Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

*पद्मावतीच्या भ्रमाचा भोपळा अन् वर"करणी" धुडगूस*

S
ss_sameer
Sun, 01/28/2018 - 05:49
🗣 125 प्रतिसाद
अखेरीस सर्व (तथाकथित) संस्कृती रक्षकांच्या विरोधास न जुमानता "पद्मावती" चे थेटरात आगमन झालेच. माफ करा, टंकलेखनाच्या चुकांकडे कानाडोळा करावा, संपूर्ण लेखात "पद्मावती" छापण्यात आले असले तरीही (तथाकथित) संस्कृती रक्षकांनी आणि मा. श्री. श्री. संजय लीळा भन्साळी यांनी ते "पद्मावत"(च) आहे असे समजून लेख वाचण्याची विनंती. (विनाकारण) उत्सुकता वाढवणारा क्षण आल्यासरशी तमाम रसिकजनांनी त्यावरती उड्या हाणल्या. चित्रपटाच्या प्रदर्शनपूर्व (जास्तीचे) पैसे भरून चित्रपट पाहण्याची संधी पूर्ण करता आली. या सर्व घटनांबद्दल सर्व (तथाकथित) संस्कृती रक्षकांचे मा. श्री. श्री. संजय लीळा भन्साळी यांचेकडून आभार. या सकल घटनांचे रुपरंग पाहता, आम्हास १९३० ते १९४७ दरम्यान च्या निवडणुकांचे दिवस आठवले. "मुस्लिम लीग" नामक एक पक्ष ज्यांच्याकडे लोकसभा वा राज्यसभेत पूर्ण राहू द्या परंतु अर्धे देखील बहुमत नव्हते, त्या ठिकाणी त्यांची मंत्रिमंडळात पन्नास टक्के मंत्रिपदाची मागणी होती. अर्थातच या मागणीस सभ्य भाषेत "हेकटपणा" म्हटले जाऊ शकते किंवा शेलक्या शब्दात "बिनडोक" म्हणता येईल. करणी सेनेच्या मागणीस काय म्हणायचे ते वाचक आपसूक ठरवतीलच. भ्रमाचा भोपळा अन भ्रमाचा फुगा दोन्ही फार काळ टिकाव धरू शकत नाहीतच. (जोवर त्यास झाकपाक संस्कृतीची लागण होत नाही.) सत्य हे आज नाही तर उद्या बाहेर येतेच. कोट्यवधी रुपयांच्या नाक आणि डोक्याची मूल्ये आजपासून कवडीमोल झालीत याचे आम्हास दुःख वाटत आहे. (आमच्या पेक्षा अधिक दुःख मा. श्री. श्री. संजय लीळा भन्साळी अन कु. दिपीकेस वाटत असावे.) खिलजीच्या ज्या प्रणय प्रसंगाबाबत चर्वितचर्वण केले जात होते, अन ज्या प्रसंगाच्या बळावर (तथाकथित) संस्कृतीरक्षकांची धुडगूस चालू होता असा कोणताही प्रसंग संपूर्ण चित्रपटात नाहीच आहे हे वर"करणी" तरी प्रेक्षकांना समजलेच आहे. (परन्तु प्रणयप्रसंग चित्रपटात नसल्याने तमाम "शौकीन" निराश झालेत. तेव्हा भो संजया - पुढील चित्रपटात प्रणय प्रसंग असूच द्या अशी अपेक्षेवजा मागणी.) आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने झाकलेलीं कु. दीपिकाची कंबर यामुळे पुनःश्च आपण आपल्या संस्कृतीचे रक्षण केल्याचा कोण अभिमान त्या चित्रपट गृहात ओसंडून वाहत होता याचे वर्णन आम्ही कोणत्या शब्दात करू! (येथे पुन्हा एकदा "शौकीन" निराश झालेत हे आम्ही नमूद करू इच्छितो.) भारतीय संस्कृती ही केवळ सहनशील नाही तर वेळप्रसंगी त्यात शस्त्र हाती धरून संस्कृती नाश करणाऱ्या गोष्टींस मुळापासून उपटून टाकण्याचे सामर्थ्य देखील आहे आणि अशाही प्रकारे आपण संस्कृतीतील हिंसेचे प्रदर्शन या निमित्ताने भरवू शकलो, घडवू शकलो, ही या संजयाची "करणी". वाघाने एकदा सावज हेरले की तो ते मारण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. सावजास एकदा माहीत पडले की आपली शिकार होणार, तेव्हा सावज चौखूर उधळत धावते म्हणून वाघास (बडेजाव माजविणेकरिता तरी ) सावजाचा पाठलाग करावा लागतो. तैसेच झाले असावे. प्रथम (तथाकथित) संस्कृतीरक्षकांनी सावज हेरले पण गवसत नाही असे लक्षात आले. चित्रपटात आक्षेपार्ह काही नाही याची जाणीव झाली तसे हेकटपणे चित्रपट पाहणे नाकारले. आता मात्र भन्साळींनी चौखूर उधळले म्हणून हे (तथाकथित) संस्कृतीरक्षक बडेजाव माजविणे करीता हिंसाचार करतांना दिसत आहेत. मुदलात आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे सापच नाही परंतु काठ्या आपटणे सुरुच ठेवावे लागले करण एका असत्यास लपविणे करिता असत्याची माळ उघडावी लागते. भोके असणाऱ्या वस्त्रांतून हवा लागून थंडी वाजतेच तशीच यांना हुडहुडी भरली. त्या थंडीवर उपचार म्हणून यांनी हिंसाचाराच्या शेकोट्या पेटवल्या. नुकताच यांच्यातील परमपुरुष नरवीरांनी भविष्यात अत्यंत धोकादायक असणाऱ्या लहान अजाण बालकांच्या गाडीवर लक्ष्यभेदी हल्ला केलाय. प्रसिद्धधी साठी अमाप खर्च करूनही जे शक्य झाले नसते त्याची सिद्धता झाली. याबद्दल संजयाचे अंतः"करणी" आनंदाचे धुमारे फुटले आहेतच. खाजगीत एक गोष्ट म्हणजे, या घटनेनंतर संजयाच्या भ्रमणध्वनीवर 'किती सांगू मी सांगू कुणाला...!' चे गाणेही वाजते आहे. सकल गोष्टी अंती..... सुज्ञांच्या मनास एक प्रश्न विचारावासा वाटतो की हे जे संस्कृती नामक अगम्य गोष्टीवरती चतुरस्त्र आणि हिणकस प्रदर्शन चालले आहे ते पटते आहे का? नवसाकरिता असो वा खाण्याकरिता - हिंसा ही अखेरीस हिंसाच असते. ती गाय वा बकरी वा घोडा अशी वेगवेगळी वाटण्यात आणि त्यावरून धार्मिक राजकारण करण्यात कितपत तथ्य आहे? धार्मिक किनार वाढवण्याच्या प्रयत्नात माणुसकीचा दृष्टिकोण संकुचित होतो आहे यावर कुणी विचार का करत नाही?असल्याच संकुचित दृष्टीकोनातून बेगडी सामाजिक रचना अस्तित्वात येते आणि मानवीय सह-संबंधांचे धागे उसवत जातात. धार्मिकतेच्या नावावर पोळी भाजणारी मंडळी - मग ती लाल हिरव्या भगव्या निळ्या काळ्या कोणत्या का झेंड्या खाली असेना, त्यांना पाठिंबा तुम्हा आम्हा सारख्या सामान्यांतूनच मिळतो. जोवर आपण ही लक्तरे झुगारणार नाही तोवर आपले अस्तित्व चमकून दिसणार नाही. आणि आम्हास सध्यातर "हर शाख पर उल्लू बैठा" दिसतोय. त्यामुळे भविष्यातही असेच पद्मावतीचे भ्रमाचे भोपळे फुटत राहणार आणि वर"करणी" धुडगूस वाढत राहणार.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 35706 views

🗣 चर्चा (125)
श
श्रीगुरुजी Sun, 02/04/2018 - 15:26 नवीन
खालील घटनाक्रम पहा. - राजस्थानमधील २ लोकसभा व १ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी २९ जानेवारी २०१८ मध्ये मतदान होणार होते. - 'पद्मावती' चित्रपट डिसेंबर २०१७ मध्ये प्रदर्शित होणार होता. - या चित्रपटाविरूद्ध रजपूतांच्या करणी सेनेने डिसेंबर २०१७ मध्ये आंदोलन सुरू करून चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलायला लावले. - चित्रपटाविरूद्ध राजस्थान व काही इतर राज्यांमध्ये करणी सेनेने हिंसक आंदोलन केले. - न्यायालयाने व सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या सुधारीत आवृत्तीला मान्यता दिल्यानंतर २५ जानेवारीला चित्रपट प्रदर्शित केला. - करणी सेनेने चित्रपटाला विरोध व आंदोलन सुरूच ठेवले. - पोटनिवडणुकीसाठी करणी सेनेने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. - मतदान २९ जानेवारीला पार पडून १ फेब्रुवारीला मतमोजणी झाली व तीनही मतदारसंघात भाजपचा दारूण पराभव होऊन काँग्रेसचा विजय झाला. - चित्रपट रजपूतांचा सन्माना करणारा आहे असे जाहीर करून करणी सेनेने ३ फेब्रुवारीला आंदोलन मागे घेऊन चित्रपटाला पाठिंबा दिला. हे सर्व बिंदू जोडले तर या आंदोलनाचा हेतू काय होता व त्यामागे कोण होते हे लक्षात येईल.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sun, 02/04/2018 - 16:00 नवीन
आंदोलनाचा हेतू काय होता व त्यामागे कोण होते हे लक्षात घेणे अथवा आणून देणारी जुमलेबाजी होण्यापेक्षा, जर राजकीय इच्छा शक्ती असेल, तर ज्यांनी धुडगूस घातला, लहान मुलांच्या बसवर दगडफेक केली, त्यांना शोधून पकडून, निबर ठोकून काढलं पाहिजे.....
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/04/2018 - 16:09 नवीन
निश्चितच. मुलांच्या बसवर दगडफेक करणार्‍यांना व हिंसक आंदोलन करणार्‍यांना शिक्षा व्हायलाच हवी. पण त्याबरोबरीने आंदोलनाच्या मागे नेमके कोण होते व कशासाठी आंदोलन पेटविले गेले हेसुद्धा शोधणे आवश्यक आहे. या आंदोलनामुळे निवडणुकीत मिळालेले यश पाहून भविष्यात अशी अनेक जातीयवादी आंदोलने वेगवेगळ्या राज्यात पेटविली जातील. महाराष्ट्रात शिवाजी महाराज किंवा आंबेडकरांना पुढे करून जातीय भावना भडकावल्या जातील. कोरेगाव-भीमा मध्ये व गुजरातमध्ये याचा अनुभव आलाच आहे. इतर राज्यात स्थानिक नेत्यांचे निमित्त करून स्थानिक अस्मिता भडकावल्या जातील.
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Sun, 02/04/2018 - 16:41 नवीन
नोटाबन्दी केली आणि कदाचित पैसे देऊन मत मिळवण्याचा मार्ग बंद झाला. काही हरकत नाही, जातीपातीच्या राजकारणाने मते मिळवू. कुठूनतरी सत्तेवर येऊ. देश जाऊदे खड्डय़ात. समाज राहुदे जातीत विभागलेला. आणि किती सोप्प आहे परत भाजपा सत्तेवर आहे म्हणुन जातीयता वाढली आहे म्हणत शिमगा करायला सगळे मोकळे. पण मला जाम आवडली आहे ही राजकीय खेळी. भाजपला पण चांगला धडा आहे. तुमच हिन्दु मुस्लिम राजकारण तर आम्ही हिन्दु धर्म खिळखिळा करून टाकतो. परत मान वर काढता आली नाही पाहिजे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/04/2018 - 17:48 नवीन
भाजपने नोटाबन्दी केली आणि कदाचित पैसे देऊन मत मिळवण्याचा मार्ग बंद झाला. काही हरकत नाही, जातीपातीच्या राजकारणाने मते मिळवू. कुठूनतरी सत्तेवर येऊ. देश जाऊदे खड्डय़ात. समाज राहुदे जातीत विभागलेला. आणि किती सोप्प आहे परत भाजपा सत्तेवर आहे म्हणुन जातीयता वाढली आहे म्हणत शिमगा करायला सगळे मोकळे. संपूर्ण सहमत पण मला जाम आवडली आहे ही राजकीय खेळी. भाजपला पण चांगला धडा आहे. तुमच हिन्दु मुस्लिम राजकारण तर आम्ही हिन्दु धर्म खिळखिळा करून टाकतो. परत मान वर काढता आली नाही पाहिजे. काँग्रेसने देशहिताला तिलांजली देऊन मुस्लिम अनुनय केला नसता तर भाजपला मुस्लिम अनुययाविरूद्ध आंदोलन करण्याची वेळच आली नसती. हाज यात्रा अनुदान, वेगळे व्यक्तिगत कायदे इ. काँग्रेसची देणगी. मोदींनी हाज अनुदान बंद केले तर लगेच काँग्रेसवाले गळा काढायला सुरूवात करतात. तोंडी तलाक रद्द करायला काँग्रेसचा अजूनही विरोध आहे. "तोंडी तलाक हा कुराणचा आदेश आहे व सरकारने त्यात ढवळाढवळ करू नये" असे कालच "पुरोगामी" पवारांनी सुद्धा जाहीरपणे सांगितले आहे. मुल्लामौलवींची दाढी कुरवाळूनच आपण सत्तेत येऊ शकतो या भ्रमात खांग्रेसी अजूनही आहेत.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Mon, 02/05/2018 - 05:22 नवीन
नोटाबन्दी केली आणि कदाचित पैसे देऊन मत मिळवण्याचा मार्ग बंद झाला.
. आताच्या राजस्थान उपचुनाव व गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, तुम्हाला तुमचे हे विधान कायम ठेवायचे आहें नं ? का पुनर्विचार करून परत तुम्हाला वरील वाक्य चेंज करायला आवडेल... पहा हं, नीट शांतपणे विचार करून सांगा...
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Mon, 02/05/2018 - 11:01 नवीन
आमच ठाम मत आहे भाजपला पैसे वाटायची गरज नाही. ते वाटत पण नसावेत. अहो एवढे मोठे धर्माचे राजकारण करतायत ते... भाजपात कुठे गर्भश्रीमंत शिक्षण सम्राट किवा साखर कारखानदार आहेत? हा आता सत्तेची चटक लागली की काय होईल सांगता येत नाही. त्यातुन बाहेरून पक्षात आलेले आहेतच घाण करायला..... बाकी पद्मावतच्या प्रदर्शनाच्या वेळेस खूप आशा वाट्त होती की कॉन्ग्रेस भन्साळी ला पाठिंबा देईल. नथुराम गोडसे चे प्रयोग बंद पाडायला जसे लोक पाठवले तसेच आता पद्मावती चालू ठेवायला फुल्ल मदत करतील. पुरोगामी काँग्रेस पण गप्प राहीली या सगळ्या लोकांचे आवाज पण फक्त 3 टक्के वाला विरुद्ध मोठे असतात. बघा कोणी कौतुक केल का बाजीराव मस्तानी ला किती शांततामय विरोध केला ३ टक्क्यानी
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Mon, 02/05/2018 - 11:17 नवीन
आमच ठाम मत आहे भाजपला पैसे वाटायची गरज नाही. ते वाटत पण नसावेत. अहो एवढे मोठे धर्माचे राजकारण करतायत ते... भाजपात कुठे गर्भश्रीमंत शिक्षण सम्राट किवा साखर कारखानदार आहेत?
एकदमच लॉळ.... आवल्डी हा, तुमची विनोदबुद्धी....
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 02/05/2018 - 13:35 नवीन
ते पैसे कोण अन कुठे वाटतात म्हणे ? वयात येऊन वीस वर्षे झाली , इतक्या निवडणुका झाल्या , , पण कुणी आम्हाला दोन रुपयेही दिले नाहीत.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 02/05/2018 - 14:47 नवीन
तुम्ही मुळात काँग्रेसवालेच आहात तेंव्हा तुमचे मत गृहीत धरलेले आहे शिवाय तुम्ही पांढरपेशे. झोपडपट्टीत राहायला जा. एका मतासाठी १००० रुपये पर्यंत मिळतील. माझ्या भावाच्या मोलकरणीला काँग्रेस उमेदवाराने महापालिका निवडणुकी साठी माणशी ५०० रुपये दिले होते. राष्ट्रवादीच्या उमेदवाराने सगळ्यांना खूण केलेल्या १० रुपयाच्या नोटा(४० A सिरीज च्या) वाटल्या होत्या. निवडून आल्यावर नोट घेऊन यायचं आणि १००० रुपये घेऊन जायचं. पडले ती गोष्ट वेगळी. पण मोठा खर्च वाचला. आहे कि नाही शकुनीचे डोके.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 02/05/2018 - 19:06 नवीन
गंमतच की. आणि इतके असून भाजपाने काँग्रेस , राष्ट्रवादीचे उमेदवार आयात करुन त्याना तिकिटेही दिली.. आता हे लोक नव्या नोटा वाटतात की जुन्या ? अशा लोकानी आता पैसे वाटले तर ते पाप क्वानग्रेसच्या खात्यात की भाजपाच्या ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 02/05/2018 - 20:41 नवीन
नव्या नोटा तुम्हाला कोणी देणार नाही आणि जुन्या नोटांचा तुम्हाला काही उपयोग नाही बसा ठणाणा करत भाजप च्या नावाने
  • Log in or register to post comments
प
पुंबा Fri, 02/09/2018 - 10:34 नवीन
तळेगाव दाभाडे इथे नगर पालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक मताला ४००० रू ते देखिल डिमॉनेटायझेशन फुल्ल स्विंगमध्ये असताना नव्या नोटात दिले गेले डॉक. ते पण झोपडपट्टीत राहणार्‍यांना नव्हे, सोसायटीत राहणार्‍या मध्यमवर्गिय मतदारांना. सदर उमेदवार भाजपाचा होता. ही घटना पूर्णपणे खरी आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 02/09/2018 - 11:15 नवीन
पंचक्रोशीत झालेल्या ४ ग्रामपंचायत निवडणुकीत ३.५ -४ कोटी वाटले/खर्च झाल्याची माहिती आहे. ते सुद्धा नोटबंदी नंतर. सगळे वाटप गुलाबी नोटेत होत होते.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 02/09/2018 - 11:20 नवीन
सोसायटीत राहणारे मध्यमवर्गिय झोपडपट्टी वाल्यांपेक्षा जास्त लुच्चे झाले आहेत हे माझे निरीक्षण आहे. अपवाद वगळू शकता.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 02/09/2018 - 13:17 नवीन
बरेच मिपाकर तळेगावात रहातात. कोण उमेदवार सांगा की ! कुठल्या सोसायटीत वाटल्या तिचे नाव सांगा ? पुढच्या वेळी मागता येतील =))
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 02/09/2018 - 14:23 नवीन
ते पैसे कोण अन कुठे वाटतात म्हणे ? हे त्या मोगा खानला सांगा. उगाच पिचक्या टाकत असतंय
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 02/04/2018 - 16:51 नवीन
एक सिनेमा आणि एक लोकल जातीय संघटना यांच्यापुढे भाजपा नांगी टाकत असेल तर मग पाकिस्तानसमोर भाजपा कसा काय टिकणार ओ गुर्जी ?
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Sun, 02/04/2018 - 18:50 नवीन
गप केल्या ना की पाकिस्तान विरुद्ध कारवाई करण जास्त सोप्प जाईल. कारण अशाच काही संघटना आहेत ज्या मुस्लिम अतिरेकी लोकांचे उदात्तीकरण करत आहेत. आता तर खात्री वाटते आहे की धर्मांधता आणि जातीयता ही कोन्ग्रेस लाच हवी आहे कारण त्यामुळेच ते सत्तेवर येऊ शकतात. मुस्लिम जितके मागास राहतील तितके राजकारणास चांगले. या सगळ्या राजकारण्यांची फे फे उडेल जर ओवेसी व प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Mon, 02/05/2018 - 05:30 नवीन
छान! म्हणजे घटनाक्रम चांगला आहे पण मग मला सांगा भाजपचे साक्षात मुख्यमंत्री इतके आटापिटा का करत होते चित्रपटावर बंदी घालण्याचा? ते पण करणी सेनेमध्ये होते कि काय? इथे मिपावर पण काही "संस्कृतीरक्षक" भलतेच खुश झालेले करणी सेनेचे आंदोलन बघून! "भन्साळ्याला" (आवडता शब्द संस्कृती जपणाऱ्यांचा) कशी अद्दल घडवली चित्रपट पुढे ढकलावा लागला वगैरे... जर खरंच चित्रपट प्रदर्शित झाला नसता तर वर तोंड करून बोलले असते "बघा आमच्यामुळे संस्कृती वाचली" पण श्या! कोर्टाने कोणाचं ऐकलं नाही. आता चित्रपटात आक्षेपार्ह काही दिसत नाही कळल्यावर हवाच गेली! कोण कुठली करणी सेना, तिला आवरायला किंवा प्रमुख लोकांवर कारवाई करायला जमत नसेल तर काय उपयोग इतक्या ठिकाणी शासन असून? आणि आता निवडणुकीत अपयश आले कि इतर ठिकाणी खापर फोडून रिकामे! जणू काही फक्त आम्हीच सज्जन...
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 02/04/2018 - 18:58 नवीन
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 02/04/2018 - 19:01 नवीन
हि माझी मते नाहीत, केवळ वेगळ्या बाजूचीही माहिती असावी म्हणून वरील २ युट्यूब जोडले आहेत.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 02/05/2018 - 05:53 नवीन
पद्मावत आला तेंव्हा मोदीजी का गाव , असा एक पिक्चर आला होता ना ? त्याचे काय झाले ?
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 02/05/2018 - 05:56 नवीन
पद्मावत आला तेंव्हा मोदीजी का गाव , असा एक पिक्चर आला होता ना ? त्याचे काय झाले ?
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 02/05/2018 - 05:57 नवीन
https://youtu.be/HP7EfQSMfEU
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 11 hours ago
  • सुंदर !!
    3 days 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 11 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा