Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

नृसिंह सरस्वती स्वामी आरती

व — वैभवदातार, Wed, 12/20/2017 - 11:47
आज श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जयंती आहे. त्यानिनित्ताने मी आरती लिहिली आहे. आरती श्री अवधूताची | माझ्या दत्तात्रेयाची ||धृ.|| कलियुगी दाखविण्या चमत्कार नृसिंह सरस्वती अवतार | घेऊया आले पृथ्वीवर उद्धरिले जनांसी अपार || १ || श्री पाद वल्लभ गाणगापूरी मध्यान्हकाळी मागती माधुकरी | अन्नछत्र अन्नदान भक्त करी दर्शन देती ज्याच्या मनी इच्छा खरी ||२ || तीर्थक्षेत्र पीठापूर कुरवपूर औदुंबर पर्वत गिरनार | दत्त स्थानी वास निरंतर गुरूंचा मुक्त संचार ||३ || पांघरी अंगी भगवे वस्त्र हाती धरी चक्र त्रिशूल अस्त्र | धरुनिया आम्हावरी कृपाछत्र तारिले बहुत सत्पात्र ||४ || तरण्यास्तव भवसागराला नाव माझी न्यावी पैलतीराला ऐशा श्री गुरू दत्ताला जोडोनी कर नमितो वैभव पदाला ||५ ||

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3365 views

💬 प्रतिसाद
द
दुर्गविहारी गुरुवार, 12/21/2017 - 02:53 नवीन
उत्तम लिहीलय, आपल्यामुळे दिनमान समजत असते. आता कोणताही हिंदु सण चुकणार नाही याची खात्री पटली आहे. कॅलेंडर गुंडाळून ठेवतो. आता फक्त ईंग्रजी तारखा असलेले बँकेचे कॅलेंडरच आवश्यक आहे
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 12/21/2017 - 05:16 नवीन
कॅलेंडर गुंडाळून ठेवतो.
ठेवतो? आम्ही वैभव सरांच्या पहील्या तीन कविता वाचल्यानंतर लगेच ठेवून दिले.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 12/21/2017 - 04:54 नवीन
श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय, आरती वाचताना प्रत्यक्ष महाराजांचेच दर्शन घेतो आहे असे वाटले. अजून दोनचार कडवी लिहीली असती तर महाराज स्वतःच हातामधली काठी पारजत आले असते. आता ख्रिसमस निमित्त मायबाप येशुवर एखादी झकास आरती येउद्या. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Fri, 12/22/2017 - 04:26 नवीन
एकदम क्रिसमस पर्यंत कळ काढावी? विनायक चतुर्थी (आज), अयन करिदिन (२३ डिसेंबर) व भारतीय ग्राहकदिन ( २४ डिसेंबर) यावरील कवितांची अनेकजण वाट पाहातायत त्यांचं काय?
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 12/22/2017 - 06:24 नवीन
महाराज स्वतःच हातामधली काठी पारजत आले असते.
ळॉळ
  • Log in or register to post comments
व
वैभवदातार गुरुवार, 12/21/2017 - 06:49 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 12/21/2017 - 07:06 नवीन
वैभवजी छान आरती.
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 12/21/2017 - 10:37 नवीन
आरती आवडली.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर गुरुवार, 12/21/2017 - 10:50 नवीन
आरती आवडली.
आरती टिकेकर ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 12/22/2017 - 10:31 नवीन
आरतीची रचना सुंदर आहे. आवडली.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 12/24/2017 - 07:25 नवीन
आरती आवडली... वरती ख्रिसमसची आठवण कोणीतरी काढलेली दिसतेय... त्यांच्यासाठी भोजपुरी व्हर्जन देउन जातो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मुझे कितना प्यार है तुम से, अपने ही दिल से पूछो तुम जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है :- Dil Tera Deewana [ Mohammed Rafi, Lata Mangeshkar ]
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 12/26/2017 - 09:46 नवीन
हे काय काल नाताळानिमित्त येशूची आरती नाही लिहीलीत?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 22 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 23 hours ago
  • सुंदर !!
    2 days 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा