लिव इन आणि समाजाची मानसिकता
"अग ते माझ्या शेजारच्या flatमध्ये राहायला आलेलं जोडपं आहे ना त्याचं लग्न नाही झालेलं."
"काय सांगतेस काय? तुला बऱ्या असल्या बातम्या मिळतात."
"अग, काल मी घरी येत असताना ती भेटली जिन्यात. तर विचारल तुझा नवरा काय करतो? म्हणाली तो माझा नवरा नाही काही. आम्ही अजून लग्न नाही केलेलं असंच राहातो. कमाल आहे न? काय बोलणार यावर? मी आपली गपचूप घरात शिरले माझ्या."
'काय सांगतेस? स्पष्ट सांगितलं तिने?"
दोन मैत्रिणी बागेत आपापल्या मुलांना खेळायला सोडून गप्पा मारत बसल्या होत्या. मी नेमकी त्यांच्या बाजूच्याच बाकावर बसले होते त्यामुळे त्यांचा संवाद एकू आला आणि मनात विचार आला.. हे लिव इन नातं इतक का बर अस्वीकारार्ह्य असावं अजूनही? या दोघींची मुलं लहान आहेत म्हणजे या देखील जेमतेम तिशीच्या आतल्या असणार. ती नवीन आलेली शेजारीण देखील साधारण याच वयातली असू शकते. मग तरीही ती अशी लिव इन मध्ये का राहात असावी असा विचार या का नाही करत. थोडे नकारार्थी विचार का आहेत यांचे?
समजा एक मुलगा आणि एक मुलगी यांनी लग्न न करता रहायचे ठरवले तर त्या बाबतीत समाजाची नकारार्थी भावना का असावी? त्या मुलांच्या पालकांचे मत खूपच महत्वाचे असणार. पण मग तो त्या दोन कुटुंबांचा प्रश्न ठरतो. अनेक सोसायटीजमध्ये लिव इन नातं असणाऱ्या जोडप्याला घर भाड्याने द्यायला कोणी तयार नसते. अस का असावं? जर ते जोडपं सभ्यता पूर्वक रहात असेल तर इतरांना त्यात हरकत घेण्यासारखं काय असाव?
माझ्या एका मैत्रिणीने प्रेम केलं आणि वर्षभरातच लग्न केलं. तीन वर्ष झाली असतील-नसतील आणि तिचं आणि तिच्या नवऱ्याच पटेनास झालं. अगदीच सतत आणि टोकाची भांडण व्हायला लागली तेव्हा तिने घटस्फोट घेण्याचं ठरवलं. तशी ती चांगल्या कंपनीमध्ये काम करत होती आणि भरपूर पगार देखील होता. पण खुद्द तिच्या आई-वडिलांनी सांगितलं अग अस एकदम घटस्फोट नको घेउस. सुधरेल तो हळूहळू. लग्न केलं आहेस न? मग थोडं सहन करायला शिक. तिच्या निर्णयात तिला फक्त मानसिक बळ हवं होत. पण तिच्या बाजूने तेव्हा कोणीच उभं राहिलं नाही. आज तिच्या लग्नाला चौदा वर्ष झाली आहेत. दहा वर्षाचा मुलगा आहे. ती आणि नवरा एकमेकांशी अजिबात बोलत नाहीत. मात्र केवळ लग्न केलं आहे म्हणून एका छताखाली रहातात. ती अनेकदा म्हणते की जर त्याच्या बरोबर लग्नाअगोदर राहात असते तर कदाचित लग्नच नसत केलं अशा माणसाबरोबर.
एक अजून घटना अगदी चांगली माहितीतलीच. दोघ मुलगा-मुलगी एकमेकांच्या प्रेमात होते. मुलगी अजून शिकत होती त्यामुळे त्यांना तितक्यात लग्न करायचं नव्हत. मात्र कुटुंबाच्या आग्रहामुळे दोघांनी लग्न केल. शिक्षण चालू असेपर्यंत मुलीने पुढे काय करायचं याचा फारसा विचार केला नव्हता. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी तिने एका जाहिरात कंपनीत इंटरव्ह्यू देला आणि तिला खूप चांगली नोकरी मिळाली. तिचा performance इतका चांगला होता की तिला तिच्या कंपनीने वरची पोस्ट दिली. मात्र त्यासाठी तिला दुसऱ्या शहरात जावं लागणार होत. मात्र सासरच्यांनी नाही म्हंटल त्यामुळे तिला ती ऑफर घेता आली नाही.
