Sheet Anchor of Indian Chronology
अलेक्झँडर, चन्द्रगुप्त मौर्य, चाणक्य, अंभी, पौरस इत्यादि नावे जी आपणास आज ठाऊक आहेत ती सर्व पश्चिमेकडील ग्रीक लोकांच्या लेखनातून उपलब्ध झाली आहेत. भारतीय प्राचीन साहित्यात एकतर अलेक्झँडर, अंभी, पौरस कोठेच भेटत नाहीत आणि 'त्या' प्रसिद्ध लढाईविषयीहि एकहि उल्लेख नाही. अर्थात लढाई झाली हे सत्य आहे कारण अनेक ग्रीक लेखनांमधून तिचा उल्लेख मिळतो पण त्या ग्रीक सैन्यामध्ये कोणी एक चन्द्रगुप्त होता ज्याने चाणक्य ह्या राजनीतिपटु ब्राह्मणाच्या सहकार्याने नंदकुलाचा नाश केला ह्यामागे काही पुरावा नाही. अर्थात चन्द्रगुप्त, चाणक्य, नंदकुलाचा नाश ह्या घटनाहि होऊन गेल्या होऊन गेले कारण मुद्राराक्षस, देवीचन्द्रगुप्तम्, कौमुदीमहोत्सव अशा ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील नाटकांमध्ये, तसेच कथासरित्सागरामध्ये त्या भेटतात.
ही सगळी गोची चन्द्रगुप्त नक्की कोण आणि केव्हा होऊन गेला हे पाश्चात्य अभ्यासकांनी कसे ठरविले ह्यातून झाली आहे. पाश्चात्य अभ्यासकांचा ठराव आणि त्यातील गोची हा फार विस्तृत विषय आहे, येथे त्याचा आराखडाच थोडक्यात द्यायचा प्रयत्न करता येईल.
चन्द्रगुप्ताचा काळ ही एकच घटना भारताच्या प्राचीन इतिहासाला अन्य जगाच्या इतिहासाशी जोडते आणि त्यामुळे त्या घटनेला Sheet Anchor of Indian Chronology असे मॅक्समुल्लरने संबोधले. विन्सेण्ट स्मिथसारख्या अन्य जाणकारांनी त्याला दुजोरा दिला. ही गोष्ट एकदा पक्की मानली की चन्द्रगुप्ताच्या पुढच्या आणि मागच्या सर्व व्यक्ति आणि घटना केव्हा होऊन गेल्या हे अधिक-उणे करून ठरवता येते. पण ही मूळची गोष्टच कितपत पक्की आहे ह्याबाबत अन्य अनेक अभ्यासकांना पहिल्यापासून शंका आहे. तथापि मॅक्समुल्लर आणि विन्सेण्ट स्मिथसारख्या विद्वानांच्या मतापुढे अशा संशयी अभ्यासकांच्या शंकांना कधीच वजन मिळाले नाही. हळूहळू मॅक्समुल्लर आणि विन्सेण्ट स्मिथ ह्यांचे हे मत एका dogma मध्ये परिवर्तित झाले. १०० हून अधिक वर्षे आपल्या स्थानावर अढळ असलेल्या ह्या dogma ला विरोध म्हणजे एक वैचारिक बंडखोरीच. अशी बंडखोरी करणार्याला सर्व विद्यापीठे, प्राध्यापकाच्या जागा, academic conferences ह्यांचे दरवाजे बंद होऊ लागले.
चन्द्रगुप्ताचा काळ कसा ठरला? Indology ह्या शास्त्राचा जनक विल्सन जोन्स ह्याने स्थापन केलेल्या Asiatic Society of Bengal च्या १०व्या वर्षदिनाच्या निमित्ताने सोसायटीपुढे २८ फेब्रुअरी १७९८ ह्या दिवशी एक भाषण केले. त्याला अलेक्झँडरच्या मोहिमेबाबत ग्रीक लेखकांनी केलेल्या लेखनामधून Sandracottus (ह्याची अनेक स्पेलिंग्ज आहेत) हे नाव माहीत होते आणि तत्कालीन उपलब्ध संस्कृत लेखनामधून त्याला चन्द्रगुप्त हे नावहि माहीत होते. त्यातील एक दुसऱ्याशी जोडून अलेक्झँडरच्या संबंधात आलेला आणि नंतर सेल्यूकस निकेटरशी तह करणारा Sandracottus हाच त्याला माहीत असलेला चन्द्रगुप्त असा तर्क त्याने बांधला. ह्या तर्काला दुजोरा मिळाल्यासारखे दिसले तेव्हा, जेव्हा जेम्स प्रिन्सेपला फ़ेब्रुअरी १८३८ मध्ये अशोकाच्या ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेल्या गिरनार लेखाचे (अशोकाचे १३ वे शिलाशासन) वाचन करता आले. त्या लेखामध्ये त्याला अशोकाचे समकालीम म्हणता येतील अशी भारताबाहेरच्या तीन राजांची नावे आढळली. ह्या राजांचा काळ माहीत असल्यामुळे त्यांचा काळ हा अशोकाचा काळ ठरला, त्यामुळे त्याच्या दोन पिढ्यामागच्या चन्द्रगुप्त हा अलेक्झँडरचा समकालीन आणि चन्द्रगुप्त मौर्याचा काळ म्हणजे इ.स.पूर्व ३१५ ह्या तर्काला बळ मिळाले. बौद्धांच्या समजुतीनुसार बुद्धाचे परिनिर्वाण चन्द्रगुप्तापूर्वी १६२ वर्षे झाले. त्यावरून गौतम बुद्धाच्या परिनिर्वाणाचा काळ इ.स.पूर्व ४७७ असा ठरला. ह्याच रीतीने क्रमाक्रमाने सगळाच प्राचीन भारतीय इतिहास आज आपण मानतो तसा बसला आणि आता तो वज्रलेप झाल्यासारखे वाटते.
येथे हे दुर्लक्षिले गेले प्राचीन इतिहासाची भारतीय परंपराहि अस्तित्वात आहे आणि ती अनेक पुराणांमधून आणि राजतरंगिणीसारख्या ग्रन्थांमधून मांडण्यात आली आहे. तिच्यामध्ये कलियुगप्रारम्भापासून तीन हजार वर्षे कोणते राजवंश होऊन गेले अशी जन्त्री आहे. त्यानुसार असे विधान करणे शक्य आहे की जोन्स इत्यादींना दिसलेला चन्द्रगुप्त हा मौर्य चन्द्रगुप्त नसून गुप्त वंशाचा संस्थापक गुप्त चन्द्रगुप्त आहे आणि मौर्य चन्द्रगुप्त हा त्याच्या अनेक शतके आधी होऊन गेला. अशोकाचे समकालीन मानले गेलेले तीन राजेहि कोणी दुसरेच आहेत असे मानण्यास जागा आहे. चन्द्रगुप्त-नंदवंश ह्यांच्या बाबतच्या प्रचलित कथा गुप्त चन्द्रगुप्तालाहि विरोधात नाहीत. अशा रीतीने Sheet Anchor of Indian Chronology जर रद्द करता आला तर भारतीय प्राचीन इतिहास आज वाटतो त्यापेक्षा खूपच जुना असावा असे म्हणता येईल.
पण ह्या ना त्या कारणाने पाश्चात्यांनी ही सर्व पुराणे आणि राजतरंगिणीसारखे ग्रन्थ शुद्ध इतिहास म्हणून अविश्वासार्ह ठरवले. त्यातील वंशावळी काही प्रमाणात मान्य केल्या पण त्यांचे काळ पुराणे दाखवितात त्यापेक्षा बरेच कमी करून घेतले आणि अशी बरीच कसरत करून चन्द्रगुप्त मौर्य इ.स.पू. ३१५ (अधिक-उणे काही वर्षे) हे जुळवून घेतले. त्यामुळे भारताचा प्राचीन इतिहास इ.स.पू. १५०० च्या अधिक मागे जात नाही हा सिद्धान्त जन्मला.
हे सर्व करण्यामागे भारत ह्या जित राष्ट्राचा इतिहास हा ग्रीक इतिहासापेक्षा अधिक प्राचीन असूच शकत नाही हा पाश्चात्यांचा साम्राज्यवादी पूर्वग्रह मुख्यत्वे कारणीभूत आहे अशी शंका पाश्चात्यांचे विरोधक घेतात.
हे सर्व विचार येथे पूर्ण विस्तारात मांडणे शक्य नाही कारण त्यांचा आवाका खूप मोठा आहे. असा काही प्रश्न अस्तित्वात आहे आणि भारतीय इतिहासाच्या कालगणनेबद्दलचा शेवटचा शब्द उच्चारला गेलेला नाही हे अधोरेखित करणे इतपतच ह्या धाग्याची व्याप्ति पोहोचते. ज्यांना अधिक जिज्ञासा असेल अशांनी The Sheet Anchor of Indian Chronology हे श्ब्द गूगलच्या शोधपेटीमध्ये घालून काय बाहेर पडते ते वाचावे. ’History of Classical Sanskrit Literature (लेखक M. Krishnamachariar)’ असे पुस्तक archive.org ह्या संस्थळावर उपलब्ध आहे. त्याच्या विस्तृत प्रस्तावनेची xxxvii ते cx इतकी पाने ह्या प्रश्नाच्या विवेचनासाठी खर्च केली आहेत.
भारत सरकारने पुढाकार घेऊन भारातात कोठेतरी एक कॉन्फरन्स बोलवावी. तिला जगभरचे ह्या क्षेत्रातील नामवंत विद्वान पुरेसे मानधन देऊन बोलवावेत. कॉन्फरन्सपुढे एकच विषय चर्चा आणि निर्णयासाठी ठेवावा - तो म्हणजे भारताच्या इतिहासाची सध्याच्या बहुमान्य timeline चे पुनर्निरीक्षण करणे आवश्यक आहे काय?इथपर्यंत उत्तम आहे. मात्र...कॉन्फरन्सचे यजमानपद JNU सारख्या नि:पक्षपाती/डाव्या विद्यापीठाकडे द्यावे, जेणेकरून भाजप शासन इतिहासाचे पुनर्लेखन करीत आहे ह्या आरोपाला उत्तर द्यायची सोय होईल.हे फार naive होईल. इंदिराजींनी राजकिय पाठिंब्याच्या बदल्यात कम्युनिस्टांना अनेक शिक्षण आणि इतिहास संबंधित संस्थात (JNU, ICHR, etc) अनेक महत्वाची पदे डाव्यांना दिली. JNU मधल्या आणि इतर अनेक इतिहासकारांनी याधीच भारतिय इतिहासाची भरपूर मोडतोड केली आहे. त्यांच्या हाती मुखत्यारपद देणे म्हणजे भारतिय इतिहासाच्या मोडतोडीचे हेतूपूर्वक मोडतोड करणार्यांच्या हाती कोलीत दिल्यासारखे होईल ! मी उजव्या विचारसरणीचा समर्थक नाही... किंबहुना कोणत्याही एकेरी (डाव्या अथवा उजव्या) विचारसरणीला आंधळा पाठींबा देणे हे आपल्या बुद्धीला (चलाखीने किंवा फसवणूकीने) मुरड घातल्याशिवाय शक्य नाही असे मला वाटते. मुळात नि:पक्षपाती व डावे हे एकमेकविरोधी शब्द आहेत. कम्युनिस्ट (आणि त्यातही सत्ताधारी नेत्यांच्या सोईचा प्रकार) सोडूण दुसरा कोणता पक्ष कोणत्याही राजवटीत आजतागायत आढळून आला आहे काय ?! आजपर्यंतचा जागतिक अनुभव पाहता, आपल्याला सोईचा /आवडलेला इतिहास "तयार करण्यात" आणि सोईचा नसलेला / न आवडलेला पूर्वेतिहास नष्ट करण्यात डावे तरबेज असतात असेच नव्हे तर तसे करणे हा त्यांच्या विचारधारेचा अविभाज्य भाग असतो. कहीही करून लोकांचे जुने विचार आणि जुनी संस्कृती कनिष्ठ व लाजिरवाणी होती सिद्ध केले की त्यांच्यामध्ये आपली नवीन विचारसरणी रुजविणे सोपे होते, हे साधे मानसशास्त्रिय तत्व यामागे आहे. या बाबतीत अतिधार्मिक एकाधिकारशाही आणि कम्युनिस्ट राजवट (जी एक-पार्टी-एकाधिकारशाहीच असते) यांच्यात कोण वरचढ हे सांगणे मोठे कठीण आहे. अतिधार्मिक एकाधिकारशाहीत त्या धर्माचे नसलेल्या लोकांची परिस्थिती अणि कम्युनिस्ट राजवटीत कम्युनिस्ट नसलेल्या लोकांची परिस्थिती, यांत फारसा फरक असतो की नाही, हे वेगळे सांगायची गरज नाही ! डाव्यांच्या (JNU तर त्यांच्या शैक्षणिक (अकॅडेमिक) नेतेपदी आहे) अश्या कृतींची अनेक संशोधकांनी उदाहरणे देऊन सतत तक्रार केलेली आहे. "How JNU distorts Indian history" अशी विचारणा जालावर आणि विशेषतः युट्युबवर करून थोडेसे संशोधन केल्यास याची असंख्य उदाहरणे मिळतिल. त्यातील काही... यातील शेवटच्या क्लिपमध्ये ६ ते ८ मिनिटांपर्यंतचे Dr David Frawley यांचे अनुभव आणि विशेषतः त्यांचा दुसरा (JNU मधला) अनुभव जरूर पाहण्या-ऐकण्याजोगा आहे !कॉन्फरन्सचे यजमानपद JNU सारख्या नि:पक्षपाती/डाव्या विद्यापीठाकडे द्यावे.असे करण्याने इतिहासाच्या कोकराला, लांडग्याला सोईचा पडेल असा सापळा रचून, त्यात स्वतःहून ढकलण्यासारखे होईल ! :(२. "सीता रावणाच्या शिंकेतून पडली" किंवा "इक्ष्वाकु कुळाचा इक्ष्वाकु हाच शिंकेतून उत्पन्न झाला" असे कोणीही म्हणत असले तरी, सद्याचा प्रश्न असा आहे की, "ते तुम्हाला स्वतःला सत्य आहे असे वाटते, की केवळ विक्षिप्त कविकल्पना वाटते ?" अ)"शिंकेतून माणसाचा जन्म होणे शक्य नाही आणि तसे विद्यापिठातल्या कोर्समध्ये शिकवणे चूक आहे" असे माझे म्हणणे आहे. आ) "तसे होणे शक्य आहे" असे म्हणणे असलेल्याला काय म्हणावे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही ! इ) "तसे होणे शक्य नाही पण तरीही एखाद्या सामाजिक गटाला बदनाम करण्यासाठी किंवा त्याची कुचेष्टा करण्यासाठी विद्यापिठातल्या कोर्समध्ये तसे शिकवावे" असे मत असलेल्या आणि ते अंमलात आणणार्या व्यक्तींना समतोल, संशोधक, इतिहासकार, इत्यादीपैकी एखादे संबोधन तरा सोडाच पण "सज्जन माणूस" असेही संबोधन लावता येणार नाही. अश्या असंतुलीत, मानवी मुल्यांचा विधिनिषेध नसणार्या आणि आपल्या हितसंबंधांसाठी सत्याची पायमल्ली करणार्या माणसांना कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार देणे धोक्याचे असते. हे चष्मा लावलेल्या व्यक्तीला समजायला थोsssडेसे कठीण आहे पण पाचवीपर्यंत शिकलेल्या समतोल विचाराच्या व्यक्तींना सहज समजेल ! :) तुम्हाला (वरीलपैकी एक किंवा दोन्हीही) समजले नसल्यास, तुमचे चालू द्या. तुमच्या कोलांट्या उड्यांनी लोकांचे मनोरंजन मात्र होत आहे ! =)) =)) =))
आणि याच संदर्भात हे दिल्ली विश्वविद्यालयात २००८ मध्ये शिकवल्या रामायण कोर्सबद्दल चकित करणारे मुद्दे...काय बोलणार? उद्वेगजनक आहे सगळं :(