Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा

ग
गावठी फिलॉसॉफर
Sat, 12/30/2017 - 14:47
🗣 4 प्रतिसाद

"इतिहासाला जो विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही" हे सत्यवचन आहे. इतिहास अनेक अनेक प्रकारे समजू शकतो. त्यासाठी अनंत साधने आहेत. कादंबरी, शोधग्रंथ, निबंधमाला ही जनमानसात रुजलेली आणि विस्तृतपणे इतिहास समजण्यास मदत करणारी साधने.

इतिहास अध्ययनाचे आणि वाचकांचे अनेक प्रकार असू शकतात. त्यापैकी इतिहास प्रेमी, इतिहास अभ्यासक आणि इतिहास संशोधक याप्रकारे एक वर्गवारी होऊ शकते. इतिहासप्रेमी हे इतिहास वाचनासाठी कादंबरी, लेखमाला, काही प्रसिद्ध ग्रंथांचा आधार घेतात. इतिहास अभ्यासक हे बखरी, ग्रंथ, डायरी, पत्रे, शिलालेख, पुरातन नकाशे यांचा आधार घेतात. तर इतिहास संशोधक हे अपरिचित इतिहासाची उकल करण्यासाठी अनेक प्रकारचे संशोधन करून ग्रंथ लिहतात. सत्य जगासमोर मांडून इतिहासात भर घालतात.

सामान्य वाचक हे घटनेतील कल्पकता आणि मनोरंजन यावर भर देतात. आणि त्यांना जर इतिहास वाचायचा असेल तर ते कादंबरी आणि लेखमलेंचा उपयोग करतात. कादंबरी म्हणजे इतिहास होऊच शकत नाही. कादंबरी म्हणजे कल्पकता!!! परंतु इतिहास हा कल्पकता आणि मनोरंजन किंवा जर तर वर कदापि पूर्ण होऊ शकत नाही तो पुराव्यांशिवाय अपूर्णच..!!!!!

मराठयांच्या इतिहासातील सुवर्णनकाळ समजला गेलेला शिवकालीन आणि शंभूकालीन इतिहास हा त्यावेळी लिखित स्वरूपात आढळत नाही. समकालीन पत्रे, शिलालेख, सनदी यावरून इतिहास यावरूनच समजून घ्यावा लागतो. मराठयांच्या इतिहास लेखनाला बखर स्वरूपात लिहायला उशिराच सुरवात झाली. त्यामुळे जनमानसात रुजलेला इतिहास हा चुकीचा आणि कल्पक आशा स्वरूपात अवतरला.

त्यापैकी शिवपुत्र शंभू राजेंचा इतिहास हा सर्वात वाईट आणि चुकीच्या पद्धतीने जनमानसात अवतरला. गागाभट्ट यांनी शंभूराजांना आपला समयनय हा ग्रंथ अर्पण केला होता. त्यात ते म्हणतात, "ज्याच्या पराक्रमाने दही दिशा उजळून निघतील असा हा संभाजीराजा संतुष्ट होओ!". आणि त्याच प्रमाणे दही दिशा आपल्या कर्तृत्वाच्या तेजाने उजळवून टाकणारे शंभूराजे मात्र काही कल्पिक कादंबऱ्या, नाटके आणि भाकडकथा यांच्या मुळे जनमानसात मालिन प्रतिमेचे झाले.

शंभूराजांचा संशोधनात्मक खरा इतिहास जगासमोर आणण्याचे अग्निदिव्य वा. सी. बेंद्रे आणि डॉ कमल गोखले यांनी केले. आणि तदनंतर अनेक संशोधकांनी आणि लेखकांनी त्यामध्ये भर टाकत सत्य इतिहास जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला. खरा इतिहास समोर यायला वेळ लागला. परंतु तो सामान्य वाचकांना वाचणे थोडेफार कठीणच होते. कारण त्यासाठी अनेक साधनांचा आधार घेण्याची गरज होती.

सामान्य लोकांना शंभूराजांचे चरित्र समजावे. यासाठी अनेक पुस्तके आली. आणि त्यामध्ये यावर्षी माज्या हातात पडले ते ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा हा अमूल्य ग्रंथ. डॉ सदाशिव शिवदे सरांनी छ. संभाजीराजे यांचा सत्य इतिहास आपल्या याच ग्रंथात मांडला आहे. अतिशय बारीकसारीक पुराव्यासाहित त्यांनी एक सर्वोत्तम शंभूचरित्र लिहले आहे. १३ प्रकरणे असलेल्या या ग्रंथात अनेक नकाशे, पत्रे, सनदी यांचे योग्य प्रकारे विश्लेषण केले आहे. शंभूराजांशी निगडित असणाऱ्या सर्व बारीक सारीक गोष्टी जशे की नातेवाईक, विविध स्थळे, पत्रिका यांचे पुराव्यासाहित विश्लेषण केले आहे. त्यांनी केलेला राजकारभारातील प्रवेश, लढलेल्या लढाया, केलेला राजकारभार, राजकारणातील मुस्तद्देगिरी आणि त्यांचा शेवट इतपर्यंत सर्व पुराव्यानिशी माहितीचे सादरीकरण या ग्रंथात आढळते.

शंभूराजेंचा चुकीचा इतिहास आणि मालिन झालेली प्रतिमा योग्य पुरव्यनिशी खोदून काढण्याचे काम ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा या ग्रंथात केलेले आहे. इतिहासातील सर्व समकालीन पुराव्याचे संदर्भ या ग्रंथात वेळोवेळी आढळतात. आणि चुकीचे पुरावे कसे चूक आणि सत्य काय हे पटवून दिले आहे.

इतिहासाची आवड असल्याने अनेक पुस्तके, कादंबऱ्या वाचल्या. परंतु माज्या शंभूराजांच्या सत्य इतिहासाचा खजिनाचा पुस्तकरूपी देण्याचा प्रयत्न शिवदे सरांनी आपल्या ग्रंथात केला आहे. कल्पकतेचा आणि जर तर चा कसलाही लवलेश नसलेला हा ग्रंथ आणि शंभूराजांचे चरित्र हृदयावर राज्य करू लागले. म्हणून या वर्षातीलच काय परंतु आयुष्यातील सर्वात आवडते पुस्तकरूपी ग्रंथ म्हणजे ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा...!!!!


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2546 views

🗣 चर्चा (4)
ख
खटपट्या Sat, 12/30/2017 - 20:19 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
प
पी. के. Mon, 01/01/2018 - 12:15 नवीन
मिसळपाव वरचा हा धागा वाचूनच हे पुस्तक घेतलं होत. बारीकसारीक पुराव्यांसह एक परिपूर्ण पुस्तक.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Tue, 01/02/2018 - 06:56 नवीन
उत्तम ओळख करून दिलीत, त्याबध्दल धन्यवाद. सद्या कमल गोखलेंचे पुस्तक वाचतो आहे. वा.सी. बेंद्रे यांनीच संभाजी राजांची समाधी शोधून काढली. मात्र त्यांचे पुस्तक वाचायचे राहून गेले आहे.मात्र आता नक्कीच मिळवून वाचेन.
  • Log in or register to post comments
ग
गावठी फिलॉसॉफर गुरुवार, 01/04/2018 - 05:54 नवीन
वा सी बेंद्रे आणि डॉ कमल गोखले यांचे ग्रंथ छान आहेत.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 10 hours ago
  • सुंदर !!
    3 days 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा