Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

मोह

ज — ज्योति अळवणी, Mon, 12/04/2017 - 04:28
मंद धुंद ही हवा... सहवास तुझा हवा हवा.. नितळ कांतीवरील दवातून.. ओघळू दे गंध नवा! पहाट वारा... सरसर काटा.. नयन पुष्पे अर्धोन्मलीत ती.. कोकीळ कंठी माळ अडकली; युगुल कबुतरे मूक होती! मोहक कटीवर घट्ट मिठी अन्.. कुंतलात त्या मन बहकले! नव यौवना तू.. मोहक.. सुंदर.. सूर्य किरणांनाही मोह पडे!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1669 views

💬 प्रतिसाद
र
राघव Fri, 12/22/2017 - 19:10 नवीन
वर्णनात्मक रचना छान. सूर्यकिरणांच्या मोहाची कल्पनाही सुंदर.. पण अगदी राहवलं नाही म्हणून - - शब्द.. त्यांनी निर्माण केलेली सॄष्टी.. ती भिडायला हवी.. कल्पना प्रत्यक्षात उतरतांना आपल्यालाच "हाssssय..." असं वाटायला हवं.. :-) मूळ कल्पनेच्या ऐवजी दुसर्‍या जागी असं झालं तर रचनेवर अजून काम होणं गरजेचं. - शीर्षक आणि रचनेचा गाभा यांत थोडं अजून सिंक्रोनायझेशन [मराठी?] हवं.. सूर्यकिरणांना पडलेल्या मोहाच्या अनुषंगानं लिहायचं झालं तर कसं होईल? मुळात कवितेचा चढ जिथं सुरू व्हायला हवा, तिथंच कविता संपते आहेसं झालंय.. - मुक्तछंदात मीटर कडे लक्ष न दिलेलं चालतं. पण लयबद्ध रचनेत मीटरचं पथ्य पाळायला हवं. मग त्या अनुषंगानं थोडे बदल घडवावे लागतात.. आणिक नवीन शब्द शोधावे लागतात.. तसं करत आपलं शब्दभांडार आपण वाढवत जातो. आपलं लेखन चांगलं आहे. अजून छान व्हावं म्हणून सांगावं वाटलं. पटलं तर घ्यावं.. नाहीतर सोडून द्यावं. राघव
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Sun, 12/24/2017 - 04:29 नवीन
धन्यवाद. आपल्या सूचना पुढच्यावेळी लक्षात ठेवेन
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days ago
  • सुंदर !!
    3 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा