Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

चीनचा भारतावर हल्ला

आ
आशु जोग
गुरुवार, 12/14/2017 - 19:19
💬 8 प्रतिसाद

चीनचा हल्ला


चीनने एका युद्धात आपल्यावर हल्ला केलेलाच आहे. आपण तो अद्याप विसरू शकलेलो नाही. आता यामधे नव्या अस्त्रांची भर पडली आहे. ती म्हणजे संपर्क माध्यमे. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने मोबाईलमधल्या धोकादायक अशा जवळ जवळ ४२ सॉफ्टवेयर प्रॉग्रॅमची यादी जाहीर केली आहे. त्यांच्यामते हे प्रॉग्रॅम मोबाईलमधील माहिती आपल्या नकळत चोरतात. त्यामधे आपले पत्ते, मोबाईल नंबर्स असतात. व्हॉट्स अप किंवा मेलवरील आपले संभाषण असू शकते. या गोष्टी सर्वरकडे पाठवल्या जातात. ashutoshjog@yahoo.com कोणतेही अ‍ॅप्स डाऊनलोड केले आणि त्याच्या अटी (T & C) मान्य केल्या की ते अ‍ॅप्लिकेशन मोबाईलमधली आपली माहिती वाचू शकते. आपला कॅमेरा वापरू शकते, लोकेशन माहिती होते. अनेकदा या अ‍ॅप्लिकेशनचे काम पडद्यामागे चालते. यूजरने ते मुद्दाम सुरु करण्याची गरज नसते. संरक्षण मंत्रालयाच्या मते ही अ‍ॅप्लिकेशन्स ताबडतोब उडवून टाकावीत. त्यांना आपल्या मोबाईलमधे थारा देऊ नये. यामधे यूसी ब्राउझर आणि यूसी न्यूज यांचा समावेश आहे. यूसी ब्राउझर हा सर्व मोबाईल्सवर, सर्व ओ.एस. वर चालणारा प्रॉग्रॅम आहे. उत्तम इंटरफेस आणि कमी मेमरी व्यापणे यामुळे पूर्वी तो लोकप्रिय होता. ब्राउझर ही गोष्ट आपण खूपच महत्त्वाच्या कामांसाठी वापरतो. बँक, बिल भरणे, मेल्स वाचणे. इतर कुठल्याही मित्रापेक्षाही जीवाचा सखा. त्याला आपल्या सगळ्या हालचाली, आपल्या आवडत्या साइट्स माहीत असतात. मग हा ब्राऊझर विश्वासार्ह नको का ? प्ले-स्टोअरवरची प्रत्येक गोष्ट डाऊनलोड केलीच पाहीजे का ! तर चीनने सॉफ्टवेयरमधून भारतावर असाही हल्ला केलेला आहे. याहून घातक म्हणजे यात काही हार्डवेयरही सामील आहेत. अनेक दूरसंचार उपकरणे सुद्धा चीनसाठी हेरगिरीची कामे करतात असा संरक्षण मंत्रालयाचा दावा आहे. या पुढे प्रत्येकाने अगदी ताकही फुंकून पिण्याची सवय लावून घेतली पाहीजे ! सुब्रमण्यम स्वामी यांनी कोणते इशारे दिले होते, कोणत्या कंपन्या संशयाच्या भोवर्‍यात आहेत आणि का आहेत तेही कमेंटमधे पाहू.
ashutoshjog@yahoo.com

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3610 views

💬 प्रतिसाद (8)
आ
आशु जोग गुरुवार, 12/14/2017 - 19:22 नवीन
स्वान टेलिकॉम, हुवई, शाओमी या त्या कंपन्या आहेत !
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग गुरुवार, 12/14/2017 - 19:23 नवीन
अनेक मोबाईल कंपन्यांचे सर्वर्स चीनमधे असतात. त्यांची छाननी, तपासणी भारतात करता येत नाही.
  • Log in or register to post comments
स
सुमीत Fri, 12/15/2017 - 07:44 नवीन
वनप्लस ची चोरी गेल्या दहा महिन्यात दोनदा पकडली गेली, पहिल्यांदा बेंचमार्क आणि नंतर फोन मधली माहिती चिनी सर्वर वर साठवणूकीची. पुढच्या मे महिन्यात युरोप मधे GDPR सुरु झाले की अश्या बर्याच कंपन्या उघड्या पडतील.
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Fri, 12/15/2017 - 08:07 नवीन
यासंबंधीचा काही तर दुवा असेल तर द्या ना
  • Log in or register to post comments
स
सुमीत Fri, 12/15/2017 - 08:10 नवीन
http://www.deccanchronicle.com/technology/in-other-news/161017/oneplus-to-reconsider-data-collection-policies-after-privacy-fiasco.html https://www.theregister.co.uk/2017/06/21/oneplus_cheat_codes_for_benchmarks/
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 12/15/2017 - 09:37 नवीन
माझा डाऊट.... जगामध्ये मोबाईल (आयफोन सुद्धा),टॅब लॅपटॉप इ डिव्हाईस , मॅन्युफॅक्चर करणारे देश आणि त्यांचं बाजारपेठतील % हिस्सा कळेल का ? उदा मला मोबाईल घ्यायचाय, ज्यातील एकही पार्ट(कितीही छोटा व नगण्य असला तरीही) चीन मधे निर्माण झालेला नकोय... कोणता मोबाईल घेऊ.... असेंबल इन थायलंड वैगरे प्रकारातील असा नकोय, कारण चिप ही मेड इन चायना असू शकते.....
  • Log in or register to post comments
स
सुमीत Fri, 12/15/2017 - 10:44 नवीन
Blackberry, up to Z10 and Z30. Current models are made by some Chineese. Samsung, few models are being built in India, few parts from Taiwan and major from Korea
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 12/15/2017 - 13:05 नवीन
मी तर कबूतरं पाळायचं म्हणतोय.. पण एक शंका आहे, ती तरी भारतीयच असतील ना ?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा