Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

चुकले...

अ — अजब, Sat, 12/02/2017 - 06:00
गंध उधळला इकडुन तिकडे, वाऱ्याचे चुकले निखळुन पडला वरून खाली, ताऱ्याचे चुकले दूर जाउनी परतुन आली, वाटेचे चुकले किनाऱ्यावरी विसावली अन लाटेचे चुकले घाव लागला वर्मी, होते बाणाचे चुकले तडफडला पण गेला नाही, प्राणाचे चुकले बुडून गेली वस्ती सगळी, प्रलयाचे चुकले इतके कुणास अपुले म्हटले, हृदयाचे चुकले...

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4338 views

💬 प्रतिसाद
स
समयांत Sat, 12/02/2017 - 08:33 नवीन
भारीच...चुकले!! आवडले.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 12/02/2017 - 09:24 नवीन
मस्त लयीत आहे. आवडलीच! Sandy
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 12/02/2017 - 12:02 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 12/03/2017 - 07:02 नवीन
रंग उडाला इकडुन तिकडे, अंदाजच चुकले निखळुन पडला वरून कुंचला, भानही हुकले आस लावली ओठांना ह्या, शब्दांना मुकले मिट्ट रात्रीच्या उजळ प्रकाशी, आभाळही झुकले निष्प्राण वाटेवरच्या डोळ्यातले रक्तही सुकले कुठून पाहता मिट्ट रात्रीचे तारेही लुकलुकले घनदाट निळ्यातील चुकार लेमनी, हळूच शुकशुकले इतके कुणास अपुले म्हटले, वसंताचे चुकले... . लव्हिंग व्हिन्सेंट
  • Log in or register to post comments
स
सानझरी Mon, 12/04/2017 - 10:13 नवीन
आवडली कविता!!
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sun, 12/03/2017 - 07:15 नवीन
अजब आणि अभ्या, कविता मस्त आहेत.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 12/03/2017 - 07:29 नवीन
चक्क प्रेम कविता? भारीच केलीय, अगदी अलवार आनंदीत नाखु
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days ago
  • सुंदर !!
    3 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा