Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

<नाव सुचवा>

न — निशांत_खाडे, Wed, 02/14/2018 - 17:19
तुझ्या त्या निरागस आनंदामागेही थोडेसे बालिश शौर्य असेल बहुतेक बागेत सापडलेल्या नारळाला धागे बांधून बनवलेले टेलिफोन मी झोपी गेलो तू तरीही बोलतच राहिलास तू बोललास मरणाला काय घाबरायचे? मुलींचे कपडे घालून काढलेल्या फोटोंची मात्र तुला भीती वाटत असावी. नाहीतर कुलूप लावून पेटीत का लपवले होतेस? खरेतर ज्या दिवशी तू निघून गेलास, तेव्हा मला वाईट वाटले नाही. जेव्हा तू गाडीचा दरवाजा धाडकन बंद केलास मी सुखावलो होतो जरासा. पण मीही तरुण होतो, युद्धांवर विश्वास ठेवण्याइतका.. नंतर पुढे बरीच वर्षे तुझ्या विषयी काहीबाही ऐकायला मिळायचे.. मला आनंद आहे कि तुझी सुटका झाली पण मी अजूनही इथेच अडकलेलो आहे. आजतर सदरा भिजला माझा तुझ्या आईच्या अश्रूंनी आयुष्य असे असेल असे कधीच वाटले नव्हते.. अजूनही रात्री मी त्या बागेत जाऊन बसतो. तिथेही हल्ली सगळे भकास असते पण तुझ्या आठवणीने सगळा एकटेपणा नाहीसा होतो.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 698 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 20 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 21 hours ago
  • सुंदर !!
    2 days 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा