प्रश्न साधासाच होता...
प्रश्न साधासाच होता,
त्याने उत्तर टाळले..
आणि अबोलीचे फूल
तिच्या केसात माळले.
त्याचा रोजचाच खेळ,
चार दाणे पक्ष्यांसाठी..
पाखरांच्या नकळत,
त्याने हक्काने पाळले.
क्षणभर विसावला
जीव बकुळीच्या खाली..
सडे अनाम दु:खाचे
तिने पायाशी ढाळले.
आहे सुखाचा पाऊस,
डोळे भरले कशाने?
वेडे मन तुझे का ग
मृगजळास भाळले?
💬 प्रतिसाद
र
राघव
Tue, 01/16/2018 - 11:00
नवीन
माय.. खूप सुंदर लिहितेस गो! निरतिशय आवडले.
यानिमित्तानं तुझ्या काही जुन्या कविताही वाचल्यात परत.. छान वाटले. लिहित रहा! :-)
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Wed, 01/17/2018 - 07:23
नवीन
माय म्हटलंत, भरून पावले.
मनापासून धन्यवाद.
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Tue, 01/16/2018 - 12:23
नवीन
सुंदर !
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 01/16/2018 - 12:49
नवीन
...हे अगदी खास !!
- Log in or register to post comments
आ
आनंदयात्री
Tue, 01/16/2018 - 20:08
नवीन
वाह, कविता आवडली.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 01/17/2018 - 07:15
नवीन
अप्रतीम
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Wed, 01/17/2018 - 10:22
नवीन
आवडेश...
सुरेख जमली आहे
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Wed, 01/17/2018 - 15:52
नवीन
पैजारबुवा, अ.आ., स्नेहांकिता, आनंदयात्री, विशाल कुलकर्णी सर्वांना धन्यवाद.
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 01/17/2018 - 17:13
नवीन
खूप सुंदर कविता!
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/18/2018 - 15:40
नवीन
आवडली कविता.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
माधुरी विनायक
गुरुवार, 01/18/2018 - 16:27
नवीन
...फक्त त्यांची उत्तरं सापडणं दुरापास्त होत जातं काही वेळा..
सुरेख कविता...
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Sat, 01/20/2018 - 13:48
नवीन
पैताई, बिरुटे सर, माधुरी..... धन्यवाद.
- Log in or register to post comments
न
नाखु
Sun, 01/21/2018 - 10:02
नवीन
शेवटचं कडवं खास
नाखु वाचकांचीही पत्रेवाला
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sun, 01/21/2018 - 19:35
नवीन
आवडेश.
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Fri, 02/02/2018 - 08:02
नवीन
नाखु, मुवि. __/\__
- Log in or register to post comments
M
mr.pandit
Sat, 02/03/2018 - 05:38
नवीन
अप्रतिम अगदी
- Log in or register to post comments