अशा काही घटना पहिल्या किंवा ऐकल्या की वाटत की लग्नाअगोदर एकमेकांना समजून घेण कितीतरी महत्वाच असत. दोघांचे स्वभाव, आवडी-निवडी, पुढील करीयर प्लान्स सगळ समजून घेण आवश्यक असत. केवळ 'आवडला/आवडली' म्हणून लग्न करून टाकलं; हे अलीकडच्या काळात थोडं अवघड आहे.
अर्थात इतकं प्रक्टीकल असावं का? हा देखील चर्चेचा विषय होऊ शकतो. लिव इन मधील मुला-मुलीच्या पालकांचा याबद्दल विचार/मत देखील महत्वाच आहे. मुख्य म्हणजे लिव इन म्हणजे 'लग्न न करता एकत्र राहाण'. मग जर पुढे पटलं नाही तर मग दुसरा पार्टनर का? आणि अस पटेपर्यंत किती लिव इन नाती? असे अनेक प्रश्न उभे राहू शकतात. अलीकडे pre-marrage councelling देखील असतच. पण 'अलीकडची पिढी' अस म्हंटल तरी या मुलांना देखील मन-भावना असतातच न. त्यामुळे जर पालकांनी थोडा विश्वास दाखवला तर ही मुलं सतत धरसोड वृत्तीने नक्कीच वागणार नाहीत. त्यामुळे लिव इन नात्याकडे नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नये अस मला वाटत.
💬 प्रतिसाद
(72)
ट
टवाळ कार्टा
Mon, 01/15/2018 - 13:47
नवीन
यांच्याशी असहमत, बऱ्याचदा लोकांच्या सवयी समजायला वेळ जातो, लिव्ह-इनमुळे एकमेकांच्या सवयी कश्या आहेत आणि मुख्य म्हणजे तो किंवा ती एक माणुसम्हणून कशी आहे ते समजू शकते, काही झाले तरी एखादी व्यक्ती सदासर्वकाळ सद्गुणी असल्याचे नाटक नाही करू शकत
बाकी फसवणूक लग्नानंतर होण्यापेक्षा हे बरे, आणि तसेही एखाद्या पर्यायाचा चांगला वापर करण्यापेक्षा त्यातून आपला फायदा कसा होईल अशीच मानसिकता असेल तर लग्न असो वा लिव्ह-इन, फरक नाही
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 01/15/2018 - 14:26
नवीन
अरुण जोशी,
नाही हो. जनावरं बलात्कार करीत नाहीत. त्यामुळे विवाहांतर्गत बलात्कार होतोय वगैरे तक्रारींना जनावरी प्रणयांत वाव नाही. पटलं तर खाटलं नाहीतर फुटलं.
======================
माणूस हा जनावरापेक्षा उच्च मानावा का?
======================
मानवी प्रणय हा जनावरी प्रणयापेक्षा उच्च दर्जाचा मानावा का? हो वा नाही हे कशावरून ठरवायचं? काही निकष आहेत का?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Mon, 01/15/2018 - 17:34
नवीन
जनावर शब्दाचे दोन अर्थ होतात. १. मनुश्येतर जैविक एंटीटी २. नीच मनुष्य.
तुम्हाला दुसरा अभिप्रेत आहे असं समजून मी लिहिलं कि अगदी तसं नसतं. असं दिसतंय कि तुम्हाला पहिला अर्थ अभिप्रेत आहे.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 01/16/2018 - 14:31
नवीन
लिव्हिनात राहणारे थोर लोकं असल्याने नीच मनुष्ये हा अर्थ संभवत नाही.
-गा.पै.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Wed, 01/17/2018 - 13:30
नवीन
लिविनची चिकित्सा करणारांनी बाई ठेवायची प्रथा कशी आली, असते याचा विचार करावा. मॉडेल सेम नसलं तरी सिमिलर आहे.
- Log in or register to post comments
ए
एमी
Wed, 01/17/2018 - 13:47
नवीन
कॉरेक्ट!
४००००+ रुपये महिन्याला देऊन बाई मिळवावी आणि ठेवावी लागण्याइतके हुच्च सेक्स अपील असणाऱ्यांनी आपापला खर्च आपण उचलून एकत्र राहणाऱ्यांची चिकित्सा करावी!
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 01/18/2018 - 06:41
नवीन
१. कोणी चिकित्सा करावी.
२. चिकित्सेचा खर्च कसा आपसांत वाटून घ्यावा
३. किती रु द्यावेत
४. सेक्स अपिल किती आहे
इ इ गौण आहे.
- Log in or register to post comments
ए
एमी
गुरुवार, 01/18/2018 - 08:11
नवीन
गौण कसे काय?
चिकित्सा करणारे मजबुरी का नाम किंवा अंगूर खट्टे असू शकतात :-P
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 01/18/2018 - 08:46
नवीन
लिविन वाल्या पोरी चिकण्या असतात नि लग्नावाल्या बायका नसतात, असं काही नसतं ना हो.
- Log in or register to post comments
ए
एमी
गुरुवार, 01/18/2018 - 09:13
नवीन
मी बायकांच्या नाही मतप्रदर्शन करणाऱ्या पुरुषांच्या सेक्स अपिलबद्दल बोलतेय.
इथे लिव्हिनला नावे ठेवणाऱ्या कितीजणांना खात्री आहे कि आपल्याकडे पैसे नसते तरी आपली बायको आपल्याशी TTMM असलेलं लिव्हिन करायला तयार झाली असती/होईल?
तुम्ही जे उदा दिलंय त्यात किंवा मी जे पाहिलेत त्यात किंवा बाई ठेऊ शकणाऱ्या पुरुषात नक्कीच काहीतरी अपील असेल ना कि त्यांना लग्न न करता बाई मिळाली...
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 01/18/2018 - 10:10
नवीन
एखादी बाई अगदी फुक्कट मिळेल, एखादी बाई कशानंही मिळणार नाही. तेच पुरुषांचं. त्याचा नि तुमच्या प्रश्नाचा संबंध काय?
- Log in or register to post comments
ए
एमी
Wed, 01/31/2018 - 01:23
नवीन
पैशासाठी लग्न करणाऱ्यांनी देहविक्रीला नावं ठेवू नयेत; तुम्ही खासगी क्षेत्रात आहात आणि ते सार्वजनिक क्षेत्रात, एवढाच फरक!
-मुगाबे
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 01/18/2018 - 06:47
नवीन
त्या ज्योतीबाई उत्तरे देत नाहीत का? यनावाला टाईप धागा पेरून जातात? काय राव, हे पुरोगामी लोक रॅशनॅलिस्ट म्हणवले जातात मग यांना संवादाचं वावडं का?
=============
त्या यनावालांनी तर हाईट केली होती. इथे मला उपस्थित केलेले प्रश्न उत्तरायैतकं डोकं मला नाही असं म्हणत पुरोगामी विचार, ते ही लोकांच्या डोक्यांच्या फंक्शनिंगवर टिका करणारे मांडले होते. काय अर्थ आहे असल्या गोष्टींना?
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
गुरुवार, 01/18/2018 - 07:05
नवीन
arjunjoshi123,
मी उत्तरे देते. जर आपण सुरवातीचे प्रतिसाद वाचले असाल तर ते आपल्या लक्षात येईल. परंतु त्यानंतर माझ्या लक्षात आले की काही सदस्यांची या धाग्याच्या माध्यमातून आपापसात चर्चा होते आहे. मजणून मी फक्त वाचक ही भूमिका घेतली. माझ्या मते मी काही लिहू शकेन असे अजून मुद्दे नाहीत. मूळ लेखामध्ये आणि नंतर प्रतिसादांमध्ये मी जे लिहिले आहे ते माझे मत आहे. मग परत परत वाद घालण्यात काहीच हशील नाही असे मला वाटले म्हणून मी प्रतिसाद देणे थांबवले.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 01/18/2018 - 07:15
नवीन
ओके
मला तर असं काही वाटलं नाही. वेगवेगळे अस्पेक्ट्स मांडलेत विषयाचे लोकांनी.
------------------
नि मी नाव घेऊन तुम्हाला विवाह नि लिविन मधे संरचनात्मक फरक काय आहेत असं विचारलं तेव्हा तिथे काहीतरी लिहिणं अपेक्षित होतं.
----------------
इतरत्र नुस्तं वाचन केलं (वा नाही) तरी चाललं असतं.
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
गुरुवार, 01/18/2018 - 10:27
नवीन
मी माझी मतं मंडली आहेत. परत वेगळ्या शब्दात तेच का लिहावं मी? म्हणून परत तेच लिहीण टाळलं इतकंच.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 01/18/2018 - 10:42
नवीन
ओके.
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
गुरुवार, 01/18/2018 - 06:59
नवीन
लिविन का चालू झालं? त्याचे फायचे अनेक आहेत.
१. उशिरा लग्न झाल्या सेक्स करायची इच्छा फार काळ दाबून ठेवणे अवघड झालं. मागची पिढी १४-१८-२० वयात लग्न करे. आत्ता ते २८-३५ असं झालं आहे एका विशीष्ट क्लासमधे.
२. शहरात नोकरी वा शिक्षणासाठी अनेक वर्षे एकटं राहणं अनैसर्गिक आहे. मनुष्य कुटुंबात राहतो. शिक्षण नि नोकर्यांमुळे माणसाचं १३ वी ते लग्न (मिलिटरी स्कूल असेल तर अजून पूर्वी) या काळात कुटुंबांचा संबंधच संपला.
३. वेगळे राहण्याचे खर्च वाढतो. एकत्र राहण्याने इकॉनॉमी ओफ स्केल येते.
४. एकत्र राहण्याचे बरेच अन्य फायदे आहेत. आजारी असताना सुश्रुषा.
५. जोडीदार, लग्न हे निर्णय / कामे आयुष्यातली सर्वात शेवटची केलेली आहेत. पण एक नैसर्गिक जोर असतोच. मनुष्य सामान्य असेल तर त्या काळात प्रेम होतं, भावना उत्पन्न होतात, इ इ
६. बोजड कायदे कोणालाही नको असतात. लग्न ही एक कायदेशीर बाब जास्त आणि व्यक्तिगत कमी असं झालं आहे. लिविन त्याची पळवाट आहे.
७. योनिशुचिता इ इ कल्पना मागास मानल्या जात आहेत. मुलाने वा मुलिने प्रेम, राडे, लफडे, चूक, पाय घसर्णी इ इ केले तर समाजाची प्रतिक्रिया सौम्य झाली आहे. त्यामुळे लिविन वा तत्सम संकल्पनांमधला मुख्य अडसर दूर झाला आहे.
- Log in or register to post comments
ए
एमी
गुरुवार, 01/18/2018 - 08:16
नवीन
हम्म हा प्रतिसाद चांगला आहे.
===
माझ्या ओळखितली ४ लिव्ह इन जोडपी होती २००२ ते २०१० काळात. पण मी कढीसाग वैयक्तिक प्रश्न विचारले नाहीत त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त सांगू शकत नाही.
- Log in or register to post comments
ए
एमी
गुरुवार, 01/18/2018 - 08:17
नवीन
कढीसाग = कधीच
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 01/18/2018 - 15:06
नवीन
मी पाहिलेल्या गोष्टी --
लिव्ह इन हि बहुतांश वेळेस एक तात्पुरती सोय म्हणून दिसते. सुरुवातीला आपण मुक्त/ आधुनिक आहोत हे लोकांना सांगायला किंवा दाखवायला जोडपी लिव्ह इन मध्ये जातात. काही जण थ्रिल म्हणून पण लिव्ह इन मध्ये जातात.
किंवा करियर मध्ये व्यस्त असल्यामुळे लग्नाच्या जबाबदारीत पडण्याची भीती नको वाटते म्हणूनहि काही लिव्ह इन मध्ये जातात.
बरेच पुरुष आणि काही स्त्रिया बांधिलकी( कमिटमेन्ट) नको म्हणून सुरुवातीला लग्नाला पर्याय म्हणून याकडे पाहतात आणि काही काळाने काही पुरुष आणि बऱ्याचशा स्त्रिया बांधिलकी हवी म्हणून अपेक्षा करू लागतात.
काही वर्षे गेल्यावर एक तर ते विभक्त होतात किंवा लग्न करतात.
ज्यांचे पटत नाही किंवा करियरच्या रेट्यात जमत नाही किंवा दोघांतील एकाला जरी बांधिलकी नको असेल तरी ते विभक्त होतात.
आणि ज्यांना एकमेकांबद्दल ओढ आणि प्रेम वाटतं अशी जोडपी लग्न करतात.
मी आतापर्यंत पाहिलेल्या/ऐकलेल्या लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यानी मुले होऊ दिलेली नाहीत. किंवा जेंव्हा आता आपण जबाबदारीला तयार झालो अशा जोडप्यांनी लग्न करणे पसंत केले.( काही लोकांचे लिव्ह इन मध्ये राहण्याचे थ्रिल संपले किंवा त्यांना मिळणारा "टी आर पी" कमी झाला असावा किंवा लिव्ह इन मध्ये राहताना येणाऱ्या कायदेशीर अडचणी कटकटीचा वाटू लागल्या असाव्या).
थोडक्यात लिव्ह इन या क्षणाला तरी एक तात्पुरती सोय आहे असेच मला वाटते आणि बहुसंख्य जोडपी आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी/ मुलांच्या भविष्यासाठी लग्नाद्वारे कायद्याचा/समाजाचा आधार घेताना दिसतात.
एकंदर लिव्ह इन चा बाऊ करण्याची गरज नाही किंवा त्याला जास्ती भाव देण्याचीही गरज नाही.
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Tue, 01/23/2018 - 04:46
नवीन
सुबोधजी आपल्या मतांशी मी पूर्ण सहमत आहे
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2