Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

शब्दविता

फ — फुंटी, Fri, 01/19/2018 - 12:50
कवितेला अर्थ नसावा संदर्भ नसावा विचारांचा मागमूसही नसावा शब्दांच्या शिड्या नसाव्या नसावेत अर्थाचे मनोरे कवितेतून काहीतरी सापडलंच पाहिजे अस काही नाही कवितेला नसावी अस्मिता नसावा द्वेष , नसावा क्रांतीचा ललकार कवितेत नसावा गूढ वगैरे अर्थ सापडूच नये संदर्भाला स्पष्टीकरण कवितेत नसावा निसर्ग कवितेत नसावे दुःखाचे डोंगर नकोत आनंदाचे चित्कार नकोत मनाचे हुंकार नकोत जातीधर्माचे अन्याय नसावी जगण्याची भौतिकता नसावे मोहाचे आगार नसावी प्रणयाची धुंदी नसावा विरह एवढ सगळ नसल्यावर मग उरेल काय ?? उरेल असंबंध शब्दांची मांडणी वेडीवाकडी मुक्त धुंद अव्यक्त भ्रमांचा मोठा नद वाहेल एका कवितेच्या पात्रात कुणी वेडा म्हणेल कवीला पण डोक्यातल्या विचारांवर अंमल कुणाचा हे कुणाच्या बापाला सांगण शक्य नाही विचारांची साखळी अमुक एकामागे एकच का येते ? आहे कुणाकडे उत्तर?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1357 views

💬 प्रतिसाद
अ
अभिजीत अवलिया Fri, 01/19/2018 - 15:21 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 01/20/2018 - 06:44 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Sat, 01/20/2018 - 08:05 नवीन
सही है...खासंच!
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 01/21/2018 - 04:42 नवीन
वेडा रे वेडा! ;-) कविता आवडली हेवेसांनल.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 21 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 22 hours ago
  • सुंदर !!
    2 days 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा