Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

काही त्रिवेणी रचना...

र — राघव, Fri, 02/16/2018 - 12:19
सहज विचार करतांना उतरलेले हे काही शब्द.. ============ सांगायचं कसं अन् लिहायचं कसं.. मनांतलं शब्दांत मांडायचं कसं? त्या अग्नीपंखाचा तुटक्या पंखांना सवाल, "आता उडायचं कसं?" ============ लहान मुलं आणि त्यांची निरागसता.. वेड लावणारं त्यांचं निष्पाप मन.. पारिजाताच्या फुलांसारखं नितळ विश्व! ============ प्रयत्नांची कास सोडू नये.. कामनांची आस धरू नये.. ईच्छा अर्पण करावी.. निष्काम कर्म करावं.. गुंतागुंत आणि परस्परविरोध ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात! ============ केवढाली कपाटं आणि पुस्तकांची आरास.. तर्काचे इमले आणि अनुभवहीन चढते-ढासळते बुरुज! अनेक मांडवांखालून गेलोय पण लग्नाचा पत्ता नाही अजून... ============ राघव

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1869 views

💬 प्रतिसाद
प
प्राची अश्विनी Sat, 02/17/2018 - 05:43 नवीन
"लग्नाचा पत्ता नाही...." :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 02/17/2018 - 05:52 नवीन
सुटे सुटे विचार आवडले.
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 02/21/2018 - 06:36 नवीन
@प्राची अश्विनी: :-) @पैसातै: होय, साधारण तेच!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Wed, 02/21/2018 - 16:17 नवीन
रचना आवडल्या. वेगळा प्रकार. पै म्हणाली तसं हायकु सारखे.
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 02/21/2018 - 16:37 नवीन
एक वेगळा प्रकार चंद्र तारे प्रेम किंवा तिथ्या यांच्या दावणीतून सुटलेली ही छोटी वासरे भारीच आहेत मिपावरील आपलीच माणसं आणि त्यांनी केलेली (कवितेची) माती या लोकप्रिय कार्यक्रमातून साभार
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 02/22/2018 - 06:19 नवीन
@पद्मावति: हायकू सारखं आहे खरं, पण मिपावर नवीन नाही. आधीही त्रिवेणी धागे निघालेले आहेत. @नाखु: धन्स! बादवे - आणि त्यांनी केलेली (कवितेची) माती ----- हे भारी!! =))
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 20 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 21 hours ago
  • सुंदर !!
    2 days 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा