Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

दरस बिना..

स
समयांत
Mon, 12/04/2017 - 20:37
समुद्राचा तळ गाठता येत नाही, आणि अश्रूचा स्रोतसुद्धा सापडत नाही.. दोघांना अस्तित्व खारेच आहे, एक अथांग तर दुसऱ्याचे अलौकिक. दुपार सरत असतांनाचा वेळ, चार ते पाचचा, या वेळेत सारे भरून आलेले असते. ना खोल ना गंभीर, सगळे सुटेसुटे होणारे गुंते. वासांनी निर्माण झालेले जग मोकळे होत एक केवळ श्वास होणारे. शांतता आणि अस्वस्थता एकाच वेळी जाणवते अश्यावेळी, शांतता म्हणजे दुपारची काहिली संपणारी असते म्हणून, आणि अस्वस्थता यासाठी कि संधिप्रकाशाचा खेळ सुरु होणार काही वेळाने म्हणून. एक एक पळ युगासारखा भासतो, श्वासांचे स्पष्ट येणेजाणे दिसते, येणारा लौकर जातो पण जाणारा मात्र रेंगाळत राहतो. पुस्तक वाचावे कि लिहावे कि ऐकावे काही; कि पाहावे असं भिरभिरत राहतं मन, खरी सृजनवेळ आल्यासारखं होतं. Samayant मनासारखी घडी बसवायला नको नको ते प्रसंग मनात पुरून घ्याव्या लागतात, हव्याहव्याश्या ज्या गोष्टी जिव्हाळा लाऊन साठवलेल्या असतात, त्यांना मनातून उसवून टाकाव्या लागतात. मानलेला कोणीएक आपला माणूस असतो, आपण त्याला हव्यासाने आपल्या जवळ केले असते. नुसते त्यावर मन गोठवून ठेवलेले असते, त्याच्या सहवासाने आपल्या जीवनात आलेली दाट छाया पुष्कळ वाटू लागलेली असते. मग असेच, विनाकारण जीव खाली वर करत त्याच्या सोबत असतांनाही त्याच्याच आठवणीत निरंतर मश्गुल राहण्यात आयुष्य बनत जात असते. असे असण्यात कुठे मनाला दुबळेपणा येतो, तर मनाचे सबलीकरण कशात आहे हे विसरायला होते.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1266 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 6 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा