ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग ३ - ब्रान्तेइ स्रेइ मन्दिरातील शिल्पे.
अंगकोर वाटच्या आग्नेय दिशेकडे सुमारे २६ किमी दूर असलेले हे मन्दिर त्यातील हिंदु देवदेवता आणि त्यांच्या कथा सांगणार्या कोरीव शिल्पांसाठी प्रवाशांचे एक मोठे आकर्षण आहे. कोरीव कामाला अत्यंत उपयुक्त अशा तांबड्या दगडातून ते बांधलेले असून त्या दगडाचा पुरेपूर उपयोग शिल्पांच्या निर्मितीसाठी केला गेल्याचे जाणवते.
मंदिराच्या पडझड झालेल्या दगडांखाली सापडलेल्या स्थापना शिलालेखावरून असे कळते की शक ८८९ (९६७ इसवी) वर्षामध्ये ह्या मंदिरामध्ये शंकराच्या पिंडीची स्थापना झाली आणि त्याला ’त्रिभुवनमहेश्वर’ असे नाव देण्यात आले. राजेन्द्रवर्मन् आणि त्याचा अल्पवयीन मुलगा जयवर्मन् पाचवा ह्या राजांच्या काळामध्ये राजगुरु असलेल्या यज्ञवराह नावाच्या ब्राह्मणाने आणि त्याचा धाकटा भाऊ विष्णुकुमार ह्या दोघांनी ह्या मंदिराची स्थापना केली, त्याला उत्पन्न नेमून दिले आणि मंदिराचे प्रशासन कसे चालावे ह्याच्या सूचना शिलालेखाद्वारे देऊन ठेवल्या.
मंदिराचे बाह्यदर्शन आणि त्याचा अन्तर्भाग असे दिसतात -

मंदिरामध्ये अनेक खरी आणि खोटी दारे आहेत आणि त्यांना स्वत:ची lintels आणि pediments आहेत. (Lintel म्हणजे दाराच्या चौकटीवरील शिलाप्रस्तर आणि Pediment म्हणजे दाराच्या चौकटीवरील त्रिकोणी भाग, ज्यावर छप्पर आधारलेले असते.) ह्यांच्यावर अनेक पुराणकथा कोरल्या आहेत. त्यांपैकी काही आता पाहू.







- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments