Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

कविराज

ग — गबाळ्या, Sat, 12/02/2017 - 22:35
नमस्कार मिपाकर! मी मिपाचा नवीन सदस्य. तुमच्यासाठी एक रचना घेऊन आलो आहे. तुमच्या प्रतिक्रियेची अपेक्षा आहे. अगदी परखडपणे तुमच्या प्रतिक्रिया मांडा. मग त्या सकारात्मक असोत, नकारात्मक असोत, तटस्थ असोत वा सल्ले/उपदेश असोत. स्वयंसुधारणेसाठी मला त्याचा नक्कीच उपयोग होईल. ( कवीला व्यासपीठ मिळणं, श्रोते मिळणं, हि पर्वणीच आहे. आणि कोणा कवीला जर श्रोते स्वतःहुन म्हणत असतील कि आम्ही तुमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आतुर झालो आहोत, तर ते त्या कवीचं अहोभाग्यच. असं भाग्य एका नवकवीच्या वाट्याला आलं. त्याची हि कविता. कवितेचं नाव आहे "कविराज" ) अहो भाग्य हे तया लाभले सारे श्रोते अधीर जाहले उत्साहाने कविता करण्या टाकुनी कामे टाक उचलले बालकवी ते गदिमा स्मरले कल्पिताच मग बाहू स्फुरले अजरामर हे काव्य करूया असे मनाशी पक्के ठरले प्रयासांच्या सरी बरसल्या शब्दांच्या मग फैरी झडल्या यमका मागूनी आली यमके पंक्ती तरीही फिक्या वाटल्या गण मात्रा अन यतिभंग याचा काही नसेच गंध मनासीच मग म्हणे आपुल्या बरा आपुला मुक्तछंद कागदांचे ढीग जाहले दौतीनेहि तोंड वासले कविराजांचे यत्न बापुडे सारेच्या ते सारे फसले म्हणे कवी मज प्रतिभा खाशी परी लेखणी आहे कलुषि कविते लायक कागद मिळता सुचेल कविता चुटकीसरशी कविराजाला सांगा कोणी आडातच जर नसेल पाणी पोहऱ्यात मग येई कोठूनी पोहऱ्यात मग येई कोठूनी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1909 views

💬 प्रतिसाद
ए
एस Sun, 12/03/2017 - 02:12 नवीन
व्वा! कविराज, व्वा!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 12/03/2017 - 03:58 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days ago
  • सुंदर !!
    3 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा