Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आता ई-बुक मोडी लिपीतही! जाणून घ्या पहिल्या मोडी ई-बुक निर्मिती मागची धडपड

क
कौशिक लेले
Mon, 12/11/2017 - 18:45
💬 15 प्रतिसाद
नुकतेच मी मराठी भाषेतील पण मोडी लिपीतील जगातील पहिलेच ईबुक वाचले. जयसिंगराव पवार लिखित "राजर्षी शाहू छत्रपती महाराज" हे पुस्तक नवीनकुमार माळी यांनी मोडी लिपीत लिप्यंतरित करून ईबुक स्वरूपात सादर केले आहे. ई-बुक वाचून पूर्ण केले आणि नेहमीप्रमाणे माझ्या पुस्तक परिक्षणाच्या ब्लॉगवर त्याबद्दल लिहिले. नेहमी पुस्तक परीक्षणाबद्दल मिपावर लिहीत नाही पण नेहमीच्या पुस्तकांपेक्षा हे वेगळं आहे म्हणून म्हटलं चोखंदळ मिपाकरांना या बद्दल सांगावं. Modi lip ebook मोडी लिपीच्या प्रचारासाठी नवीनकुमार अतिशय समर्पित भावनेने आणि कल्पकतेने (dedication and innovation) काम करत आहेत. मोडी शिकवणाऱ्या त्यांच्या "मोडी लिपी शिका सरावातून (Modi Script Learn & Practice" पुस्तकाची ओळख काही दिवसांपूर्वी मी माझ्या ब्लॉगवर करून दिली होती ( http://kaushiklele-bookreview.blogspot.in/2017/10/modi-script-learn-practice.html ). त्याचा पुढचा टप्पा म्हणून मोडी मुळाक्षरे शिकल्यावर विद्यार्थ्याला मोडीत वाचन सराव करता यावा या उद्देशाने त्यांनी हे ईपुस्तक तयार केलं आहे. नमुन्यादाखल त्यातलं पाहिलं पान : modi book page1 ईपुस्तक तयार करायचे तर त्यासाठी मोडीत टायपिंग करता आलं पाहिजे. टायपिंग करायचं तर त्यासाठी मोडी फॉन्ट पाहिजे. या आधी काही व्यक्तींनी असे फॉण्ट बनवायच्या प्रयत्न केला होता पण त्या फॉन्ट मध्ये काही ना काही त्रुटी होत्या. त्यांनी प्रयत्नपूर्वक सुयोग्य फॉन्ट बनवला. हे काम वाटतं तितकं सोपं आणि पटकन होण्यासारखं नव्हतं हे मला जाणवलं म्हणून मी नवीनकुमारांना त्यांचा या प्रयासाबद्दल सविस्तरपणे लिहायला सांगितलं. माझ्या आग्रहाला मान देत त्यांनी या प्रयासाबद्दल मोकळेपणे लिहिलं आहे. हे मनोगत आणि या पुस्तकाबद्दल अधिक माहिती तुम्ही इथे वाचू शकता. http://kaushiklele-bookreview.blogspot.in/2017/12/first-ebook-in-modi-script-story-of-modi-font.html (पूर्ण लेख पुन्हा इथे उतरवला नाहिये. फक्त लिंक दिलीये क्षमस्व) नवीनकुमारांच्या प्रयत्नांना सुज्ञ मिपाकर नक्कीच दाद देतील, इतरांना याबद्दल सांगून मोडी प्रसारासाठी आपला हातभार लावतील याची खात्री आहे. धन्यवाद, कौशिक लेले

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 16368 views

💬 प्रतिसाद (15)
द
दुर्गविहारी Mon, 12/11/2017 - 19:20 नवीन
वा !!! खुपच चांगला आणि अत्यावश्यक प्रयत्न. नवीनकुमार साहेबांचे अभिनंदन आणि हि माहिती पुढे आणल्याबद्दल तुमचे आभार.
  • Log in or register to post comments
क
कौशिक लेले Tue, 12/12/2017 - 06:26 नवीन
धन्यवाद !!
  • Log in or register to post comments
न
निनाद Mon, 12/11/2017 - 23:16 नवीन
मोडी लिपी जिवंत ठेवण्यासाठी चाललेली धडपड स्पृहणीय आहे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Tue, 12/12/2017 - 06:08 नवीन
भारी
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 12/12/2017 - 06:18 नवीन
सलाम! असं वाचलं की काही ' नवीन ' करायचा उत्साह येतो! धन्यवाद या ओळखीबद्दल.
  • Log in or register to post comments
क
कौशिक लेले Tue, 12/12/2017 - 06:28 नवीन
तुम्हाला आवडलं हे वाचून बरं वाटलं.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 12/12/2017 - 06:42 नवीन
मोडी लिपी लिहिता येणारे कोणी आहे का मिपावर?
  • Log in or register to post comments
म
मनिम्याऊ Tue, 12/12/2017 - 08:09 नवीन
वाचायला अवघड जाते.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Wed, 12/13/2017 - 04:56 नवीन
कांचन कराई आहेत.
  • Log in or register to post comments
स
सांरा Tue, 12/12/2017 - 07:57 नवीन
https://learn-modi-script.blogspot.in/2017/07/resource.html https://learn-modi-script.blogspot.in/2017/07/modi-in-todays-world.html
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 12/12/2017 - 09:23 नवीन
स्पृहणीय उपक्रम !
  • Log in or register to post comments
स
संग्राम Tue, 12/12/2017 - 10:37 नवीन
असेच म्हणतो ...
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 12/13/2017 - 14:03 नवीन
अत्यंत कौतुकास्पद!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 12/24/2017 - 07:19 नवीन
आपल्याला यातलं काही घंटा समजत नाही, पण स्तुत्य उपक्रम !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मुझे कितना प्यार है तुम से, अपने ही दिल से पूछो तुम जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है :- Dil Tera Deewana [ Mohammed Rafi, Lata Mangeshkar ]
  • Log in or register to post comments
क
कौशिक लेले Sun, 12/31/2017 - 08:35 नवीन
:) धन्यवाद
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा