेव्हल पार केली की नेटवर्कींगचा लाभ उठवत टॉप मॅनेजमेंट पर्यंत ओळखीने पोहोचून स्वतःची वर्णी लावून घेतल्या जात असताना जातीय प्रादेशिक आणि धार्मीक प्रभावांना आपोआपच काटशाह मिळत जाते कारण टॉप मॅनेजमेंटला शेवटी प्रॉफीटशी मतलब असतो. सर्वात महत्वाचे म्हणजे जसे सरकारी क्षेत्रात निवड समिती बहुविध असल्याची खात्री केल्यस संधीची समानता निर्माण करता येणे शक्य असावे तसे कॉर्पोरेटच्या बाबतीत भांडवली शेअर मध्येच वंचितांना हिस्सा दिला आणि टॉप मॅनेजमेंट सोबत सामावले जाण्याची संधी दिली की खाली समान संधी ची शक्यता आपसूक वाढेल त्यासाठी आरक्षणाच्या पायंड्याची गरज असेलच असे नसावे. सरते शेवटी उपरोक्त रिपोर्टच्या अभ्यासकांनी रिपोर्टच्या प्रिंटींग्ग साठी एखाद्या धार्मिक संस्थेची आर्थीक मदत घेण्याचे प्रयोजन पुरेसे पटले नाही. त्यामुळे इतरेजनांना रिपोर्टच्या तटस्थते बाबत शंका घेण्यास हकनाक जागा निर्माण होते हे अभ्यासकांनी लक्षात घेऊ नये याचे अल्पसे आश्चर्य वाटले.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 17 hours ago
  • सुंदर !!
    5 days 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा