Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

कुराण आणि हदिथ मधील कोणत्या चांगल्या गोष्टी हिंदू आणि भारतीय संस्कृतीस एकमनाने घेता येऊ शकतील ?

म
माहितगार
Fri, 12/29/2017 - 10:01
🗣 56 प्रतिसाद
मला वाटते शीर्षक चर्चेसाठी पुरेसे आहे. धागा लेखाच्या बाकीच्या भागाची आवश्यकता चर्चा पुढे जाईल तशी स्पष्ट होऊ शकेल सध्या त्यावर डोके लावले नाही तरीही चालण्यासारखे आहे. * नमनाला घडाभर ऋग्वेदातील सुविचार नावाचा माझा धागा आहे. त्यात बहुधा दोन महत्वाचे सुविचार नोंदवायचे राहून गेले असावेत. ते पुढील प्रमाणे * एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति - ऋग्वेद 1.64.46 - meaning wise people explain the same truth in different manners. * ऋग्वेदः १-८९-१ (व्याकरण खीस आणि संदर्भ) ** आ ! नः भद्राः क्रतवः विश्वतः यन्तु -- Let our noble thoughts spread across the universe. ** भद्राः क्रतवः नः विश्वतः आयन्तु - - Let noble thoughts come to us from all sides. (कुणि नेमके मराठी अनुवाद उपलब्ध केल्यास स्वागतच असेल भारतीय तत्वज्ञानातील या उदात्त दृष्टीकोणांमुळेच स्वामी विवेकानम्द कुप-मंडूक वृत्ती सोडण्याचे आवाहन करू शकत. हा धागा लेख काढण्यामागे दोन्ही उद्देश आहेत एक आपली कुपमंडूकता दूर ठेऊन कुराण-हदीथ मधून काही चांगले (आणि एकतर्फी नव्हे) घेण्यासारखे आहे का ? ते शोधणे. दुसरे असेही कि मिपा करांना कुराण आणि हदिथ बद्दल कुठे कुठे शंका असल्या तरी , मनुस्मृतीची आणि इतर ग्रंथांची जेवढी मनमोकळी चिकित्सा करणे शक्य होते तेवढी कुराण आणि हदिथची करणे शक्य होत नाही. यात जी कारणे आहेत १) आपला त्या विषयावर आणि त्यांच्या मूळ भाषेचा अभ्यास नसतो २) एवढे करुन मेहनत घेतली तरी शिफ्टींग ऑफ गोल पोस्ट तुम्ही योग्य जागूहून योग्य संदर्भ निवडलेला नाही असे होण्याची मोठी शक्यता ३) आपल्या कडून अप्रस्तूत टिका आणि वाद टाळणे ४) आपले बरोबर असलेतरी उत्पात मुल्य अधिक अस्लेल्यां सोबत विवादात न अडकणे. मी मिपाकर शरदसरांच्या धायावरील या प्रतिसादात म्हटल्या प्रमाणे जेवण्याच्या ताटात खारट होणार नाही एवढे शंका आणि टिकेचे मिठ हवेच मीठ घेताना पंच महाभुतांपेक्षा काही वेळा त्या त्या सुभेदारांचे उत्पात मूल्य धास्ती देणारे असू शकते . याला दुसरा मार्ग असा कि आपल्या ताटात काय घ्यायचे याचा विचार करणे अधिक सुकर असू शकते त्या साठी वेगळा चर्चा धागा ; म्हणजे त्याच वेळी काळ्या कुट्ट ढगातही चंदेरी किनार किंबहुना काळ्या रंगातील सौंदर्य शोधण्यची सवय आपली आपल्याला लाभदायक होईल शिवाय त्यातील त्याज्य काय याचा नीर क्षीर विवेक विनासायास होऊ शकतो. मी शब्द आणि ग्रंथ पूजक नाही बुद्धी प्रामाण्य ने कुठून काही चांगले घेता आले तर अवश्य घ्यावे. * एक महत्वाचा मुद्दा ** धार्मिक आणि सांस्कृतीत देवाण घेवाणीतील एक मोठी अडचण धर्म आणि संस्कृती यांची गल्लत करण्याच्या अवास्तव आग्रहातून येत रहाते ती प्रयत्नपूर्वक टाळली पाहीजे तरच कुपमंडूक वृत्ती टाळता येऊ शकतात असे वाटते. या बद्दल माझ एक धागा लेख आहे मिळाला की दुवा जोडेन * काय घेता येऊ शकेल त्याची माझ्या मते उदाहरणे, ही यादी चर्चेतील काही उदाहणे आवडल्यास वाढवत जाईन. १) धर्मसंस्थेचे मानवी जिवनातील अनेक हस्तक्षेप उदाहरणार्थ अर्थव्यवहारातील मर्यादे बाहेरचा हस्तक्षेप स्वतःच्या कार्य परीघाच्या मर्यादा समजून न घेणारा आणि अज्ञानश्रद्धामुलक ठरु शकतो. उदाहरण म्हणून "कुटूंब/देश कितीही कर्जात गेले तरी त्यांचा शेवटचा घास, शेवटच्या खोलीचा निवारा, उत्पनाच्या स्रोताचा शेवटचा हिस्सा जसे की शेताचा शेवटचा तुकडा कधीही हिरावला जाऊ नये इतपत ऋण-व्याज व्यवहाराचा अमानवी चेहरा सौम्य करण्यासाठी लागणार्‍या प्रबोधना तून चांगली बाजू स्विकारणे मला आवडेल पण ऋण आणि व्याज विषयक निर्णय अर्थशास्त्र आणि व्यावसायीक प्रगल्भतेवर अवलंबून असावेत त्याचे नियंत्रण राज्यसंस्थेची जबाबदारी आहे नैतिक प्रबोधना पलिकडे धर्म संस्थेन राज्यसंस्थेत हस्तक्षेप करु नये. या बद्दल माझा धर्मसंस्थेचे ऋण-व्याज व्यवहारातील हस्तक्षेप आणि अज्ञानश्रद्धा या धाग्यावर पुर्वी उहापोह झालेला आहे. २) याच पद्धतीने इस्लाम मधला स्त्रीयांच्या दृष्य संवाद आणि पुरुषांसोबत मिसळण्यावरची बंधने अवाजवी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यास मारक आहेत, पण त्याच वेळी योनी शुचितेवरचा भर कमी असल्यामुळे स्त्रीच्या पुर्नविवाहाकडे अधिक मोकळेपणाने पाहीले जाते. * माझ्या यादीत खालील येऊ शकणार नाही १) ज्युडायिक धर्मीयांचा मुर्तीपुजेला विरोध प्रथम दर्शनी बुद्धीप्रामाण्यवादाच्या जवळ जाणारा वाटला तरी तो पूर्णतः अंधश्रद्धा विरहीत नाही आणि मुख्य म्हणजे त्यांचा आग्रह व्यक्ति आणि समुहाच्या श्रद्धा आणि अभिव्यक्ती स्वांत्र्याचा जबरदस्तीने हिरावून घेऊ इच्छितो त्यातील जबरदस्ती हि मान्य करण्यासारखी गोष्ट नाही त्यामुळे सांस्कृतिक बहुलवादाची (cultural puralism ) ची जागा सांस्कृतीक दडपशाहीने घेतली जाते. * संदर्भा साठी काही वेचक दुवे ** कुराणच्या मराठी अनुवाद प्रतीचा दुसर्‍या एका लेख प्रतिसादात हारुन शेख यांनी दिलेला अर्काईव्ह डॉट कॉम वरील दुवा. (अर्थात केवळ मराठी अनुवादावर अवलंबून न रहाता गरज पडेल तशी गूगल ची मदत घेऊन इंग्रजी अनुवाद ही तपासून घ्यावेत . तरीही परिपूर्णता असेलच असे नाही म्हणून चर्चेत सहभागी सर्वांच्या वतीने डिसक्लेमर) * Criticism_of_the_Quran#Hindu_criticism आणि Criticism_of_Islam#Nineteenth_and_twentieth_century कॉनराड एल्स्ट या बेल्जीअन इंडॉलॉजीस्टचेही काही विचार पटले नाही तरीही काही विचार विचार करण्यासारखे असावेलेखात * चर्चा सहभागासाठी टिपा * काय घेण्यासारखे आहे त्यावर फोकस ठेवा म्हण्जे टिकेचा कडवट पणा न येता त्याज्य आपोआपच वेगळे पडेल. * चर्चेत सहभागी होताना काही दक्षता घ्या कोणत्याही आजी माजी व्यक्तीवर व्यक्तिगत टिका टाळा . * सभ्यता पाळा. * शक्यतो राजकीय विषय खासकरून सद्य राजकीय विषय जिथे अत्यावश्यक नाही तेथे टाळा * शीर्षकात एकमनाने हा शब्द प्रयोग केला आहे हेही लक्षात घ्यावे त्यामुळे कुणावर काही लादणे लादून घेणे अभिप्रेत नाही. * चूकभूल देणे घेणे * चर्चेत सभ्यता पूर्ण आणि अभ्यासपूर्ण ससंदर्भ सहभागासाठी आणि अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आभार.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 24092 views

🗣 चर्चा (56)
म
माहितगार Mon, 01/01/2018 - 12:53 नवीन
विवेकानंद
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 01/01/2018 - 14:50 नवीन
एकंसद्विप्रा.. बद्दल कूनराड एल्स्टचे रोचक आवर्जून वाचावे असा एक भाष्य जे बर्‍याच मिपाकरांना आवडण्यासारखे असू शकेल.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 01/02/2018 - 17:22 नवीन
माहितगार, कुराण व हादिथ यांतली शिकवण उचलण्यासाठी यांचं स्थान प्रथम बघायला हवं. प्रेषित महम्मदांच्या आचरणावर हादिथ हा ग्रंथ प्रकाश टाकतो. माझ्या माहितीनुसार कुराणात स्पष्ट आज्ञा फार थोड्या आहेत. शिवाय त्या परस्परविरोधीही आहेत. त्यामुळे कुराणाचा यथोचित बोध होण्यासाठी हादिथची सोबत लागतेच. आता हिंदू परंपरेकडे वळूया. तिजनुसार धार्मिक साहित्याचं श्रुती, स्मृती व पुराणे असं विभाजन आहे. श्रुती हे अनुभवलेलं सत्य आहे. ते थेट आचरणांत उतरवता येत नसतं. त्यासाठी स्मृतीचं सहाय्य लागतं. अशा अनेक स्मृती प्रचलित होत्या. उदा. : मनुस्मृती, याज्ञवल्क्यस्मृती. तर पुराणे हा इतिहास आहे. पुराणांतून आपल्या पूर्वजांनी सत्य कसं आचरणांत आणलं त्याचा बोध होतो. साधारणत: हेच विभाजन इस्लामी साहित्यासही लागू करता येईल. कुराण हे श्रुती मानलं तर शरिया स्मृती होते व हादिथ हे पुराण होतं. अर्थात कोणीही मोमीनानं नेहमी प्रेषितांचं उदाहरण समोर ठेवून आचरण करावं अशी अपेक्षा असते. परंतु अशीच अपेक्षा हिंदूंनी ठेवायची झाली तर एक समस्या उद्भवते. मी हिंदू आहे आणि आजच्या घडीला मला कुराणातली अमुकेक शिकवण आचरणांत आणायची आहे. माझ्या भारतीय पार्श्वभूमीनुसार मुस्लिम सुफी वा अवलिया यांचं उदाहरण समोर ठेवलं तर महम्मदांचा अनमान होण्याचा धोका आहे. इस्लामी शिकवणीनुसार महम्मद हेच अखेरचे प्रेषित आहेत. त्यांच्यानंतर कोणीही प्रेषित नाही. त्यांची जागा इतर कोणीही घेऊ शकंत नाही. त्यामुळे मला प्रेषित महम्मदांनी आचरणांत आणला अगदी तसाच इस्लाम आचरणांत आणला पाहिजे. थोडक्यात म्हणजे हादिथला पर्याय नाही. यांतून दुसरी समस्या उद्भवते. ती म्हणजे हादिथ १४०० वर्षे जुनी आहे. तिची शिकवण आज आचरणांत आणणं कर्मकठीण आहे. मुस्लिमांनी गैरमुस्लिमांशी कसं वागायला हवं यावर भरपूर विवेचन आहे. मात्र माझ्यासारख्या गैरमुस्लिम पण धार्मिक मनुष्याने प्रेषितांचा अनमान न करता इस्लामचा आचरणयुक्त अभ्यास कसा करावा याबद्दल कुठेही मार्गदर्शन नाही. त्यामुळे कुराणातलं जे काही चांगलं म्हणून मी उचलेन ती मनमानी ठरण्याचा धोका आहे. मी काफीर तर आहेच, पण अजाणतेपणी कट्टर काफीर या शिक्क्याचा धनी बनेन. धर्म करायला गेलो आणि कर्म उभं राहिल्याचा स्वानुभव खाती जमा होईल. हाच तो धोका आणि अवांछित दुष्परिणाम आहे. यावर एक उपाय आहे. तो म्हणजे शहाण्या व विचारी मुस्लिमांनी प्रस्तुत विषयासंबंधी प्रत्यक्ष उदाहरण घालून देणे. पण हाही प्रचंड धोक्याचा मार्ग आहे. औरंग्याचा थोरला भाऊ दारा शुकोहाने या दिशेने सुरवात केली होती. त्याची जी काही हालत झाली त्यावरून मी शहाणं होणं जरुरीचं आहे ना? सांगायचा मुद्दा असा की अंगी ताकद असेल त्या हिंदूंनीच कुराणातल्या चांगल्या गोष्टी उचलायची बात करावी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
र
राघव Sat, 01/13/2018 - 05:56 नवीन
हा हा.. या दृष्टीकोनातून मी बघीतलेच नव्हते! धन्यवाद.
  • Log in or register to post comments
द
दासबोध.कॊम Wed, 04/25/2018 - 22:22 नवीन
खरंच आहे
  • Log in or register to post comments
र
राघव Sat, 01/13/2018 - 05:53 नवीन
एक सद्विचार म्हणून ही कल्पना चांगली आहे - "जे जे समोर येईल त्यातून काहीतरी चांगलं उचलावं आणि पुढे जावं." पण हे व्यक्तीसापेक्ष असल्यानं भारतीय संस्कृतीनं असं म्हणणं योग्य नाही. भारतीय संस्कृतीनं काय घ्यावं याबद्दल बोलण्याचा आणि तसं रुजवायचा अधिकार कुणाला? संतसुद्धा संस्कृतीनं काय घ्यावं याबद्दल न बोलता व्यक्ती-व्यक्तीनं काय घ्यावं याबद्दल बोलतात. आणि तसंही भारतीय संस्कृतीत काय चांगलं-वाईट आहे, याचा संपूर्ण अभ्यास करायला एका व्यक्तीला एक जन्म देखील कमी पडावा. कारण आपली संस्कृती अनुभूतीवर भर देते. जे पटतं ते करा असं सांगत प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुरूप उन्नतीला प्राधान्य देणारी भारतीय संस्कृती मुळातच सर्वसमावेशक आहे. ऋग्वेदांनं काय म्हटलं अन् कुराणानं काय सांगितलं यापेक्षा व्यक्ती म्हणून आपण काय करतो हे महत्त्वाचं. ते होत नसेल तर कुणी कितीही आणि कसंही सांगो, काय फरक पडतो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 11 hours ago
  • सुंदर !!
    3 days 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 11 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा