Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

इतिहासाचं वर्तमान

अ — अनन्त्_यात्री, गुरुवार, 01/04/2018 - 05:05
वज्रलेप इतिहासावर उभा आश्वासक वर्तमान? निळ्या-भगव्या दगडांचे भागधेय सेम भगव्या-निळ्या डोक्यांवर बिनचूक नेम खळ्ळ खटॅक- खळ्ळ खटॅक : किडुकमिडुक चक्काचूर भक्क पिवळा आगडोंब : काळा धूर सर्वदूर १४४ कलमाच्या निगराणीला खाकी बंदूकदस्त्यांचे कुंपण पांढर्‍या बगळ्यांच्या अश्रुंचे इथेतिथे मतलबी शिंपण आलबेल इतिहासखपली कोण आत्ता खरवडतंय? सांभाळा, खाली आरपार सडकं वर्तमान वाहतंय

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1822 views

💬 प्रतिसाद
प
पगला गजोधर गुरुवार, 01/04/2018 - 07:45 नवीन
चांगला प्रयत्न.... फक्त एकांगी वाटू नये म्हणून खालील सुझाव....
पांढर्‍या बगळ्यांच्या अश्रुंचे इथेतिथे मतलबी शिंपण
पांढऱ्या बरोबर, भगवा हिरवा निळा सुद्धा बगळ्यात...
आलबेल इतिहासखपली कोण आत्ता खरवडतंय?
बाबरी मस्जिद, पद्मावती अश्या अनेक खपल्या आहेत, तूर्तास इतकेच....
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 01/05/2018 - 05:09 नवीन
ऐतिहासिक जखमा कुरवाळात राहिल्या की सडणारच सडणार्‍या जखमा झाकून ठेवल्या की वाढणारच हळुहळु मग एक दिवस ही कीड सार्‍या अंगभर पसरणार त्यावेळी गिधाडांच्या स्वाधिन होण्याशिवाय गत्यंतर नसणार सडका भाग कापायला मोठ्या विवेकाची आणि धैर्याची गरज आहे पण विवेकाचा गळा घोटण्यामधेच आमचे सारे शौर्य सामावलेले आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Fri, 01/05/2018 - 06:13 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
प
पुंबा Fri, 01/05/2018 - 07:27 नवीन
अनंत यात्री आणि पैजारबुवा, विषण्ण करणारी काव्ये दोन्हीही. दंडवत स्विकारावा.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 01/05/2018 - 14:21 नवीन
अनन्त्_यात्री, कविता ठीकठाक. पण आलबेल इतिहासखपली म्हणजे काय? काश्मिरी हिंदूंच्या जखमांवर खपली धरली आहे काय? माझी गत काश्मिरी हिंदूंसारखी होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे? केरळातला मणी नामे कम्युनिस्ट नेता रास्व संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या केल्याचं जाहीर सभेत उघडपणे सांगतो. मग जखमांवर खपली धरेल कशी? कवितेचा आशय सेक्युलर अॅपॉलॉजिस्ट आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 22 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 23 hours ago
  • सुंदर !!
    2 days 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा