Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

माचू पिक्चू - भाग ६

उ
उदय
Wed, 11/29/2017 - 05:06
💬 16
भाग १...भाग २...भाग ३...भाग ४...भाग ५...भाग ६ फोटो: अपूर्ण मंदिर Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; फोटो: इथे वरती वेगवेगळी झाडे/वनस्पती आहेत जी इंका लोक वापरत असत. कोकाची पाने ते वेदनशामक म्हणून वापरत असत. Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; फोटो: Intihuatana सनडायल Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; फोटो: पवित्र दगड (Sacred Rock) हा एकच मोठा दगड आहे आणि तो पवित्र मानला जातो. बरोबर मागे जसा पर्वत दिसतो, तसाच ह्याचा आकार दिला आहे. Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; फोटो: वॉटर मिरर. आकाशातील तारे इंकाज थेट न बघता त्यांचे प्रतिबिंब ते इथे बघत असत. Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; फोटो: Condor (दक्षिण अमेरिकेत आढळणारे एक गिधाड) याचे मंदिर. Condor ला पुढील जन्माचे प्रतीक समजतात. Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; फोटो: Condor याचे मंदिर २ Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; फोटो: Condor याचे मंदिर ३. यात पक्षाचा डोळा आणि चोच स्पष्ट दिसत आहे. Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; फोटो: हुआना पिक्चू Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; फोटो: पॅनोरमा Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; फोटो: पॅनोरमा २. मागे हुआना पिक्चू Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; फोटो: इंका लोकांचे ३ देव Condor, Puma, Snake दाखवणारा पुतळा (Agues Calintes इथे) Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; ट्रेल संपवून खाली Agues Calintes गावात आलो आणि मस्तपैकी पिस्को सावर आणि बियरचा आस्वाद घेतला.
फोटो: पिस्को सावर
Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash;

मी काही इंका लोकांसारखा पिल्ग्रिमेजसाठी गेलो न्हवतो, पण मला स्वतःलाच जरा स्वतःचा फिटनेस बघायचा होता, थोडे आत्मपरीक्षण करायचे होते, आरामाच्या कोशातून जरा बाहेर पडायचे होते. आणि इंका ट्रेल हा माझ्या बकेटलिस्टवर बरेच वर्ष होता. त्यामुळे हा प्रवास शारिरीकदृष्ट्या त्रासदायक होता, पण अतिशय समाधान देणारा होता आणि त्या आठवणी मला आयुष्यभर साथ देणार्‍या आहेत. फोटो: हे माझे सन्मान पदक (Medal of Honor) Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; फोटो: स्मरणिका (Souvenir) टी शर्ट. I survived the Inca Trail !! Uday's Photos: Inca Trail 3-6th Nov 2017 &emdash; माचू पिक्चूला जायला मला ट्रेनचा पर्याय होता किंवा दुसरा पर्याय इंका ट्रेलचा पण होता. मला बर्‍याच जणांनी सांगितले होते की कशाला इतकी कटकट करून चालत जातोस? आरामात ट्रेनने जा. पण शेवटी वाटले तेच केले. रॉबर्ट फ्रॉस्ट्ने त्याच्या कवितेत हे अगदी अचूक मांडले आहे. The Road Not Taken TWO roads diverged in a yellow wood, And sorry I could not travel both And be one traveler, long I stood And looked down one as far as I could To where it bent in the undergrowth; 5 Then took the other, as just as fair, And having perhaps the better claim, Because it was grassy and wanted wear; Though as for that the passing there Had worn them really about the same, 10 And both that morning equally lay In leaves no step had trodden black. Oh, I kept the first for another day! Yet knowing how way leads on to way, I doubted if I should ever come back. 15 I shall be telling this with a sigh Somewhere ages and ages hence: Two roads diverged in a wood, and I— I took the one less traveled by, And that has made all the difference. (समाप्त)


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 12674 views

💬 प्रतिसाद
स
संग्राम Wed, 11/29/2017 - 05:38 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 11/29/2017 - 05:46 नवीन
अतिशय झकास झाली ही लेखमाला. आता माचूपिक्चूचा ट्रेल आमच्याही बकेटलिष्टात ऍडला आहे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
अ
अमित लिगम Wed, 11/29/2017 - 05:57 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 11/29/2017 - 10:01 नवीन
सुंदर लेखमाला ! माचू पिक्चूला रेल्वेने आणि पायी जाता येते हे माहीत होते. पण, पायवाट इतकी खडतर आहे हे माहीत नव्हते ! आता माचू पिक्चू भेट देण्याच्या ठिकाणांच्या यादीत बरेच वर सरकले आहे ! :)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 11/29/2017 - 11:25 नवीन
जब्राट
  • Log in or register to post comments
न
निशाचर Wed, 11/29/2017 - 17:12 नवीन
खूप मस्त झाली ही लेखमाला. या भागातील पॅनोरमा फोटो विशेष आवडले. माचू पिक्चूला कधी जाणं होईल कुणास ठाऊक, पण ही व्हर्चुअल सफर आवडली.
  • Log in or register to post comments
र
रुस्तम Wed, 11/29/2017 - 20:48 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
स
समर्पक गुरुवार, 11/30/2017 - 01:47 नवीन
सगळे भाग आज वाचले. मस्त अनुभव आणि चित्रे...
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 11/30/2017 - 02:26 नवीन
खूप भारी झाली ही मालिका. इन्का लोकांनी लिहिलेले शिलालेख अस्तित्वात आहेत का?
  • Log in or register to post comments
न
निशाचर गुरुवार, 11/30/2017 - 14:52 नवीन
इंकांची भाषा लिखित नव्हती आणि शिक्षणातही पाठांतरावर भर असे, असं वाचलं होतं. कर आकारणी सारखे आकडे वगैरे साठवायला धाग्यांना गाठी मारून ते धागे एकत्र बांधून ठेवत.
  • Log in or register to post comments
उ
उदय गुरुवार, 11/30/2017 - 20:37 नवीन
होय. इंकांची भाषा केचुआ होती जी फक्त बोलीभाषा आहे, त्यामुळे शिलालेख वगैरे प्रकार दिसले नाहीत. अजूनही ३७% पेरुमध्ये, विशेषतः देशाच्या अंतर्गत भागात अजूनही ही भाषा बोलली जाते, असे गाईडने सांगितले, पण हळूहळू ही भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 11/30/2017 - 04:49 नवीन
चांगले झाले प्रवास वर्णन. बघू कधी जायचा योग येतोय का.
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 11/30/2017 - 07:25 नवीन
फोटो वर्णनासह उत्तम लेखमालिका.
  • Log in or register to post comments
उ
उदय गुरुवार, 11/30/2017 - 20:42 नवीन
सर्व प्रतिसाद देणार्‍यांचे आभार. तुम्हाला ही लेखमालिका आवडली हे वाचून छान वाटले. इंका ट्रेल केला नाही तरी माचू पिक्चूला आयुष्यात एकदातरी नक्की भेट द्या.
  • Log in or register to post comments
ए
एमी Fri, 12/01/2017 - 13:15 नवीन
मस्त! छान झाली लेखमाला.
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Fri, 12/01/2017 - 20:34 नवीन
__/\__....
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा