Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

एसटी कार्यशाळा भेट-चिखलठाणा औरंगाबाद

आ
आलमगिर
Wed, 02/21/2018 - 05:31
💬 51 प्रतिसाद
नमस्कार मिपाकर मंडळी , आज थोड्या वेगळ्या विषयावर लिहिणार आहे. दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ रोजी एसटी लव्हर्स ग्रुप तर्फे केंद्रीय बस बांधणी आणि दुरुस्ती कार्यशाळा चिखलठाण औरंगाबाद ला दिलेल्या भेटीचा हा वृत्तांत. औरंगाबाद शहराबाहेर सिडको बस स्टॅन्ड वरून बाहेर पडला कि चिखलठाना मध्ये आपल्याला दिसते ती एसटीची विभागीय कार्यशाळा. एसटीच्या प्रचंड कारभाराची ती जणू प्रतिनिधीच. ह्याच कार्यशाळेत आम्ही म्हणजे MSRTC LOVERS GROUP च्या सदस्यांनी भेट दिली. कार्यशाळेमध्ये असलेल्या विविध विभागांची माहिती आपण आता घेऊ. ०१: दुरुस्ती विभाग:- कार्यशाळेत शिरताच प्रथम दिसतो दुरुस्ती विभाग. एसटीच्या शहर बस आणि इतर अनेक बस गाड्या ( शहर बस-४० , हिरकणी-७४ , शिवनेरी-१४ , साधी-८० परिवर्तन-८० , यशवंती-४ शिवशाही-८) ह्यांची देखभाल दुरुस्ती होते. टायर ६०००० किमी नंतर बदलले जातात. औरंगाबाद १ आणि २ आगार च्या सर्व बसेस येथेच दुरुस्ती साठी आणि आर.सि. साठी येतात. महाराष्ट्र राज्य परिवहन आपल्या बस चा पुरेपूर उपयोग कसा करते ते आपण पाहू. समजा एखादी हिरकणी सलग ८ वर्षे चालवली जाते. त्यानंतर ती दापोडी , औरंगाबाद अथवा नागपूर ह्या विभागीय कार्यशाळेत आणली जाते. मग त्या गाडीचे रुपडे पूर्ण बदलून म्हणजेच आर.सी ( Reconstruction) करून पहिले परिवर्तन आणि मग शेवटी ती बस अजून ४/५ वर्षांनी भंगारात काढली जाते. ०२:इंजिन विभाग:- एंजिने विभाग म्हणजे बस चे हृदय. भारत-दोन स्टेज ची एंजिने मग ती अशोक लेलँड असोत अथवा टाटा तेथे दुरुस्त केली जातात. एसटीने यासाठी खास कामगारांची नेमणूक केली आहे. एंजिने दुरुस्त/नवीनीकरण झाल्यावर ती ड्राईव्ह वे वर चाचणी घेतली जाते. प्रचंड आकाराची ती ड्राइव्ह टेस्ट यंत्रणा एका एंजिने ला टेस्ट करायला ८ तास घेते. चाचणी मध्ये एंजिने पास झाल्यावरच मग ते परत बस मध्ये बसवले जाते. गेल्याच आठवड्यात एसटी चा कामगारांनी भारत-२ चे एंजिने यशश्वीरित्या भारत-३ प्रणाली मध्ये बदलून दाखवले आहे. भारतीय वाहतूक मानांकन मध्ये सध्या भारत-४ हेवी वाहनांसाठी आहे अशा आहे कि एसटी लवकरच भारत-४ श्रेणीचे एंजिने बस मध्ये बसवेल. ०३:भांडार विभाग:- स्टोअर्स / भांडार विभाग खरंतर स्टोअर्स हि नेहेमीच पुरुषी मक्तेदारी राहिली आहे. पण ह्या बाबतीत एसटी ने आम्हाला चकित केले. कारण एस्टिच्या ह्या विभागाचे परिचालक एक महिला अधिकारी समर्थपणे गेले ४ वर्षे सांभाळत आहेत. नट बोल्ट पासून चासी पर्यंत आणि दिव्या पासून ते पेट्रोल टाकीपर्यंत सर्वच लागनाऱ्या वस्तू भांडार विभागाच्या नियंत्रणाखाली आहेत ( ह्याची खरेदी मुख्यालय-मुंबई येथून केली जाते). भांडार विभागाकडे सध्या बस चे रूपांतर केलेले २ ट्रक्स कार्यरत आहेत जे ह्या सर्व गोष्टींची नेमाने वाहतूक करतात. ०४:बॉडी शॉप: आपल्या सर्वांना कदाचित हे माहित नसेल पण हे सत्य आहे कि आपली लाडकी एसटी बस बांधणी पण करते. होय एसटी च्या सर्व बसेस एसटी दापोली , औरंगाबाद आणि नागपूर कार्यशाळेत बांधते. असे करणारे महाराष्ट्र राज्य परिवहन हे देशातले एकमेव महामंडळ आहे. हल्लीच एसटीने एसिजिएल-गोवा कडून नवीन हिरकणीची बांधणी करून घेतल्या आहेत. बस बांधली हि पारंपरिक अलुमिनियम वापरूनच केली जात होती पण आता केंद्रीय नियम बदलल्यामुळे एसटी ने माईल्ड स्टील प्रकारातल्या नवीन परिवर्तन बस ची बांधणी पण सुरु केली आहे. सादर गाड्या ह्या अनुक्रमे नागपूर>गोंदिया , पुणे>शिर्डी आणि विजयपूर>पाटण मार्गावर यशश्वीपणे धावत आहेत. लवकरच राज्यभरातल्या सर्व आगारांसाठी १५० बस बांधणी चे काम सुरु होणार आहे. ०५:पेंट विभाग: टोमॅटो रेड हीच शेड आता एसटी च्या परिवर्तन बस साठी वापरली जाणार आहे. विविध प्रकारचे स्टंन्सील्स , लोगोचे अल्लुनिमिम चे स्टेन्सिल्स , ग्लास पैंटिंग साठी विशेष पेन्ट्स , डेपो मार्किं साथी चमकणारे रंग , तरच बस मध्ये लावायचा पिवळा आणि सीट ला देण्यासाठी हिरवा रंग पण फिक्स झाला आहे. पैं विभागात बस चा रंग नवीन दिला जातो. प्रथम एसटी चे कामगार हाताने सर्व रंग खरवडून काढतात मग त्यावर प्रिमेर चा ठार देऊन बस २ दिवस ठेवली जाते . त्यानंतरच बस वर रंग आणि गंज प्रतिरोधकचे मिश्रण पेंट केले जाते . मग बस पुढे चर्मकार विभागाकडे पाठवली जाते. ०६:चर्मकार विभाग: सीट बनवणे आणि खराब झालेल्या सीट्स दुरुस्त करणे हेच ह्या विभागाचे काम आहे. चर्मकार विभागात सध्या ३० कामगार काम करत असून दिवशाला ४० सध्या आणि २० पुश-बॅक पारावरच्या सीट चे उत्पादन होत आहे. ह्या सीट बस मध्ये बसवल्याचे काम पण पेंट विभागाचं करतो. ०७:चाचणी विभाग:- बस पूर्ण बांधून / नवी बनवून झाल्यावर त्याची पूर्ण चाचणी केली जाते यासाठी बस कार्यशाळेत चाचणी रास्ता उपलब्ध आहे. वरील सर्व विभागांना आम्ही भेटी दिल्या. एसटीचे विभागीय प्रमुख सुद्धा आमच्या बरोबर होते . कोणाला सादर ग्रुप मध्ये यायचे असल्यास लिंक खाली देतो आहे . फोटो काधायला मनाई असल्यामुळे कुठलेही फोटो काढलेले नाहीत अधिक माहितीसाठी youtube वर "अशी बनते एसटी " नावाची डोकमेंटरी उपलब्ध आहे फेसबुक लिंक : ग्रुप साठी https://www.facebook.com/search/top/?q=msrtc%20lovers%20group%20-%20st%20mahamandal%20fans

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 21950 views

💬 प्रतिसाद (51)
आ
आलमगिर Mon, 04/02/2018 - 19:19 नवीन
सर्व सुचना मा. मंत्रीमहोदयांपर्यंत पोहोचवा येतील आसे बघतो
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 17 hours ago
  • सुंदर !!
    5 days 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा