Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

तरही गज़ल : या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला

व — विशाल कुलकर्णी, Tue, 01/16/2018 - 11:35
आज आमच्या एका व्हाट्सएप ग्रूपवर क्रांतिताईने (क्रांति साडेकर) दिलेल्या एका ओळीवर (तरही) लिहीलेली ही गज़ल ! ताईने दिलेली ओळ होती... या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला ********************* नाव कुठल्या ईश्वराचे घ्यायचे नव्हते मला चाल तू रस्ता तुझा नियती पुन्हा म्हणते मला तू नको सांगू गड्या वागायचे आता कसे बुद्ध नसलो मी तरीही एवढे कळते मला रोज मरणाची नव्याने कारणे मी शोधतो चक्र जन्माचे निरंतर पाशवी छळते मला थांबता चौकात गाडी पोर कोणाचे रडे भूक त्या डोळ्यातली पाहून धडधडते मला बा निसर्गा का असा छळवाद तू रे मांडला? बरसणे त्या पावसाचे फक्त आठवते मला ओळखीचा चोर कोणी मान अलगद कापतो त्याच खांद्यावर कधी मी स्फुन्दलो गमते मला संपला रस्ता विशाला चल नव्या वाटा धरू या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला © विशाल कुलकर्णी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7866 views

💬 प्रतिसाद
प
पद्मावति Tue, 01/16/2018 - 12:14 नवीन
सुरेख!!
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Tue, 01/16/2018 - 12:27 नवीन
खूप छान! आवडली..
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 01/16/2018 - 13:35 नवीन
वा! तरही गजल धागा मिपावर सुद्धा सुरू झाला तर मजा येईल
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 01/17/2018 - 10:38 नवीन
या निमित्ताने सगळे मान्यवर लिखण्या पारजतील. होउन जाउद्या मिपा आपलेच आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 01/17/2018 - 11:42 नवीन
खरोखर चांगली कल्पना आहे. मजा येईल.
  • Log in or register to post comments
व
विनिता००२ Wed, 01/17/2018 - 06:01 नवीन
मस्त रे! सकाळी सकाळी वाचून मन प्रसन्न झाले :)
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 01/17/2018 - 11:43 नवीन
धन्यवाद विनीता !
  • Log in or register to post comments
व
विनिता००२ गुरुवार, 01/18/2018 - 05:27 नवीन
काही मोजक्या मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड केलेली. रोज मरणाची नव्याने कारणे मी शोधतो चक्र जन्माचे निरंतर पाशवी छळते मला >> हा शेर सर्वांना फार आवडला :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 01/17/2018 - 07:13 नवीन
येक नंबर!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 01/17/2018 - 10:40 नवीन
सुरेख लिहीली आहे . जिओ विशाल पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 01/17/2018 - 11:45 नवीन
धन्यवाद बुवा ! मनःपूर्वक आभार मंडळी _/|\_
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 01/17/2018 - 19:24 नवीन
समयोचित
  • Log in or register to post comments
म
माधुरी विनायक गुरुवार, 01/18/2018 - 16:32 नवीन
खूप आवडला.. छान काव्य...
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 01/18/2018 - 17:00 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
प
पुंबा Fri, 01/19/2018 - 12:13 नवीन
अप्रतीम.
  • Log in or register to post comments
थ
थॉर माणूस Fri, 01/19/2018 - 19:46 नवीन
क्रमशः लिहायला विसरले का हो विकुभौ? :P बाकी आवडेश हे बाय डिफॉल्ट आहेच...
  • Log in or register to post comments
ज
जेडी Sat, 01/20/2018 - 06:55 नवीन
सुंदर, आवडली
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 01/23/2018 - 06:40 नवीन
मनःपूर्वक आभार मंडळी !
  • Log in or register to post comments
न
नाहिद नालबंद Mon, 10/20/2025 - 12:18 नवीन
या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला मला ही ओळ फार आवडली आहे ही ओळ तरही गझल लिहिण्यासाठी घेऊ का?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 21 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 22 hours ago
  • सुंदर !!
    2 days 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा