Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

ती त्सुनामी...

अ — अनन्त्_यात्री, Mon, 11/27/2017 - 05:43
सागराच्या गहनगर्भी ती अचानक प्रकटते मोडुनी दिक्काल तिथले, ती पुन्हा ते सांधते वितळणारा तप्त लाव्हा प्राशुनी ती झिंगते गूढ अंध:कार तिथला ढवळुनी फेसाळते गाज दर्याची चराचर भेदुनी रोरावते व्यापते भवताल अन मग ती अनावर उसळते आतले सगळे किनारी ओतुनी आक्रंदते प्रलयतांडव ती त्सुनामी आतले उधळून जाते साचले सांडून जाते घडविले उखडून जाते वेचले विखरून जाते मांडले मोडून जाते ....ती त्सुनामी विप्लवी पण केवढे शिकवून जाते !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1268 views

💬 प्रतिसाद
ग
गबाळ्या Mon, 11/27/2017 - 20:47 नवीन
पृथ्वीच्या मनातील खदखद सुनामीरुपे उफाळून येते, ती आक्रंदुन काही तरी सांगू पाहते ही कल्पना खूप आवडली. तिचे दुःख, तिची अफाट शक्ती, रौद्र रूप, घडणारा विनाश आणि त्याच बरोबर घडणारे नवनिर्माण यांची उत्तम सांगड घातली आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Tue, 11/28/2017 - 05:39 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days ago
  • सुंदर !!
    3 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा