ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग २ - अंगकोर वाटमधील भित्तिशिल्पे.
Book traversal links for ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग २ - अंगकोर वाटमधील भित्तिशिल्पे.
हे मंदिर सूर्यवर्मन् दुसरा (१११३ ते ११५० अदमासे) ह्याच्या कारकीर्दीमध्ये बांधण्यात आले. ख्मेर साम्राज्यातील अन्य मंदिरे बहुतांशी शैवपंथीय असतांना हे मंदिर मात्र विष्णूची उपासना करण्यासाठी निर्माण झाले. मंदिराच्या मेरु पर्वताच्या आकाराच्या केन्द्रशिखरामध्ये एकेकाळी विष्णुमूर्ति होती. सूर्यवर्मन् दुसरा हा मोठा विष्णुभक्त असावा कारण त्याचे मृत्यूनंतरचे नाव https://en.wikipedia.org/wiki/Posthumous_name ’परमविष्णुलोक’ असे आहे, म्हणजे मृत्यूनंतर तो विष्णुलोकामध्ये गेला आहे अशी श्रद्धा.* जयवर्मन् सातवा (११८१-१२१८) ह्याच्या कारकीर्दीमध्ये कंबोडियामध्ये हीनयान बौद्ध पंथाचा प्रसार झाल आणि मंदिरामध्ये मध्यस्थानी असलेला विष्णु तेथून हलवला जाऊन तेथे बुद्धमूर्ति स्थापन झाली. विष्णूला दुसर्या भिंतीमधील गोपुरामध्ये जागा मिळाली, जेथे तो अजूनहि आहे आणि त्याची देखभाल करणार्या भिक्षूला प्रवाशांनी दिलेली नाणी मिळवून देण्याचे कार्य तो करतो.

दुसर्या भिंतीपासून सुमारे ३५० मीटर लांबीच्या लांबलचक दगडी रस्त्याने चालून आपण तिसऱ्या भिंतीत आणि मंदिरात प्रवेश करतो. ह्या तिसऱ्या भिंतीची लांबी-रुंदी २१५ गुणिले १८५ मीटर आहे आणि ह्या सर्व लांबीरुंदीवर आतील बाजूस bas relief पद्धतीची भित्तिशिल्पे कोरलेली आहेत. पश्चिम-दक्षिण कोपर्याकडून सुरुवात करून घड्याळाच्या उलट्या दिशेने मोजल्यास पश्चिम भिंतीवर महाभारत युद्ध, दक्षिण भिंतीवर मंदिराचा निर्माता सूर्यवर्मन दुसरा ह्याची राजसभा, यमाचे पाताळ, पापपुण्याचा निवाडा, स्वर्ग आणि नरक अशी शिल्पे आहेत. पूर्वेच्या भिंतीवर पहिल्या अर्धात समुद्रमंथन आणि दुसऱ्या अर्धात विष्णु आणि असुरांचे युद्ध दाखविले आहेत. उत्तरेच्या भिंतीवर प्रथम कृष्णाच्या जीवनातले प्रसंग आणि नंतर नाना देवदेवतांचे चित्रण आहे. तेथून पश्चिम भिंतीकडे वळल्यावर रामरावण युद्ध दर्शविले आहे.
आता सर्वप्रथम महाभारत युद्धातील देखावे पाहा.





राजसभेनंतर आपण जातो यमाची सभा, पापपुण्याचा निवाडा आणि स्वर्गनरकांची चित्रे इकडे. वाहन रेड्यावर बसलेला अनेक हातांचा यम दिसत आहे. त्याच्यावरहि छत्र, चवऱ्या असा सरंजाम आहे. अशी छत्रे आणि चवऱ्या ह्यांची संख्या त्या त्या व्यक्तीचे उतरंडीतले स्थान दाखविते. त्याचे साहाय्यक चित्रगुप्त आणि धर्म शेजारीच बसलेले आहेत आणि धर्माच्या सल्ल्याने चित्रगुप्त समोर आणलेल्या दीनवाण्या आणि आर्जवे करणाऱ्या लोकांच्या पापपुण्याचा हिशेब करीत आहे. एक यमदूत पापकर्म्यांच्या नाकातून आणि गालातून दोर ओवून आपल्या मागे त्यांना दोराने ओढत यमापुढे घेऊन जात आहे.



























* अशी मृत्यूनंतरची नावे बादशहा, राजे इत्यादींना द्यायचा रिवाज बहुतेक सर्व पौर्वात्य देशांमध्ये चालत होत. जपानी सम्राट् मात्सुहितो (१८६७-१९१२), योशिहितो (१९१२-१९२६) आणि हिरोहितो (१९१२-१९८९) हे त्यांच्या मृत्यूनंतर अनुक्रमे मेइजी, ताइशो आणि शोवा ह्या नावांनी ओळखले जातात. हिंदुस्तानातहि मुघल राज्यकर्ते ही प्रथा पाळत. उदा. बाबरचे असे नाव ’फिर्दौस मकानी’ आणि अकबराचे ’अर्श अशियानी’ होते.
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments