Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

नवखेच सखे फसतात इथे

व — विशाल कुलकर्णी, Tue, 01/23/2018 - 06:44
वृत्त - तोटक अदमास पुन्हा चुकतात इथे वनवास नवे मिळतात इथे अवघे जगणे जगणे बनते मिथके सगळी जुळतात इथे रुसणे स्मरता हसणे स्फुरते अलवार सुखे कळतात इथे वळणे कळता सरती वलये नवखेच सखे फसतात इथे हलकेच पुन्हा जवळीक नवी सुमने कवळी फुलतात इथे विरहास नवे सहवास हवे हळवे क्षण ते स्मरतात इथे भुतकाळ जरा विसरू म्हणता इतिहास नवे रचतात इथे © विशाल वि. कुलकर्णी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7956 views

💬 प्रतिसाद
व
विशाल कुलकर्णी Tue, 01/23/2018 - 07:04 नवीन
संपादक मंडळी, काही मेजर चुका झाल्यात. अक्षरगणवृत्तात सुट घेता येत नाही. ती काही ठिकाणी घेतली गेलीय. तेव्हा कृपया मुळ कवितेच्या जागी खालील कविता टाकणार का? वृत्त - तोटक अदमास पुन्हा चुकतात इथे वनवास नवे मिळतात इथे अवघे जगणे जगणे बनते मिथके सगळी जुळतात इथे रुसणे स्मरता हसणे स्फुरते अलवार सुखे कळतात इथे वळणे कळता सरती वलये नवखेच सखे फसतात इथे हलकेच पुन्हा जवळीक नवी सुमने कवळी फुलतात इथे विरहास नवे सहवास हवे हळवे क्षण ते स्मरतात इथे भुतकाळ जरा विसरू म्हणता इतिहास नवे रचतात इथे © विशाल वि. कुलकर्णी धन्यवाद !
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 01/23/2018 - 07:32 नवीन
डन रे विशाल. बादवे छान लिहिलीय. आवडली
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 01/23/2018 - 07:57 नवीन
धन्यवाद मित्रा :)
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 01/24/2018 - 05:00 नवीन
कुठल्या गिरणीचे पीठ खातोय ते समजलं पाहिजे!!! कविता गब्बर सिंग नाखु ता क कविता आवडली आहे
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 01/25/2018 - 08:02 नवीन
तुमे जो भी खिलाओ खैन्गेच तो बडेभई :) शुकरन !
  • Log in or register to post comments
द
दमामि Wed, 01/24/2018 - 06:23 नवीन
ज्जे बात , फर्मास!!!
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 01/24/2018 - 07:02 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 01/24/2018 - 08:33 नवीन
वृत्तात ठसल्यामुळे अधिकच आवडली.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 01/24/2018 - 08:38 नवीन
दम है| दम है इसमे...
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 01/24/2018 - 09:00 नवीन
बाकी, मला कवितेतलं फारसं कळंत नाही पण कविता (की गझल) वृत्तात बसवायची खटपट प्रशंसनीय आहे. मुक्तछंदांच्या भाऊगर्दीत वृत्तमार्गी वृत्ती विशेषत्वाने उठून दिसते. -गा.पै.
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Wed, 01/24/2018 - 09:07 नवीन
+१०००
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 01/25/2018 - 07:25 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Wed, 01/24/2018 - 09:39 नवीन
छान .+१००
  • Log in or register to post comments
द
दिपुडी Wed, 01/24/2018 - 10:17 नवीन
तुम्ही ते माबो वर सस्पेंस कथा लिहीणारे विशाल। कुलकर्णी का
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 01/25/2018 - 07:23 नवीन
व्हय, त्योच मी !
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 01/25/2018 - 14:18 नवीन
विशाल भाउ जोमात बाकी सारे कोमात पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 01/25/2018 - 15:08 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 01/26/2018 - 19:05 नवीन
झकास्स्स्स... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Havana (Vertical Video) ft. Young Thug :- Camila Cabello
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 01/26/2018 - 20:18 नवीन
मुद्दाम लॉग इन करून अभिप्राय द्यावा असं वाटणारी. हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sun, 01/28/2018 - 12:05 नवीन
धन्यवाद देवानु !
  • Log in or register to post comments
च
चिगो Mon, 01/29/2018 - 14:29 नवीन
वळणे कळता सरती वलये नवखेच सखे फसतात इथे
क्या बात !! व्वाह.. अक्षरशः आठ शब्दांत आयुष्याचं गमक सांगितलंय..
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 01/30/2018 - 05:29 नवीन
अति उत्तम...!!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 01/30/2018 - 07:51 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 21 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 22 hours ago
  • सुंदर !!
    2 days 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा