Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

जिसका पी संग बीते सावन

स
समयांत
Mon, 12/18/2017 - 19:05
जिसका पी संग बीते सावन उस बिरहन/दुल्हन की रैन सुहागन - अमीर खुस्रो तो पावसाच्या सरींनी भिजलेल्या अंगणात आला आहे, आणि माझ्या डोळ्यांत एकाएकी पूर लोटला आहे. त्याला पाहून माझी नजर पुरती पाणावली आहे. अंगावर पाऊस झेलत त्याची भिजलेली भारदस्त छाती माझ्या हृदयाच्या ठोक्यानिशी भरून येते आहे, आणि खोल जाते आहे तेव्हा माझ्या हृदयाचा ठोका चुकत आहे. तशीच अचानक वीज कडाडली आणि तो परस्परांतला श्वासांचा बंध तुटला. पावसाला तो मुळीच भावला नसावा. त्याचे डोळे माझ्यावर स्थिर होत आहे जणू या भर पावसातही अनामिक तृष्णा लागून राहावी आणि माझ्या डोळ्यांमध्ये त्या तृष्णेची अपरंपार तृप्ती असावी. वेलीसारखे माझे अंग त्याच्याकडे ओढले जात आहे, त्याच्या ओल्या तजेलदार पावलांवर माझी नजर ही अशी खिळली आहे, म्हणून वरमलेल्या माझ्या पापण्यांतून अश्रू आणि तसाच वरून पाऊस चढाओढीने त्या पावलांवर निखळ झरतो आहे. माझी काहिली काहिली विरहावस्था अशी पावसात भंग करून माझ्यासमोर तो स्वस्थतेने हसत उभा आहे, माझे मन त्याला दूषणं देत आहे; मी नजर उंचावतो आणि तो आणखीन अधिक हास्य विलसावत माझ्या भिजलेल्या शरीरावर उष्ण हातांचा स्पर्श करत आहे. मी डोळे गच्च मिटून तो स्पर्श मनात रूजवून घेत आहे, पुढे येणाऱ्या विरहाला सुसह्य करणारी स्मृती म्हणून आणि तेवढ्यात त्याची मिठी मला हा सभोवरचा पाऊस विसरायला लावत आहे. घनघोर पाऊसवाऱ्यात माझ्या प्रियकराच्या घनगंभीर आलिंगनाने सारे अस्तित्व केवळ त्याचे त्याचेच झाले आहे, मी पुरता पावसात विखरून गेलो आहे. हा श्रावण आला आहे, माझा विरह लुटायला..

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1151 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा