Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

[उपक्रम प्रस्ताव] मराठी भाषा दिन २०१८ - भाषांतरित कविता स्पर्धा - कृपया ४ फेब्रुवारीपर्यंत सूचना द्याव्यात

आ
आदूबाळ
Tue, 01/30/2018 - 16:54
💬 5 प्रतिसाद
नमस्कार. येत्या २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन आहे. आपण दर वेळेला काही उपक्रम करतो. हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवसही आहे. त्याचं औचित्य साधून 'भाषांतरित कविता स्पर्धा' असा उपक्रम करूया का? - कोणत्याही भाषेतून मराठीत भाषांतर केलेल्या कविता चालतील - मूळ कवितेची लिंक द्यावी - स्पर्धेचा निकाल मतदानाने ठरवला जाईल (नेहेमीचं +१ मतदान) - स्पर्धा मराठी भाषा दिनाच्या आठवड्यात खुली असेल (२६ फेब्रु ते २ मार्च), आणि पुढच्या सोमवारी, म्हणजे ५ मार्चला निकाल जाहीर केला जाईल. --------------- नेहेमीप्रमाणे, सूचना आणि मतांचं स्वागत आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 312 views

💬 प्रतिसाद (5)
त
तुषार काळभोर Tue, 01/30/2018 - 17:55 नवीन
चांगली कल्पना!
स्पर्धा मराठी भाषा दिनाच्या आठवड्यात खुली असेल (२६ फेब्रु ते २ मार्च)
म्हणजे प्रवेशिकांची एन्ट्री की मतदान की दोन्ही? मला वाटतं, प्रवेशिका व्यनिने मागवाव्यात (१५ -२५ फेब्रुवारी) व मराठी भाषा दिनाच्या आठवड्यात प्रकाशित करून मतदान घ्यावे.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 01/30/2018 - 19:00 नवीन
- मूळ कवितेची लिंक द्यावी -->> किंवा छापील असेल तर पुस्तकाचे नाव, लेखक वगैरे... चालतीलच की . माझे मत स्पर्धेची गरज वाटत नाही. स्पर्धा खूप होतायत असं उगाचच वाटलं. हारण्याच्या चिंतेने काहिजण प्रवेशिका देण्यास अनुत्सुक राहतील.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 01/31/2018 - 09:58 नवीन
सोबत अनुवादित (भाषांतरीत) लघुकथा पण घ्याव्यात हि विनम्र विनंती. कविता भाषांतराला इन्पुट एकतर इंग्रजीचा असणार अन्यथा हिंदीचा. त्यापेक्षा वेगळ्या क्वचित येणार.(हे लघुकथांनाही लागू आहेच म्हणा पण भाषांतरीत लघुकथा ह्या कवितांपेक्षा मूळ लेखनाला जास्त जवळ जातात असे वैयक्तिक मत) शिवाय भाषांतरीत कविता हे वेगळ्या प्रकारचे चॅलेंज आहे. ते सोपे नाही. सर्व (किंवा जास्तीत जास्त) मिपाकरांना सामील करु शकू असे सोपे पण थोडातरी वाचनीयतेचा कस लागेल असे टास्क ठेवावे. स्पर्धेपेक्षा सिलेक्शन कलेक्शन ठेवावे.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 02/01/2018 - 03:45 नवीन
१) या घोषणेच्या आधी फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल घोषित करू. २) यावेळी स्पर्धा नको, असं आता वाटतंय खरं. पण सिलेक्शन कलेक्शन करताना 'अमुक घेतलं, तमुक नाही घेतलं' अशा प्रतिक्रिया येऊ शकतात, त्याची काळजी घ्यावी लागेल. ३) कथा + कविता रोज एकएक प्रकाशित करता येतील. ४) निवडण्यासाठी दोन तीन मान्यवर ठेवावेत, की दिवाळी अंकाला केलं तसं मिपासंवादला जोडलेले सदस्य निवडतील?
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Mon, 02/05/2018 - 11:36 नवीन
एक आयत्या वेळची भानगड (चांगल्या अर्थाने) उपस्थित झाल्याने मला या उपक्रमात भाग घेता येणार नाही. माझ्या प्रोफेशनल क्षेत्रातल्या एका जर्नलने मला एका अंकापुरता अतिथी संपादक बनवलं आहे. त्यांना २ मार्चपर्यंत अंक पूर्ण करून हवा आहे. त्यामुळे सध्या अनेक लोकांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्या गळ्यात पडणं चालू आहे. हे अर्थात नोकरीव्यतिरिक्त वेळाचे उद्योग असल्याने ओढाताण होणार आहे. या भानगडीत मिपाचा उपक्रम आयोजित करायला जमणं कठीण आहे. अन्य कोणी पुढाकार घेऊ शकल्यास जमेल तितकी मदत नक्कीच करेन.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 12 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा