Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

प्रीती तुझ्यावरी पण...

अ — अत्रुप्त आत्मा, Sat, 01/13/2018 - 08:34
प्रीती तुझ्यावरी पण,समजे मलाच नाही. या अनाकलनाचा,मी काय अर्थ घ्यावा? शब्दात सांगताना,उरते मनात काही. या गूढ शांततेचा,मी काय अर्थ घ्यावा? एका किनारी तूही ,दुसय्रास स्पर्श माझा. मधल्या प्रवाहितेचा,मी काय अर्थ घ्यावा? मोडून एक काठ,वळते नदी जराशी. मग शांत त्या तळाशी,कोठून सूर द्यावा? जमले मनावरी हे, शेवाळ दाट सारे. गहिरे कसे म्हणू मी?निसटंताचं अर्थ व्हावा! आता मनावरूनी, सोडून देतं सारे. दिसली फुले जरी ही,निरं-माल्य अर्थ व्हावा! सोडून काय देऊ? सारेच क्षणभराचे. हे रोजचेच आहे, साधाच अर्थ घ्यावा. थांबवू कशास मग मी? या नित्य काव्यगतीला? या लख्ख वर्तमानी,आता विराम घ्यावा. ============================= अतृप्त..

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 9596 views

💬 प्रतिसाद
ए
एस Sat, 01/13/2018 - 09:57 नवीन
या कवितेचा काय अर्थ घ्यावा? कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 01/13/2018 - 10:39 नवीन
वाहव्वा अत्रुप्तजी आत्मा...!!! काय सुंदर कविता केलीत तुम्ही. कविता वाचता वाचता शेवटच्या ओळींपाशी येतोवर मन अगदी हेलावून गेलं होतं. खरंच अगदी टची कविता.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 01/13/2018 - 12:26 नवीन
वाहव्वा प्र चेट्सजी अगोबा, काय सुंदर प्रतीपादन केलत तुम्ही. वाचता वाचता शेवटच्या ओळींपाशी येतोवर मन अगदी हेला(का)वून गेलं होतं. खरंच अगदी टच टचीत प्रतीसाद! Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 01/14/2018 - 07:30 नवीन
गुर्जेश, फुल्ल विडंबनाचा मसाला असलेली बुंदी पाडलिया तुम्ही. आता बघाच, थोडे दिवस वाट, उगवेल विडंबनाची पहाट.
  • Log in or register to post comments
व
वेशीवरचा म्हसोबा Sun, 01/14/2018 - 08:58 नवीन
कवितेच्या नावावरुनच कळते, ही जरा "वेगळ्या" धाटणीची कविता आहे.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 01/14/2018 - 10:33 नवीन
विराम कशाला घेताय? उलट तुमचे तांब्याधारी शिष्य हल्ली नाराज आहेत!
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 01/14/2018 - 13:00 नवीन
अतृत्प आत्मा एकदाचा व्यक्त झाला :) (@अतृ कविता आवडली हेवेसानल) त्यांना स्वतःस विराम घ्यायचा त्यांच्या ओळीवरून आणि त्यांच्या आंतरजालीय स्वभावा वरून वाटत नाही चुभू दे घे. शेवटच्या फुलांच्या निर्माल्याच्या शब्द कुणासाठी किती टची असू शकतो ते ओंजळ फुलांनी भरलीयना म्हणणार्‍या स्पृहा जोशींना कुणी तरी कळवावयास हवे . असो या निमीत्ताने स्पृहा जोशींची अलिकडे युट्यूबर ऐकलेली एक कविता. आतत्यांच्या ओळीवरून आणि स्वभावा वरून वा अतृत्प आत्मा एकदाचा व्यक्त झाला :) त्यांना स्वतःस विराम घ्यायचा असे
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 01/14/2018 - 13:02 नवीन
* युट्यूब लिंकेखालील ओळी अनवधानाने तशाच राहील्या , क्षमस्व.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 01/14/2018 - 13:20 नवीन
गुरुजींचे साहित्य प्रकाशित होवून अख्खा एक दिवस गेला पण अद्यापही "स्पा"चा प्रतिसाद नाही... पुर्वीचे मिपा राहिले नाही....
  • Log in or register to post comments
त
तृप्ति २३ Mon, 01/15/2018 - 19:29 नवीन
कविता आवडली. Marathi Kavita Aathavan
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 01/16/2018 - 07:43 नवीन
सोडून काय देऊ? सारेच क्षणभराचे. हे रोजचेच आहे, साधाच अर्थ घ्यावा. हे खास आवडले! :-) या रचनेवरून बर्‍याच आधी लिहिलेला एक शेर आठवला.. तसवीर नजरोंमें हों.. पर काग़ज पर न आए.. लब्ज़ ज़हनमें हों.. पर ज़ुबांपर न आए.. तड़प दिलमें हों.. पर किसीकी समझ़में न आए.. ... शायद प्यार की राहपर पहला कदम है!! राघव
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 01/16/2018 - 08:57 नवीन
दिल गार्डन गार्डन कविता..!
थांबवू कशास मग मी? या नित्य काव्यगतीला?
कोणतीच गती किंवा आवेग थांबवू नये, हे आम्ही पामरांनी सक्षात कवी 'कलश' यांना सांगावे काय ???
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 01/16/2018 - 11:21 नवीन
दुत्त दु त्त! Image removed.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 01/16/2018 - 11:47 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 01/17/2018 - 08:17 नवीन
कवितेचे शिर्षक आणि लेखकाचे नाव वाचून... प्रीती तुझ्यावरी पण,डोळा दुसरीवरी. तिसरीस भेटण्याचा,मी काय अर्थ घ्यावा? किंवा... प्रीती तुझ्यावरी पण, जिलबीची चव भारी, तांब्या विसळण्याचा, मी काय अर्थ घ्यावा? अशी काहीशी असेल या अपेक्षेने आलो होतो पण इकडे बुवांना इश्काची इंगळी डसलेली दिसली लगेरहो... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 01/17/2018 - 08:51 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 01/17/2018 - 09:38 नवीन
गुर्जींनी अत्रुप्त, अता असं न लिहीता काव्य केलं? अरेरे, आमच्यावेळी असं नव्हतं! नेहमीपेक्षा हटके असल्याने अर्थातच दहापैकी दहा होते, शुद्धलेखनाच्या चुका केलंनीत म्हणून साडेनऊ.
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 01/17/2018 - 13:58 नवीन
गृहस्थाश्रमात रंगल्या चांगल्या पुरावा म्हणून ही कविता वाखू ठेवत आहे. अनवट वाटेवरील कविता वाचक चुकार नाखु
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 01/23/2018 - 03:46 नवीन
सर्वांसी धन्यवादम् !
  • Log in or register to post comments
आ
आरवी Sun, 03/31/2019 - 13:54 नवीन
व्वा गुर्जी, कविता आवडली. ही कविता 'तिच्या' दृष्टीकोनातून पाहण्याचा माझा एक प्रयत्न.... प्रीती तुझी मला रे कधी ना कळून आली, तव गूढ शांततेचा अंदाज मज न यावा । निःशब्द तू ही मी ही, अबोल भाव सारे, अव्यक्त प्रीतीचा ह्या, धागा कसा जुळावा? कालांतरे अबोल जरी प्रीत ना निमाली, जीवनप्रवास वाटा का भिन्न भिन्न व्हाव्या? या लख्ख वर्तमानी, संपे विराम आता, मी कार्यमग्न तरीही, आठव तुझाच यावा ।
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 21 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 22 hours ago
  • सुंदर !!
    2 days 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा