Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

किक भाग ३ ... झंस्कार

क
किल्लेदार
Fri, 12/29/2017 - 15:02
💬 16

Book traversal links for किक भाग ३ ... झंस्कार

  • ‹ किक भाग २ - नुन - कुन चे साम्राज्य...
  • Up
किक... भाग १ किक भाग २...नुन - कुन चे साम्राज्य... रंगदुम हे काही नकाशातले ठळक ठिकाण नाही, असायचे कारणही नाही. मग एक जुनाट डाक बंगला, एक लहानसे गेस्ट हाऊस आणि पाच-पन्नास घरटी असलेल्या या आडबाजूच्या ठिकाणी सुखासीन जीव आणायचाच कशाला? पुण्यातल्या एखाद्या प्रथितयश डायनिंग हॉल (किंवा खाणावळ म्हणा हवं तर)मध्ये जाऊन जेवताना जो फील येतो तसाच एखाद्या नावाजलेल्या पर्यंटनस्थळी येतो. पुढ्यात वीस-पंचवीस पदार्थ मोठ्या निगुतिने मांडून ठेवलेले असतात पण एवढ्या गजबजाटात धड एकाचाही पुरेपूर आस्वाद घेता येत नाही. ताटभर जेवूनही पोटभर जेवल्याचं समाधान काही मिळत नाही आणि शिवाय कुण्याच्यातरी लग्नाच्या पंगतीत (पैसे देऊन) जेऊन आलो असा विचारही डोकावून जातो. याउलट कधी साधी पण चविष्ट भाजी भाकरी जठराग्नीत स्वाहा करताना देखील ते “उदरभरण” न वाटता “यज्ञकर्म” वाटू लागते. पावसाळ्यातल्या एखाद्या दुपारी सिंहगडावर हा यज्ञ चालू असेल तर मग विचारायलाच नको. रंगदुम-पदुम प्रवास हा असाच आहे. इथे काही नावाजलेली भारंभार ठिकाणं नाहीत, दोन-पाच प्राणी आणि काही पक्षी सोडल्यास फारशी जीवसृष्टी नाही, इतकंच काय तर सामान्य पर्यटकांच्या पसंतीस उतरतील असे खारडुंग-ला किंवा पॅंगॉन्ग त्सो सारखे सेलिब्रिटी स्पॉट्स पण नाहीत. आहे तो अतिशय रांगडा हिमालय. साधेच पण पोट भरून जेऊ घालणारा आणि सरतेशेवटी तृप्त करणारा. इथे याच्या पंगतीला मांडीला मांडी लावून बसायचे म्हणजे मधूनच चवीला "ठेचा" खायची तयारी हवी. क्षणभर नाकातोंडातून धूर येतो खरा पण त्यातूनच तर खरी किक मिळते. रंगदुम A remote mountain fastness on the bank of Suru river....Rangdum रंगदुम गोम्पा IMG_5735 ठेचा खाऊ घालणाऱ्या वाटा …. Road carved through snow and decorated with deceptive potholes all the way IMG_20170612_084852_HDR The Mud Carpet Near Pensi La धोकादायक पेन्सी ला …. IMG_5789 शुभ्र पर्वतांच्या पार्श्वभूमीवर बर्फाची हलकीशी साय धरलेला आणि क्षणभर कष्टांचा विसर पाडणारा लँग-त्सो PANO_20170612_105421 संपूर्ण परिसरावर प्रभुत्व सांगणारी ड्रान्ग ड्रुन्ग हिमनदी आणि तिच्यापुढे मान तुकवून जाणारा चिंचोळा रस्ता At Pensi La, Drang Drung glacier dominates almost everything. The narrow road acknowledges it's authority and runs submissively alongside the glacier IMG_6336 झंस्कार खोरे…. अर्थात झंस्कार नदी पदुम-मध्ये उगम पावते. इथून जी दिसते ती स्टोड नदी. PANO_20170612_120912 Turquoise Lake अशा आडवाटांवर असताना भरवसा ठेवावा अशी एकमेव .... रॉली !!! This is the best friend to rely upon when you are in the middle of an extremely inhospitable terrain झंस्कारचा बालेकिल्ला .... पदुम After the long tiresome journey, Padum cradles you gently restoring as much of your energy levels. Beware that you have to refill yourself as the way back is through the same vast uninhabited hinterlands पिबटिंग गोम्पा The guardian of the village - Pibiting Gompa tops a hillock on the bank of Tsarap river blessing the village since many years कार्षा गोम्पा Karsha Gompa कार्षा गोम्पामधून .... The barley fields on the slopes below Karsha Gompa paints these otherwise stark landscapes with rare green hues during summer स्टोन्गडे किंवा थोंगडे गोम्पा Stongde Gonpa स्टोन्गडे गोम्पामधून दिसणारा साराप-स्टोड नद्यांचा संगम. हीच झंस्कार नदी, जी पुढे सिंधू नदीला जाऊन मिळते. Based on a mountain ridge like a bow of a ship, Stongde Gompa is a witness to the confluence of Tsarap and Stod rivers emerging as Zanskar which flows further until it reaches Indus to the north of the valley A hamlet wakes up slowly with the spectacular horizon of snow-dusted jagged peaks थोड्या आडवाटेवरची झोन्गकुल गोम्पा IMG_5938 झोन्गकुल गोम्पाचा पहारेकरी The Lion King....Ladakhi Dog at Zongkul Gonpa …………………………………………………… …………………………………………………… …………………………………………………… इति.... PANO_20170613_122841

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 11154 views

💬 प्रतिसाद
अ
अभिजीत अवलिया Fri, 12/29/2017 - 16:47 नवीन
अप्रतिम. हा भाग आहेच माझ्या फिरायच्या लिस्ट मधे. बघू कधी जमतेय.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 12/29/2017 - 20:08 नवीन
वॉव...! बकेट लिष्टात ऍडवले गेले आहे! :-)
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 12/29/2017 - 20:23 नवीन
अ प्र ती म!!! तू का त्या हिमालयापायी वेडा झाला आहेस, ते हे चित्र आणि लेखन बघून कळतं!! ठार वेडा म्हण हवं तर :) एक तर मला तुझ्यासारखं मन मानेल तसं भटकता येत नाही. त्यात ही असली कहर चित्रं पाहून माझी नजर पार खराब झालीये.. बाकी सोड, स्वतःच्या नजरेनं हा निसर्ग बघण्यासाठी खास प्रयत्न करायला लागणार अशानं..!! लेखनही सुंदर! म्हाराजा, मनस्वी सफरीसाठी एक गळाभेट स्वीकारावी!!! :)
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Mon, 01/01/2018 - 16:18 नवीन
स्वीकारली :) :) :)
  • Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ Sat, 12/30/2017 - 02:52 नवीन
निव्वळ अप्रतिम...एक से एक फोटू आहेत
  • Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ Sat, 12/30/2017 - 03:15 नवीन
निव्वळ अप्रतिम...एक से एक फोटू आहेत
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Sat, 12/30/2017 - 07:58 नवीन
अफलातुन फोटो
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sat, 12/30/2017 - 08:10 नवीन
जबरदस्त फोटो!!! पण वर्णन त्या मानाने कमी वाटले. थोडे किस्से आले असते तर अजुन मजा आली असती वाचायला. पण कमालीचे दृष्टीसुख दिलेत त्याबध्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Mon, 01/01/2018 - 16:17 नवीन
शब्दही गोठतात इथे.... मी तरी काय करणार :)
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sun, 12/31/2017 - 09:26 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे गुरुवार, 01/04/2018 - 14:11 नवीन
खेळण्या च्या दुकानात हरखुन गेलेल्या लहान मुला सारखी अवस्था झाली फ़ोटो बघताना , राव .
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार गुरुवार, 01/04/2018 - 20:25 नवीन
:)
  • Log in or register to post comments
द
दिपस्वराज Tue, 01/09/2018 - 13:36 नवीन
मला वाटतयं कि हिमालयामध्ये फिरताना रॉलीची निवड करताना अप्रतिम फोटो काढता यावे. सगळ्या बाजूने मोकळीक मिळावी, हवं तिथं थांबता यावं हाही त्याच्यामागे हेतू असावा.(सर्व मोहिमांवरून काढलेला अनुमान... ) कारण चार चाकी मध्ये तेव्हढी मोकळीक मिळत नाही. त्यामुळे फोटोचं अर्धे श्रेय रॅलीचे ...... :) घोड्यावरून रॉलीवरून चाललेला किल्लेदार ......
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Wed, 01/10/2018 - 02:19 नवीन
हाहाहा... एकदम मान्य.... पण रॉली ला या अवघड वाटांवरून न्यायचे श्रेय तरी मला द्याच :)
  • Log in or register to post comments
द
दिपस्वराज गुरुवार, 01/11/2018 - 11:41 नवीन
शंभर टक्के श्रेय तुमचेच. लडाख मध्ये रॉली चालवणे हे सोपे काम नाही.
  • Log in or register to post comments
श
शलभ Tue, 01/09/2018 - 17:50 नवीन
वाह.. अप्रतिम.. _/\_
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day ago
  • सुंदर !!
    1 day ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा