Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

नवा कवी

ग — गबाळ्या, Wed, 12/06/2017 - 06:43
मिपा ने सर्व साहित्यिकांसाठी खुला मंच उभा करून या युगातील एक महत्कार्य केले आहे. खुला मंच, फुकटात प्रकाशन आणि फुकटात श्रोते. हे म्हणजे नवकवींच्या हाती लेखणी दिल्यासारखेच झाले. आम्ही या सर्व नवकवींचे खंदे समर्थक आहोत. ज्याप्रमाणे केशवसुतांनी "नवा शिपाई" या कवितेतुन नव्या पिढीचे मनोगत व्यक्त केले होते, त्याचप्रमाणे आम्ही या कवितेतून अशा सर्व नवकवींचे मनोगत व्यक्त करत आहोत नवा कवी नव्या कवितील नवकाव्याचा क्रूर कवी मी आहे कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे गणहि नाही, छंदहि नाही, न मी जाणी वृत्ताला ठेचे मीटर मी जे आडवती उगाच काव्याला मुर्दाड असे हि तुमची भूक जिल्ब्यांचे जरी तुम्हा ना सुख घालीत जाईन तरी रतीब काव्यास माझ्या लाथा पडणे अगदी मला ना साहे ! कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे -- बेचवभूत

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2590 views

💬 प्रतिसाद
ट
टवाळ कार्टा Wed, 12/06/2017 - 10:02 नवीन
बेचवभूत =))
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days ago
  • सुंदर !!
    3 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा