Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

सुरमई एनपॅपिलो

म
मोदक
Mon, 11/20/2017 - 20:39
बरेच दिवस स्वयंपाकघरात हात साफ केला नव्हता म्हणून आणि शेफ केडी व जॅक ऑफ ऑल यांनी फोटो टाकून टाकून जळवले म्हणून एकदाची किचनमध्ये एंट्री मारलीच.. स्वतः मासे फ्राय करण्याची लज्जत मागच्या वर्षी अनुभवली होती म्हणून मासे हाच प्रकार निवडला आणि आमचे द्रोणाचार्य शेफ केडींना शरण जाऊन "माशांचा एखादा वेगळा प्रकार करायचा आहे. काय करू..?" असे विचारले. शेफ केडी यांनी "अरे बेटा.. दॅट्स व्हाय यू शूड कॉल मी..!!" असे बोलून चांगली व ताजी भाजी कुठे मिळेल, मासे कुठे मिळतील याची इत्यंभूत माहिती दिली.एनपॅपिलो या प्रकाराची ओळखही करून दिली. पूर्वी मी एकदा व्हेज बार्बेक्यू केले होते त्याच्या जवळपास जाणारी पाकृ होती. मासे घेताना हा एक प्रकार बघितला.. (हा वजनात मारण्याचा प्रकार आहे का..??) . तिथे जवळच एका भिंतीवर कुणाची तरी प्रतिभा ओसंडून वाहत होती. . तर.. सुरमई एनपॅपिलो साठी साहित्य - १) सुरमईचे जाड तुकडे २) आले, लसूण, मिरची, पुदीना, कोथींबीर वाटून त्याची पेस्ट ३) बडीशेप ४) हळद ५) मीठ ६) दालचिनीचे लहान तुकडे ७) २ पिवळेधमक आणि एकही डाग नसलेले लिंबू - हे शोधावे लागतात. ८) चमचाभर तूप ९) तेल १०) अ‍ॅल्युमिनीयम फॉईल सर्वप्रथम सुरमईचे तुकडे स्वच्छ धुवून घ्या. त्याला आले, लसूण, पुदीना, मिरची ही पेस्ट लाऊन आणि हळद व बडीशेप भुरभूरून मुरवत ठेवा. मुरवताना थोडेसे तेलही लावा. लिंबाचे गोल काप करून घ्या. (यासाठी एकदम धारधार सुरी लागते) . गॅसवर तवा / कढई गरम झाल्यानंतर त्यात तूप घालून त्यावर लिंबाचे काप पसरा आणि थोडे शेकून घ्या. अ‍ॅल्युमिनीयम फॉईल घेऊन त्यावर मुरवलेली सुरमई आणि लिंबाचे काप ठेवा, (लिंबाचे काप शक्यतो स्किन साईडला) दालचिनीचे तुकडे वर ठेवा. त्यावर एका बारीक किसणीने लिंबाची साल किसून घाला - याला लेमन झेस्ट असेही म्हणतात. . अ‍ॅल्युमिनीयम फॉईलचे दोन भाग घेऊन पहिल्यांदा एका भागाची घट्ट पुरचुंडी बांधा आणि नंतर त्यावर दुसर्‍या भागाची पुरचुंडी बांधा म्हणजे आत तयार होणारी वाफ निसटून जाणार नाही व त्या वाफेत मासा अलगद शिजेल. शक्यतो बाजूला घडी येईल अशी पुरचुंडी बांधा म्हणजे तव्याची धग माशापर्यंत नीट आणि समान पोहोचेल. . यानंतर प्रत्येक पुरचुंडी एका बाजूने १० मिनीटे व दुसर्‍या बाजूने ५ मिनीटे थोड्या गरम तव्यावर शेकून घ्या.यानंतर तव्यावरून पुरचुंडी उतरवून ५ मिनीटे तशीच ठेवा. लगेच उघडू नका. पुरचुंडी उघडल्यानंतर मासे + मसाला + बडीशेप यांचा फर्मास दरवळ पसरेल - तो चुकवू नका . सुरमई एनपॅपिलो थंडगार सोलकढी सोबत लगेचच संपतील. ****************************** ही पाकृ तयार होण्यास २० / २५ मिनीटे लागतील.. तोपर्यंत बांगडा तवा फ्राय बनवू शकता. . ******************************

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 20437 views

💬 प्रतिसाद
क
केडी Tue, 11/21/2017 - 00:37 नवीन
जे बात, झक्कास! मस्त रे! निगुतीने केलेलं दिसतच आहे फोटोतून, किप ईट अप!
  • Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं Tue, 11/21/2017 - 01:38 नवीन
बाकी एक प्रश्न: अल्युमिनियम फॉईलच्या ऐवजी केळीची/पळसाची पाने चालतील का?
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 11/27/2017 - 15:33 नवीन
व्हेज बार्बेक्यु - हा धागा चेकव. फोटो दिसत नाहियेत.. एक दोन दिवसात नीट करतो.
  • Log in or register to post comments
भ
भ ट क्या खे ड वा ला Tue, 11/21/2017 - 01:58 नवीन
घरी करणे शक्य नाही .. पण मित्र परिवाराला पाठवतोय .
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Tue, 11/21/2017 - 02:08 नवीन
करुन बघेन.
ताजी भाजी कुठे मिळेल, मासे कुठे मिळतील याची इत्यंभूत माहिती दिली
कुठे मिळतील? मी नेहमी गणेश पेठेत होलसेल मार्केटला जातो.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 11/21/2017 - 07:48 नवीन
मोदक मासा बनवू लागले , संसारी जाहले, बहुत संतोष जाहला ! चला आता मासळीबाजार धुंडाळून सुरमई आणलाच पाहिजे !
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Tue, 11/21/2017 - 07:55 नवीन
भारीच की!!
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Tue, 11/21/2017 - 08:48 नवीन
हेच बाकी होते आता बघायचे. आता डोळे मिटावे म्हणतो..........................वामकुक्षीसाठी. भारीच, कधी खाउ घालतोस ?
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Tue, 11/21/2017 - 10:48 नवीन
आता सुकट घालुन मोदक बघायचे बाकी आहे फक्त.. भारी रे रच्याकने..
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 11/21/2017 - 13:32 नवीन
सुरमई शाम.. वाह. सोलकडीही फार आवडते. झकास.
  • Log in or register to post comments
R
Ranapratap Tue, 11/21/2017 - 14:05 नवीन
करून पाहतो
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 11/21/2017 - 16:06 नवीन
लै म्हणजे लैच झकास
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 11/21/2017 - 18:04 नवीन
झकास ! सुरमई एक अष्टपैलू (versatile) मासा आहे. तिचे जितके प्रकार बनवावे तितके कमीच ! इथे सुरमईचे काप जरा जास्त जाड झाले नाहीत का ? जाड तुकड्यांमध्ये आंबटपणा (मरिनेशन), मीठ आणि मसाला खोल आतपर्यंत जात नाही, त्यामुळे मला स्वतःला, कोणत्याही प्रकारात, माशांचे खूप जाड तुकडे आवडत नाहीत. सुरमईच्या पातळ ते मध्यम (साधारण १.५ ते २.० सेमी) जाडीच्या तुकड्यांना लिंबाचा रस व मीठ लावून दहा मिनिटे ठेवा आणि नंतर आपल्याला आवडणारा कोणताही (आपल्या आवडीप्रमाणे) लसूण व हिरव्या मिरच्यांचा ठेचा लावून तो दहा मिनिटे तुकड्यांत मुरू द्या. आता, साध्या किंवा मायक्रोवेव्ह मध्ये "किंग फिश स्टेक" बनवा. हा माझा अत्यंत आवडता प्रकार ! ओव्हनमधून काढल्या काढल्या, गरम, रसदार आणि लुसलुशीत असतानाच तसाच किंवा स्पॅनिश राईसबरोबर गट्टम करावा ! :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 11/21/2017 - 18:17 नवीन
कधी भेट बीट झाली तर बसू..... :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
M
mayu4u Mon, 11/27/2017 - 09:30 नवीन
करून बघतो.
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Mon, 11/27/2017 - 13:58 नवीन
शाकाहारी असून सुद्धा तोंडाला पाणी सुटले... :)
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 11/27/2017 - 15:43 नवीन
सर्वांचे धन्यवाद. म्हात्रे काका - मुद्दाम जाड काप करून घेतले होते. पण पुढच्या वेळी थोडी कापांची जाडी कमी ठेवेन. इरसाल बुवा - हॅ हॅ हॅ.. प्राडॉ - कधी भेटूया..? ५० राव - सुकट सोबत आपले जमत नै.. :(
  • Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज Wed, 11/29/2017 - 09:11 नवीन
मोदाक्रो तुम्ही सुद्धा? फोटो तर भारी दिसतायेत. करून बघायला हवे. पुढल्या भेटीत हा पदार्थ खाऊ घालण्याचा आग्रह करण्यात येईल याची नोंद घ्यावा. आपला बाबा योगीराज.
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Mon, 12/18/2017 - 18:23 नवीन
कसा काय नजरेतून सुटला हा धागा,झकास,करून पाहीनच.एक्काकाकांचीही सुरमई स्टीक करून पाहीन.
  • Log in or register to post comments
ख
खादाड गुरुवार, 01/04/2018 - 07:53 नवीन
मस्त !!!
  • Log in or register to post comments
न
निश Wed, 01/31/2018 - 06:36 नवीन
मस्त एकदम
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 45 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 57 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा