Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

भावनांचा मेळ

प — प्रणया, Fri, 02/23/2018 - 01:13
जपून खेळायचे असतात शब्दांचे खेळ चुकतो ठोका हृदयाचा जेव्हा त्यात घालताच येत नाही भावनांचा मेळ जर नेहमीच मन हलके शब्दांनीच केले असते अंतरीच्या अबोल भावनांचे अर्थ नयनांच्या भाषेने कोणी सांगितलेच नसते म्हणे रुचतात गोड बोल, सात्विक चेहेरे मनाला सर्वांत आधी पण प्रेम तर त्यावरही करतो ज्याला पहिलेच नाही कधी गमावलेल्या गोष्टी शोधण्यातच आनंदाचे गुपित जर दडलेले असते जे नव्हतेच कधी आपले ते शोधण्यासाठी जीव झुरलेच नसते वाटते सोबत सर्वांना असावी प्रियजनांची नेहमी दुःखच विरहाचे स्वप्नांतही नकोसेच असते जर रोजच चांदण्यांचा साथीने चंद्रप्रकाशाने मनास न्हाऊ घातले असते तर सांगा ना तेव्हा कलेकलेने वाढलेल्या पुनवेच्या चांदव्यास औक्षण कोणी केले असते ? - प्रणया

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1913 views

💬 प्रतिसाद
प
प्रणया Fri, 02/23/2018 - 01:18 नवीन
हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तरी चु. भू. द्या. घ्या.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 02/23/2018 - 07:44 नवीन
कवितेला जरा लय किंवा मीटर देता आले तर अजून चांगली होईल. पुलेशु! Sandy
  • Log in or register to post comments
प
प्रणया Fri, 02/23/2018 - 14:54 नवीन
प्रतिसादासाठी धन्यवाद. मी प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sun, 02/25/2018 - 06:36 नवीन
आशय छान आहे !! अजुन येऊ द्या !!
  • Log in or register to post comments
प
प्रणया Tue, 02/27/2018 - 16:01 नवीन
धन्यवाद, नविन कविता लवकरच प्रकाशित करेन
  • Log in or register to post comments
द
देशप्रेमी Tue, 02/27/2018 - 16:11 नवीन
छान आहे. भावनांचा सुरेख मेळ..
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 20 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 21 hours ago
  • सुंदर !!
    2 days 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा