Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

खेळ गाणी

प
प्रणित
Sat, 02/10/2018 - 07:26
💬 11 प्रतिसाद
मध्यंतरी व्हाट्सएप वर खेळगाण्यांचा एक मेसेज वाचायला मिळाला आणि लहानपणी म्हटली जाणारी काही खेळगाणी मी माझ्या मुलीला शिकवली. १. 'आपडी-थापडी.... गुळाची पापडी धम्मक लाडू.... तेल पाडू तेलंगीच्या.... तीन पुऱ्या चाकवताचं.... एकच पान धर गं बेबी.... हाच कान' २.च्याऊ म्याऊ च्याऊ म्याऊ च्याऊ ची कोंबडी आपण खाऊ, च्याऊ ला पैसे कुठून देऊ हंडी फोडून खापऱ्या देऊ ३. 'बदका बदका नाच रे, तुझी पिल्लं पाच रे, एक पिल्लू मेलं, गाडीत घालून नेलं, गाडी गेली डोंगराला, आपण जाऊ बाजाराला, बाजारातून आणल्या पाट्या, साऱ्या मुलांना वाटल्या, एक मूलगा चुकला, छडी खाली लपला, छडी त्याला चावली विद्या देवी पावली' ४. च्याऊ म्याऊ पितळीचं पाणी पिऊ भुर्रकन उडून जाऊ' कोणाला अजून गाणी आठवत असल्यास शेअर करा

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3808 views

💬 प्रतिसाद (11)
च
चौथा कोनाडा Sun, 02/11/2018 - 09:09 नवीन
आईचं पत्र हरवलं ......
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Sun, 02/11/2018 - 12:01 नवीन
कोण तू रे... टंपिटोला खातो काय रे... भाजीपाला निजतो कुठे... चटई वरती बायको कुठे... पलंगावरती तू नाही झोपत... चिमटे काढते मारत का नाही............ माया येते
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 02/13/2018 - 05:18 नवीन
भारी. हे माहीत नव्हतं
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Sun, 02/11/2018 - 17:52 नवीन
दगड का माती आमरस शिवन साई आम्ही कोणाला भित नाही सांगा तुमची दगड का माती If any one remembers
  • Log in or register to post comments
प
पिनू Sun, 02/11/2018 - 19:29 नवीन
कोरा कागद निळी शाई अाम्ही कुणाला भित नाही पडलं तर रडायचं नाही अाईबाबाना सांगायचं नाही वर बघून सांग दगड की माती
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Mon, 02/12/2018 - 19:27 नवीन
हे पण होत , छान
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Sun, 02/11/2018 - 17:57 नवीन
शाळा सुटली पाटी फुटली आई मला दगडुने मारले मी काय त्याच्या बापाचे खाल्ले
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sun, 02/11/2018 - 19:31 नवीन
अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड जिभेला आला फोड फोड फोड काही फुटेना दारचा पाहुणा हटेना
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Tue, 02/13/2018 - 06:08 नवीन
दोन उंदीर विणायला बसले... हळूच मांजराने डोकावले. अरे उंदरांनो काय करता? अरे उंदरांनो काय करता? लोकांसाठी कपडे विणतो.....लोकांसाठी कपडे विणतो. आम्ही येऊ का मदत करायला..आम्ही येऊ का मदत करायला.. नको रे बाबा नको नको....नको रे बाबा नको नको. कारण तुम्ही लुच्चे लबाड मनी माऊ आहात... (वरच्या बडबड गीतात ही लास्ट लाईन मी टाकली ....)
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Tue, 02/13/2018 - 10:51 नवीन
कापुस कोंड्याची गोष्ट सांगु सांग सांग काय म्हणतीस तुल कापुस कोंड्याची गोष्ट सांगु सांगना सांगना काय म्हणतीस तुल कापुस कोंड्याची गोष्ट सांगु and so on............
  • Log in or register to post comments
श
शित्रेउमेश गुरुवार, 02/15/2018 - 06:59 नवीन
सातार्‍याचा म्हातारा, शेकोटीला गेला, सातार्‍याचा म्हातारा, म्हातार्‍याची बायको शेकोटीला गेले, सातार्‍याचा म्हातारा, म्हातार्‍याची बायको, बायकोचा मुलगा शेकोटीला गेले, सातार्‍याचा म्हातारा, म्हातार्‍याची बायको, बायकोचा मुलगा, मुलाची मांजर शेकोटीला गेले, सातार्‍याचा म्हातारा, म्हातार्‍याची बायको, बायकोचा मुलगा, मुलाची मांजर, मांजराची शेपटी शेकोटीला गेले, सातार्‍याचा म्हातारा, म्हातार्‍याची बायको, बायकोचा मुलगा, मुलाची मांजर, मांजराची शेपटी, शेपटी वरचे केस शेकोटीला गेले, सातार्‍याचा म्हातारा, म्हातार्‍याची बायको, बायकोचा मुलगा, मुलाची मांजर, मांजराची शेपटी, शेपटी वरचे केस, केसावरची माशी शेकोटीला गेले, सातार्‍याचा म्हातारा, म्हातार्‍याची बायको, बायकोचा मुलगा, मुलाची मांजर, मांजराची शेपटी, शेपटी वरचे केस, केसावरची माशी, माशीचे पंख शेकोटीला गेले,
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 14 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा