मणि शंकर उवाच 'त्यांची कथित कट्टर धर्मनिरपेक्षता'
नमनाला घडाभर
भारतातलीच एक पुरेशी जुनी (स्थापना १९३५) शाळा, पण ब्रिटीश वळणावरची, इथे प्रवेश केवळ स्पर्धा परिक्षेने मेरीटवरच मिळतात - असं वाचल की कित्ती छान वाटत नाही ? पण थांबा या शाळेची सध्याची वार्षीक फीस वर्षा काठी केवळ ९ लाख ७० हजार एवढी किरकोळ आहे. वर्षा काठी ५० मुले भरली की टार्गेट संपले, दहा वर्षातील सर्व मुले मिळून अदमासे ५०० फक्त. एवढी फिस भरण्याची तयारी सहसा भारतातील केवळ सरंजामदारांकडेच असेल हे सांगण्यासाठी वेगळ्या भविष्यवेत्त्याची गरज असण्याचे कारण नाही. आता पर्यंत भारतातले एक पंतप्रधान, ९ कॅबीनेट मंत्री, दोन मुख्यमंत्री , दोनडझन उच्च लष्करी अधिकारी, दोन डझन राजदूत या एकट्या शाळेने दिले आहेत म्हणे. (संदर्भ) या मुलांवर राष्ट्रप्रेमासोबत कट्टर धर्मनिरपेक्षतेचे पाठ गिरवून घेण्यासाठी मुख्याध्यापक ब्रिटीश असतात वंदे मातरम सोबत मंहमद इकबालची कवनेही म्हणवून घेतली जातात. (संदर्भ)
एवढ्या वर्णनावरून या महान शाळेचे नाव तुम्ही ओळखलेच असेल. अशा या शाळेतील विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याच्या कौशल्यात कुणाशी कसे बोलायचे या कौशल्याचा समावेश आहे म्हणे आणि याच शाळेतील एका -आता ७६ वर्षीय- विद्यार्थ्याचे नाव मणि शंकर अय्यर ! बोलता बोलता मुक्ताफळे उधळण्याची मोठी परंपरा असणार्या मणिशंकर यांनी त्यांची कारकीर्द भारताच्या परराष्ट्र खात्यात राजनैतिक अधिकारी म्हणून घडवली आहे, कराची दुतावासात तब्बल चार वर्षे भारताचे राजनैतीक अधिकारी पदावर काम करण्याचा अनुभव आहे. निवडणूका तामिळनाडूतून लढवल्या पण आडनावा पलिकडे तामीळनाडू आणि केरळचा संबंध काय ते माहित नाही, वस्तुतः बालपणी फाळणीच्या वेळेस लाहोरातून निर्वासीत शिक्षण डून स्कुल मध्ये, काम कराचीत (यांचे हिंदी किती कच्चे असेल कल्पना करा ) समाजवादाचे नाव घेणार्या नेहरूंनीच सरंजामशाही दिल्ली गोल्फ क्लबलाही आशीर्वाद दिला ! , तसे काहीसे मणि शंकर अय्यरांचेही आहे, तारुण्यात मार्क्सवादाची भलावण केलेल्या मणिशंकरांना मार्क्सवाद केवळ पुस्तकात भावतो. एक चहा वाला पंतप्रधानपदी बसणे खपत नाही. बाकी अनेक तथाकथित सेक्युलर लोकांची नीच कृत्ये दिसली तरी तोंड उघडत नाही पण मोदींबाबत त्यांच्या कृतींची समीक्षा करण्या एवजी व्यक्तीलक्ष्य तर्कदोषाचे सज्जड उदाहरण देत व्यक्तीलाच नीच ठरवता येते तेही चक्क महात्मा गांधीच्या नावाची आळवणी करून , कमाल आहे ! आणि म्हणे त्या डून स्कूल मध्ये तर्कशुद्ध विचार शिकवण्याचे ध्येय आहे !
एका निवृत्तीच्याआसमपास असलेल्या राजकारणी व्यक्तीच्या जाणता अजाणता झालेल्या टिपण्यांकडे आणि भान सुटणार्या व्यक्ती कडे किती लक्ष द्यायचे ? पण महाशयांनी अलिकडे दिलेल्या एका रात्र भोजनास माजी उपराष्ट्रपती माजी पंत प्रधान ते काही माजी राजनैतिक अधिकारी आणि माजी लष्करी अधिकारी मंडळींनी हजेरी लावली आणि सोबतीला अतिथी पाकिस्तानातील होते हे वाचल्यावर हे मणिशंकर अय्यर कोण ? अशी थोडी उत्सुकता जागृत होणे सहाजिक नाही का ?
मुख्य विषय
तर अशा या मणि शंकर अय्यर यांचा Confessions of a Secular Fundamentalist नावाचा एक ग्रंथ गूगल बुक्सवर preview उपलब्ध आहे. केवळ preview असल्यामुळे पुस्तकातील सारीच पाने चकटफू वाचता येत नाहीत. जेवढी वाचता येतात त्यातून सध्याच्या तथाकथित कट्टर सेक्यूलरवादाचा जरासा मागोवा घेता येतो.
'निरपेक्ष' शब्दात एक प्रकारची निष्पक्षततेआणि तटस्थता अभिप्रेत असावयास हवी. मणि शंकर अय्यर त्यांच्या या पुस्तकात एके ठिकाणी निष्पक्षतेच्या गरजेशी सहमत होताना दिसतात. निष्पक्षतेते समर्थन आणि टिका करताना सर्व बाजूंवर सारख्याच पद्धतीने करणे अभिप्रेत असावे. हे करताना तटस्थता
अथवा सर्वांभूती समानता न राखली गेल्यास निरपेक्षतेचा आधारच ढासळतो आणि धर्म निरपेक्षता लूळी पडून 'तथाकथित हे विशेषण लागून हास्यास्पद ठरावयास लागणारी अंमळ उदाहरणे नजरेला पडू लागतात आणि धर्मनिरपेक्षता शब्दाची भूमिकेची विश्वासार्हता ढासळते धर्मनिरपेक्षता भूमिकांच्या आदरास धक्का पोहोचवयास लागतो. आणि म्हणून धर्म निरपेक्षते बाबतची भूमिका घेणार्यांनी कट्टर असावे धर्म निरपेक्षतेत कट्टर असावे तडजोड करू नये हे तटस्थता पाळली गेल्यास अगदी धर्मनिरपेक्ष नसलेल्या व्यक्तीस सुद्धा तेवढे खुपणार नाही पण वास्तवात तसे होताना दिसत नाही.
मणि शंकर अय्यर स्वतःस पाश्चात्य धाटणीचे कट्टर धर्म निरपेक्षतावादी म्हणवून घेऊ इच्छितात ज्यात सार्वजनिक जिवनात धार्मिकते पासून अंतर राखणे अभिप्रेत असते, पण भारतीयांची धार्मिकता लक्षात घेता सर्वधर्मसमभावाची भूमिका त्यांना स्विकार्य वाटते. धर्मनिरपेक्षतावादी भूमिका मवाळ करू नयेत ती निसरडी घसरगुंडी आहे असे त्यांना वाटते, इथ पर्यंत ठिक. पण बहुसंख्यांच्या प्रति त्यांच्या धर्मनिरपेक्षतेची कठोरता दाखवू लागणारे मणि शंकर अल्पसंख्यांकाच्या बाबतीत केवळ सोईची तथ्ये तेवढीच विचारात घेताना दिसतात गैरसोईची तथ्ये अनुल्लेखीत ठेवण्या कडे कल दिसतो. कदाचित राजनैतिक मुत्सद्देगिरी करताना स्वतःचा प्रभाव पाडण्या एवजी विरोधी बाजूचा प्रभावही पडत असावा असे काही मणिशंकर यांच्या बाबतीत झाले आहे का ? अशी शंका वाटते. बहुतेक सर्वच धर्मीयात एक उदार उदात्त भूमिका ठेऊन असलेला गट असतो आणि आपल्या भूमिकांचि उदारता उदात्तता जपू शक्ण्यात अपयश येणारा मोठा वर्गही असतो, मणि शंकरांची नेमकी अडचण नेमकी येथे होते , बहुसंख्यांकांच्या उदार उदात्त भूमिका असलेल्या गटाचे क्रेडीट ते वळते करत नाहीत केवळ उदारता उदात्तता जपू शक्ण्यात अपयश येणार्यांकडे अंगुली निर्देश करतात पण अल्पसंख्यांकांकडे बघताना त्यांच्यातील केवळ उदार उदात्त भूमिकांची दखल घेताना , उदारता उदात्तता जपू शक्ण्यात अपयश येणार्यांकडे डोळेझाक करताना दिसतात. वस्तुतः एकाच्या चुकीने दुसर्याच्या चुकीचे समर्थन होत नाही चुकणार्या सर्वांनाच एकाच रांगेत उभे करून चूक निदर्शनास आणून देऊन चूका करण्यापासून परावृत्त करणे आणि त्यांच्यात आपाप्सात विश्वास निर्माण करणे वेगळे आणि केवळ त्यातील एकाच गटाला लक्ष करणे वेगळे हे मणि शंकर अय्यर आणि त्यांच्या विचारसरणीतील असंख्यांच्या लक्षात येताना दिसत नाही.
मतांच्या बेरजेसाठी मी जातींचे राजकारण करतो एका गटातील धर्मांधांना पाठीशी घालतो आणि एकाच बाजूच्या लोकांना तुम्ही चूक म्हणत लक्ष करतो आणि वरून स्वतःस स्वतःच्या निरपेक्षतेची शाबासकी घेतो हे विश्वास निर्माण करणारे होत नाही हि कठोर नव्हे लूळी पडलेली धर्मनिरपेक्षता आहे.
मणि शंकर अय्यर धर्मवादी लोकांसारखीच मोठी गफलत करतात ते राष्ट्र आणि धर्म या संकल्पनांची गल्लत करण्याची , धर्म निरपेक्षता जपता न आल्यास भारताने राष्ट्र म्हणून शिल्लक राहू नये अशी स्पष्ट मांडणी करताना मणि शंकर अय्यर दिसतात . धर्म निरपेक्ष असो अथवा नसो राष्ट्र हे राष्ट्र असते. सौदी अरेबीया धर्म निरपेक्ष नाही अथवा इराण धर्म निरपेक्ष नाही पण ती राष्ट्रे आहेत सौदी अरेबीयाचा अथवा इराणचा एखादा धर्मनिरपेक्ष नागरीक माझा देश धर्म निरपेक्ष नाही मी त्याचे विभाजन करतो अथ्वा राष्ट्र द्रोह करतो म्हणाला तर ते समर्थनीय ठरत नाही तसे भारताच्या बाबत भारत बहुसंख्यांच्या स्वेच्छेने धर्म निरपेक्ष आहे हे चांगलेच पण काही कारणाने तो धर्म निरपेक्ष नसता तर निरपेक्षतेसाठी विचारांचा प्रसार करणे वेगळे आणि राष्ट्राच्या नष्ट होण्याची भाषा करणे वेगळे हे मणि शंकर अय्यरांनी लक्षात घेतले असेल का ? आणि तरीही त्यांना त्यांच्या भूमिकेवर ठाम रहावयाचे असेल पाकीस्तान आणि बांग्लादेश यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तीत्वाचा अधिकार नाही अशी स्पष्ट भूमिका मणि शंकर अय्यर यांनी आणि त्यांच्या पठडीतील मॅकॉले विचारसरणीच्या लोकांनी लक्षात घ्यावतास हवी.
इथे मणि शंकर अय्यर पाकीस्तानची पाठराखणच करत नाहीत तर हे मणि शंकर अय्यर आमच्या देशातले सरकार बदलण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या असे पाकीस्तानात जाऊन म्हणतात तेव्हा त्याचे अर्थ बदलत असतात, हे लक्षात येण्या पलिकडे मणि शंकर अय्यर गेले असतील पण त्यांच्या सोबत पाकीस्तानी लोकांना सोबत घेऊन रात्री भोज घेणार्या माजी पंतप्रधान माजी उपराष्ट्रपती आणि माजी राजनैतिक मुत्सद्द्यांनी देश गहाण टाकणे त्यांच्या क्षमतेतील गोष्ट नाही पण अक्कल गहाण टाकणे तथाकथित अनुभवी लोकांना शोभणारे ठरते किंवा कसे. (संदर्भ) भाजपा आणि मोदींकडून एक नाही लाख चूका झाल्या असतील- नसतील त्याची शहा निशा स्वतंत्रपणे नक्कीच करावी पण त्यांच्या चुकांनी तुमच्या राजनैक्तीक चुकांवर पांघरूण घालता येते नव्हे. पाकीस्तानी लोकांसोबत रात्री भोजाचे आयोजन गैर कायदेशीर नाही माउपराष्त्र्ट्रपतींना त्यांच्या स्वतःच्या घरीही करता आले असते. मणि शंकर अय्यर मोदींचे किती कौतुकास्पद विरोधक असले तरी त्यांच्या घरी तथाकथीत ज्ञानी लोकांनी जेवण घेऊन मुत्सद्देगिरीचा जो काही उजेड पाडला त्याने भारत पाक संबंधात काही सुधारणा होईला का माहीत नाही राजनैतिक औचित्याचा मुद्याची काळजी न घेणारे कथित प्रयत्न मोदी विरोधाची भूक भागवण्या पलिकनाह, हसी शिवाय काही हशील करत नसावेत किंवा कसे.
धागा लेखाचा मुख्य उद्देश मणि शंकर अय्यर यांच्या पुस्तकांची चर्चा करणे हाच आहे. मला एकट्यास त्यांच्या पुस्तकाचा पूर्ण उहप्पोह सदर लेखात समावेश करणे शक्यही नाही आणि प्रिव्ह्यू प्रत्येक वेळी मर्यादीत दिसतो त्याही मर्यादेमुळे माझी मांडणी परीपूर्ण असल्याचा दावा नाही उलट पक्षी काही राहून गेले असल्यास अवश्य निदर्शनास आणावे. चुभूदेघे.
संदर्भ
* मणि शंकर अय्यर (इंग्रजी विकिपीडिया लेख)
* डून स्कूल
* Confessions of a Secular Fundamentalist By Mani Shankar Aiyar
गूगल बुक्सवर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुझे कितना प्यार है तुम से, अपने ही दिल से पूछो तुम जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है :- Dil Tera Deewana [ Mohammed Rafi, Lata Mangeshkar ]