Making of photo and status : १०. अंतिम भाग (समारोप)
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.
http://www.misalpav.com/node/41232
समारोपाचे मनोगत :
काही अपरिहार्य कारणास्तव (कोणतेही कारण न सांगण्याकरिता हे एक चांगले कारण असते, नाही!!!? हा! हा!! हा!!) माझी ही मालिका मी थांबवत आहे. तरी मी असे करण्याचे कारण सांगतो. गेले दहा आठवडे म्हणजे अडीच महिने मी ही मालिका चालवत असताना एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली, की दर रविवारी मी मालिकेचा नवीन भाग प्रसिद्ध करतो. रविवार ते मंगळवार, बुधवार प्रतिक्रियांना उत्तरे देण्यात जातात. गुरुवार ते शनिवार पुन्हा नवीन भाग लिहितो. आणि रविवारी तो प्रसिद्ध करतो. गेले अडीच महिने हे असेच चक्र चालू आहे. त्यामुळे होतंय काय, की एकाच प्रकारच्या लिखाणात मी अडकून पडलोय. माझे इतर लिखाण आणि वैयक्तिक वाचन बंद झालेय. जरका मी अजून पुढील दहा भाग लिहिले तर पुन्हा पुढील अडीच महिने त्या चक्रात अडकून पडण्याची निश्चिंती झाली. आणि हे लेखक म्हणून मला नक्कीच परवडणारे नाही. लेखकाने नेहमी चौफेर लिखाण करावे या गोष्टीला माझ्या स्वतःकडूनच बाधा येत आहे.
आणि म्हणूनच खालील ११ फोटो आणि त्यांचे स्टेटस एकत्रच प्रसिद्ध करून माझ्या ह्या मालिकेला मी आज पूर्णविराम देत आहे. खालील फोटो आणि स्टेट्सना मी मेकिंग लिहिले नाही, याकरिता आपण नाराज व्हाल याची मला कल्पना आहे. त्याबद्दल मी आपली माफी मागतो. नऊ मेकिंगसहित वीस फोटो आणि त्यांचे स्टेटस अशा या मालिकेला आपण भरभरून प्रतिसाद दिलात, माझ्या कार्याचे कौतुक केलेत, एका नवीन प्रयोगाला पाठिंबा दिलात, याकरिता मी आपणां सर्वांचा आभारी आहे.
माझ्या एका वैयक्तिक ग्रुपवर चर्चा करताना मला making of photo and status ची कल्पना सुचली. आणि आपण ती उचलून धरली याचा मला फार आनंद आहे. दर आठवड्याला एक मेकिंग लिहिणे आणि रविवार सकाळची बरोबर नऊची वेळ पाळून ते प्रसिद्ध करणे हे कार्य माझ्याकरीता खरोखरच आव्हानात्मक होते, जे पूर्ण करताना मला फार आनंद मिळाला. पुष्कळ काही शिकायला मिळाले. वैयक्तिक अडचणींवर मात करून, Dead line पाळून आणि लेखाची गुणवत्ता सांभाळून लिखाण कसे करावे, याचा मला चांगलाच सराव झाला. याचे संपूर्ण श्रेय मी आपणां सर्वांना देतो. महिन्यातून एखादा लेख लिहिणाऱ्या मला, लागोपाठ नऊ रविवार लेख लिहिता येण्यामागे आपण दिलेल्या प्रोत्साहनाचाच मोठा सहभाग आहे. त्याकरिता आपले पुन्हा एकदा आभार!
यापुढील माझ्या लिखाणालाही आपले असेच प्रेम, आशीर्वाद आणि आश्रय मिळेल याची मला खात्री आहे.
कळावे, लोभ असावा ही विनंती.
--- सचिन काळे.
महत्वाची सूचना : खालील फोटो हे फेसबुकवरून दिलेल्या लिंक आहेत. त्यामुळे ज्यांच्या नोडवर फेसबुक चालत नाही त्यांना खालील फोटो दिसणार नाहीत.
१) भाजीवाली.
हियां तो हम बहुत खुस हैं। ऐसन लागत है के हम अपन के खेत मांही बैठें है। हां! तरकारी के खेत मां। और बतावा, गईयान को कोई बछडा वछडा होई के नाही?
२) फुलपाखरू.
फुलपाखरु म्हणे, सोडवेना मज साथ ह्या सुंदर हातांची, स्पर्शुनी येतसे आठवण माझ्या प्रियतमेची !!!!
३) पपई.
पपई नांव आहे माझं. पण मला पालक भारी आवडतो. I am a sailor man. माझ्या हाताची बेंडकुळी पाहिलीत का ? एक ठोसा लगावला ना तर समोरचा थेट ढगात जातो.
४) घोडा.
छान झालं, माझ्या मालकाचं तंगडं मोडलं ते! ढोल्या कुठचा! जणू गव्हाचं पोतंच कि हो! आता काही दिवस फुकटच्या रपेटीतून माझी सुटका! हिं हिं हिं हिं !!!
५) मछली.
खालील स्टेटस मी सहज गंमत म्हणून लिहिलं होतं. whatsapp करिता नव्हतं. त्यामुळे ते जरासं मोठं झालेलं दिसेल.
1- ए शेंबड्या !!! हो बाजुला, नाहीतर मला स्वाईन फ्लूचा प्रसाद देशील.
2- हे राम !!! फक्त एका फोटोकरता, नाही त्या गोष्टीचा मला मुका घ्यावा लागतोय.
3- ए भवाने !!! पडून रहा की गुमान. कशापायी वळवळतेय, गुदगुल्या होतायत् ना मला.
4- कधीचा XXणाला चावतोय मेला !!!
६) डोळा.
काय भौ? ठिक हाए ना? का म्हून माझ्या डोळ्यात बघतायसा? लई आवडल्याले दिसत्यात. हाइतच झ्याक ! आमची मिशेस तर लई जीव टाकते बघा माझ्या डोळ्यांवर.
७) ताट.
मटकीच्या ऊसळीचा रस्सा, नुकत्याच तव्यावरुन काढलेल्या चपात्या, पापड आणि कैरीचं लोणचं असा जेवणाचा खासा बेत. वाह्! स्वर्ग! स्वर्ग! म्हणतात तो हाच.
८) माय क्रश.
मोटरसायकलवाल्या आज्जीबाई !!!..... My Crush !!!...... Please, don't tell anybody, हां !!!...... It's my dammmmn secret !!!.....
९) कामवालीबाई.
बघा बाईजी, सक्काळच्या वखताला तुमची खिटपिट नाय पायजेल. म्या सांगतो, जमतंय तर ठेवा, नायतर आत्ताच्याला माझा हिसाब चुकता करून टाका. बात फिनीस्!
१०) अवतार.
"नको ! नको !! नको ना काढू माझा फोटो !!! माझा अवतार काही बरोबर नाहिए."..... मी आपला प्रेमाने फोटो काढायला गेलो तर सौ.ने माझा असा पोपट केला.
११) स्टाईल.
असं करायचं नाही बाळा. स्टाईल मारायची होती तर दुसरं कोणतंही झाड पकडायचं. बिचार्या जोडप्यांना त्रास दिलास. त्यांचं आपलं चाललं होतं, गुलुगुलु.
(समाप्त)
--- सचिन काळे.
माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

💬 प्रतिसाद
(18)
अ
असंका
Mon, 12/11/2017 - 11:02
नवीन
छान!
- Log in or register to post comments
स
सचिन काळे
Mon, 12/11/2017 - 14:15
नवीन
@ असंका, धन्यवाद!
- Log in or register to post comments
च
चामुंडराय
Sun, 12/17/2017 - 15:25
नवीन
सचिनदा,
तुम्ही ही मालिका थांबवली हे वाचून वाईट वाटले. ही एक नवीन संकल्पना होती. मराठी साहित्यात / सारस्वतात असा प्रयोग या पूर्वी कोणी केला असेल असे वाटत नाही. मिपाच्या भाषेत मी पयला असे तुम्ही नक्कीच म्हणू शकता. दर रविवारी सकाळी नवीन मेफोस्टे चा एपिसोड बघण्याची आणि वाचण्याची उत्सुकता असायची. परंतु थोडक्यात गोडी हेच खरे अन्यथा केकाटणारी कपुरांची केकता होते. आणि कुठल्याही सुरवात झालेल्या चांगल्या गोष्टीचा कधींनाकधी शेवट व्हायचाच हे अंतिम सत्य तर आहेच.
नेव्हरदलेस, पुढील लिखाणासाठी तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या हातून असेच नवनवीन प्रयोग होवोत आणि त्यातून इतरांना लिहिण्याची प्रेरणा मिळो हीच सदिच्छा.
- Log in or register to post comments
स
सचिन काळे
Mon, 12/18/2017 - 16:37
नवीन
@ चामुंडराय, आपल्या सविस्तर अभिप्रायाकरिता आपणांस खूप सारे धन्यवाद! ह्या मालिकेच्या वाटचालीत आपण सदैव माझ्याबरोबर होतात, हे जाणवून मला आनंद झालाय.
आपण मला 'मी पयला' हा मान दिल्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. आणि आपण मला दिलेल्या पुढील वाटचालीच्या शुभेच्छांकरिताही आपले आभार!
बादवे, आपण लिहिलेला 'मेफोस्टे' हा शब्द अतिशय आवडला. तसेच, हा शब्द बनवताना आपण घेतलेल्या मेहनतीचीसुद्धा जाणीव झाली. अशा प्रकारच्या लिखाणाला यापुढेही हाच शब्द रूढ व्हावा हीच इच्छा.
- Log in or register to post comments
आ
आवडाबाई
Tue, 12/19/2017 - 02:12
नवीन
एक नंबरचा फोटो आणि स्टेटस दोन्ही एक नंबर आहे !!
मालिका छान झाली. "पयला" बद्दल अभिनंदन !!
आता पुढील लिखाण काय त्याची उत्सुकता आहे . शुभेच्छा.
येत्या रविवारी ९ वाजता ??
- Log in or register to post comments
स
सचिन काळे
Tue, 12/19/2017 - 09:11
नवीन
@ आवडाबाई, धन्यवाद!
- Log in or register to post comments
आ
आवडाबाई
Tue, 12/19/2017 - 02:13
नवीन
एक नंबरचा फोटो आणि स्टेटस दोन्ही एक नंबर आहे !!
मालिका छान झाली. "पयला" बद्दल अभिनंदन !!
आता पुढील लिखाण काय त्याची उत्सुकता आहे . शुभेच्छा.
येत्या रविवारी ९ वाजता ??
- Log in or register to post comments
च
चामुंडराय
Tue, 12/19/2017 - 04:30
नवीन
असं म्हणतात a picture is worth a thousand words
आणि मी म्हणतो a video is worth a ten thousand pictures
तेव्हा आता तुम्ही मेकिंग ऑफ व्हिडीओ स्टेटस लिहायला घ्या, हि आग्रहाची विनंती.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 12/19/2017 - 05:27
नवीन
ही विनंती वाचून "कामोत्सुकगर्दभाराधना" अर्थाचा एक ग्राम्य वाक्यप्रचार आमच्याकडे चालतो त्याची आठवण आली.
- Log in or register to post comments
स
सचिन काळे
Tue, 12/19/2017 - 10:07
नवीन
@ अभ्याजी, :स्मित:
- Log in or register to post comments
च
चामुंडराय
Tue, 12/19/2017 - 14:58
नवीन
म्हणजे अभ्याजी तुमच्या ग्राम्य कल्लापुर इस्टाईल परंतु मिपिय हुच्च्भ्रू नागर भाषेत व्हीडिओत्सुकसचिनार्धना असे म्हणता येईल, नाही का?
- Log in or register to post comments
स
सचिन काळे
Tue, 12/19/2017 - 10:05
नवीन
@ चामुंडराय, तेव्हा आता तुम्ही मेकिंग ऑफ व्हिडीओ स्टेटस लिहायला घ्या, हि आग्रहाची विनंती. >>> हो! जरूर!! कल्पना छान आहे. धन्यवाद.
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Wed, 12/20/2017 - 05:41
नवीन
मात्र त्याला मेफोस्टे न म्हणता मेव्हिस्टे म्हणा..!
हा हा हा..!!
- Log in or register to post comments
स
सचिन काळे
Wed, 12/20/2017 - 07:45
नवीन
@ खेडूत, मात्र त्याला मेफोस्टे न म्हणता मेव्हिस्टे म्हणा..! >>> हे मात्र अगदी बरोबर. हा! हा! हा!!
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Wed, 12/20/2017 - 05:47
नवीन
दर रविवारी चहाचा वाफाळता कप हातात घेऊन काळे साहेबांंचा लेख वाचणे हे एक समीकरणच झाले होते.
काळे साहेब, २० भाग टाकणार असे आश्वासन देऊन १० भागातच थांंबलात. ये अच्छी बात नही है.
- Log in or register to post comments
स
सचिन काळे
Wed, 12/20/2017 - 08:08
नवीन
@ अभिजीत अवलिया, दर रविवारी चहाचा वाफाळता कप हातात घेऊन काळे साहेबांंचा लेख वाचणे हे एक समीकरणच झाले होते. >>> धन्यवाद, अभिजीतजी.
२० भाग टाकणार असे आश्वासन देऊन १० भागातच थांंबलात. ये अच्छी बात नही है. >>> माफी असावी, अभिजीतजी. आपणांस माझ्यावर नाराज होण्याचा हक्कच आहे. तरी माझी होणारी अडचण मी समारोपाच्या मनोगतात मांडलेली आहे. आपण मोठ्या मनाने ती नक्की समजून घ्याल याची मला खात्री आहे. कळावे, लोभ असावा.
- Log in or register to post comments
ज
जागु
Wed, 12/20/2017 - 08:11
नवीन
तुमच्या पुढच्या लिखाणाला शुभेच्छा.
- Log in or register to post comments
स
सचिन काळे
Wed, 12/20/2017 - 09:08
नवीन
@ जागुजी, आपले फार फार आभार.
- Log in or register to post comments