Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

संघटनांचे एकीकरण आणि शेतकरी आंदोलनाची धग !

अ
अँड. हरिदास उंबरकर
Sun, 11/19/2017 - 11:04
💬 64 प्रतिसाद
संघटनांचे एकीकरण आणि शेतकरी आंदोलनाची धग ! सध्याचा काळ गुलाबी थंडीचा..या काळात सर्वत्र आल्हादायक आणि शांत वातवरण असते. खरीपाचा हंगाम संपून रब्बीची पेरणी झाल्याने शेतकरी ही या काळात काहीसा 'थंड' असतो. नाही म्हणायला खरिपाचा शेतीमाल विक्री आणि कापसासारखं नगदी पीक घरात येण्याचा काळ असल्याने त्याच्याही हातात दोन पैसे खेळू लागलेले असतात. अर्थात, हे चित्र आता इतिहासजमा झाल्यासारखे असल्याने शेतकऱयांची झोप उडालेली आहे. डोक्यावरील वाढता कर्जाचा डोंगर आणि कवडीमोल भावात विकला जाणारा शेतीमाल पाहून गुलाबी थंडीतही शेतकऱयांच्या अंगाची लाही लाही होत आहे. पाच हजाराची सोयाबीन अडीच हजारवर आली, सात हजार क्विंटलने विकला जाणार कापूस चार हजारात घ्यायला कुणी तयार नाही. सरकारची गोदामे भरलेली, त्यामुळे माल विकायला आठवडा आठवडा ची तारीख, इकडे व्यापारी लुटायला तयार. नफा सोडा उत्पादन खर्चही निघायची शास्वती नाही. सरकारने उत्पादन खर्चाच्या ५० टक्के अधिक नफा हमीभाव देण्याचं आश्वासन हवेतच विरलं आहे. कर्जमाफीची घोषणा होऊन पाच सहा महिने झाले, अजून शेतकर्याच्या हातात खडकू पडला नाही. त्यामुळे शेतकरी समाजात वणवा पेटला असून असंतोषाची हि धग दिल्लीत जाऊन धडकली आहे. हमीभाव कर्जमाफी आणि इतर न्याय्य मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीसह देशभरातील तब्बल 180 शेतकरी संघटना २० नोव्हेंबर रोजी राजधानीत निर्णयाक लढ्याचे रणशिंग फुंकणार आहेत. अर्थात, शेतकरी संघटनांची ही एकजूट शेतकऱ्याला न्याय्य मिळवून देण्यासाठी कितपत यशस्वी ठरेल, हे येणारा काळ स्पष्ट करेलचं..मात्र गुलाबी थंडीत निपचित पहुडलेल्या दिल्लीला शेतकरी आंदोलनाची धग निश्चितच गरम करणार आहे.. जवळपास चार दशकापासून शेतकरी आंदोलने सुरु आहेत. शेकडो संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करतात. या संघटनांच्या आंदोलनांनी त्या-त्या पातळीवर मोठी ऊर्जा देखील निर्माण केली आहे. ही सर्व आंदोलने एकवटून शेतीव्यवस्था परिवर्तनाचे एक मोठे आंदोलन उभे राहील व त्यातून शेतकऱयांच्या लुटीची व्यवस्था संपुष्ठात येईल, अशी आशा दीर्घकाळ वाटत होती. परंतु, अजूनही शेतकर्याचे मुलभूत प्रश्न तसेच आहेत, या मध्ये शेतकरी संघटना आणि शेतकरी नेते कुठे कमी पडले? हा एका वेगळ्या चर्चेचा मुदा होऊ शकेल. मात्र, संघटनातील विसंवाद याला काहीअंशी कारणीभूत राहिला, हे सत्य नाकारता येणार नाही. प्रश्न एकच मात्र त्यावरील मागण्या आणि उपाय यात एकमत नसल्याने गादीवर बसलेल्या सत्ताधाऱ्यांचे फावले... त्यांनाही कायम फोडा आणि तोंडाचे राजकारण करून शेतकरी चळवळीचे खच्चीकरण करण्याचे राजकारण केले. त्यातच शेतकरी चळवळीला फुटीचा शाप लागला असल्याने संघटनांच्या शक्तीचे विकेंद्रीकरण झाल्याचे दिसून येते. ८० च्या दशकात दिवंगत शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केल्यानंतरशेतकऱ्यांचेही प्रश्न आहेत हे खऱ्या अर्थाने जनतेसमोर आले. जोशी यांनी नुसता शेतीच्या प्रश्नावर आवाज उठविला नाही तर त्यांनी या प्रश्नांचे विवेंचंन करून त्यावर उपाय सुचविले. शरद जोशी यांनी मांडलेली शेतकरी समाजाची अर्थशास्त्रीय परिभाषा सर्वकाळ श्रेष्ठ राहिली यात दुमत नाही. मात्र सत्तेचा स्पर्श होताच किरकोळ मतभेदांमुळे जोशी यांची संघटनेची शखले पडली २००२ मध्ये राजू शेट्टी यांनी वेगळे होत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. फुटीचा हा शाप इथंच संपला नाही २०१४ मध्ये पंजाबराव पाटील व त्यांच्या सहकार्यांनी स्वाभिमानीपासून फारकत घेत बळीराजा शेतकरी संघटना काढली. २०१७ मधेही या इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती झाली आणि रयत क्रांती संघटनेचा जन्म झाला. शेतकरी चळवळीच्या काहींनी सत्तेसोबत राहून प्रश्न सोडविण्याचा मार्ग स्वीकारला तर रविकांत तुपकर सारख्या कार्यकर्त्यांनी मंत्रिपदाची उबदार झूल फेकून देऊन पुन्हा चळवळीला आपले सर्वस्व अर्पण केले. काहीही असले तरी चळवळ सुरु राहिली पाहिजे या उद्देशासाठी झपाटलेल्या काही शेतकरी नेत्यांनी पुढाकार घेत शेतकरी आंदोलनाला यावेळी देशव्यापी स्वरूप दिले आहे, हि बाब उल्लेखनीयच म्हणावी लागेल. आखिल भारतीय किसान संघर्ष समिती आणि देशभरातील १८० संघटनांचे हे एकीकरण सरकारवर दाबावगट निर्माण करण्याची एक नांदी आहे, अशी अशा आता नव्याने निर्माण होऊ लागली आहे. गेल्या काही काळापासून देशभरातील शेतकऱ्यांनी सातत्याने कर्जमाफी आणि हमीभाव या दोन प्रमुख मागण्या लावून धरल्या आहेत. याशिवाय, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ आदी मुद्द्यांवरून रणकंदन सुरु आहे. इतिहासात पहिल्यांदाच राज्यातील शेतकऱयांना संप करावा लागला. हमीभावाचा मुद्दा अजूनही धूळखात पडून आहे. सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या ५० टक्के अधिक नफा देऊ, असं आश्वासन भाजपने दिलं होतं. मात्र त्याची अद्यापही पूर्तता झालेली नाही. सरकार वेळोवेळी शब्द फिरवत असल्याने आणि मध्यप्रदेशच्या मंदसौर येथे शेतकरी आंदोलनावर गोळीबार करून सरकारने शेतकऱ्यांचा संताप वाढविल्याने यावरीधात किसान संघर्ष समितीने १० हजार किलोमीटरची पदयात्रा काढली. तिच्या समारोपाच्या अनुषंगाने हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. आजवर विविध संघटनांच्या मागण्या आणि उपाय वेगवेगळे असायचे मात्र यावेळी हमीभावाला केंद्रस्थानी ठेवून तमाम शेतकरी संघटना एकवटल्याचे दिसतेय. चळवळीसाठी हा चांगला संदेश असून या एकीकराला कायम ठेवण्यासाठी भविष्यात प्रयत्न करावे लागतील. आजची व्यवस्था इतकी सडलेली आहे की छोटया-मोठया सुधारणांच्या मलमपट्टयांनी भागणार नाही. शेकडो वर्षापसून शेतीत असलेली लुटीची व्यवस्था नस्तेनाबूत करण्यासाठी नव्याने संकल्पना मांडाव्या लागतील. अर्थात, हे एक दोन वर्षाचे काम नाही तर यासाठीही बराच अवधी लागणार आहे. आणि महत्तवाचे म्हणजे यासाठी लागेल ती सरकारची इच्छशक्ती.. हीच इछशक्ती निर्माण करण्यासाठी शेतकरी संघटनाच नाही तर संपूर्ण शेतकरी समाजाचं एकीकरण करून ते टिकवावं लागेल. कर्जमाफी, अनुदान या योजना नाही म्हटल्या तरी मालमपट्टीच आहे. जोपर्यंत शेतकरी त्याच्या शेती उत्पादनावर कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत शेती व्यवस्था सुधारणार नाही. यासाठी शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे. त्यामुळे शेती आणि शेतकरी जागविण्यासाठीची काही ठळक सूत्रे अमलात आणावी लागतील. शेतकरी संघटनांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचा केलेला संकल्प या परिवर्तनासाठी पूरक ठरू शकतो. परंतु या परिवर्तनाच्या प्रक्रियेतील लोकसहभागासाठी देखील प्रयत्न झाले पाहिजे. शेतकरी नेत्यांनी राजकारण करावं, कि समाजकारण? सत्तेत राहून प्रश्न सोडवावे कि चळवळीत राहून ? हे प्रश्न तितके महत्तवाचे नाहीत. व्यथा आणि वेदना शब्दात व्यक्त करता येणार नाही अशी अवस्था आज शेतकरी समाजाची झाली आहे. जो या समाजाच्या न्यायहक्कासाठी संघटितपणे झटत असेल, त्याच्यामागे शेतकरी समाजाने आपलं पाठबळ उभं करणे महत्वपूर्ण ठरेल..!!! -अँड. हरिदास उंबरकर बुलडाणा

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 27380 views

💬 प्रतिसाद (64)
अ
अँड. हरिदास उंबरकर Tue, 11/28/2017 - 04:51 नवीन
यंदा बीटी कापसावर गुलाबी बोंडअळीच्या किडीने आक्रमण केले आहे. कापसाच्या लागवडीसाठी केलेला खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. बोंडअळीच्या रोगाने कापसाच्या उभ्या शेतावर नांगर चालवून शेतकऱ्यांना पिक काढून टाकाव लागत आहे..बीटी कापसाचे बियाणेच या बोंडअळीचा प्रतिकार करण्यास सक्षम नसल्याचे आता सांगण्यात येत आहे.. बर हां रोग यावर्षीच् आला नाही तर यागोदारही याची लागण झालेली आहे.. त्यामुळे, बोंडअळीला अटकाव करण्याच्या दृष्टीने सुधारित वाण किंवा अन्य उपाययोजना करण्यात यायला हव्या होत्या. पण त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले.. आज त्याचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Tue, 11/28/2017 - 09:29 नवीन
हरिदासजी कापूस एकाधिकार खरेदी योजना २०१३ साली संपुष्टात आल्याचे वाचले होते .. अजून योजना सुरु आहे ?
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Tue, 11/28/2017 - 09:29 नवीन
हरिदासजी कापूस एकाधिकार खरेदी योजना २०१३ साली संपुष्टात आल्याचे वाचले होते .. अजून योजना सुरु आहे ?
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 11/28/2017 - 20:27 नवीन
अतिशय माहितीपूर्ण धागा. शेतीबद्दल वर्तमानपत्रातून जे वाचतो त्यापेक्षा कितीतरी उपयुक्त माहिती मिळाली. दोन प्रश्न इथल्या महितगारांसाठी: १. शेतीतील फंड मॅनेजमेंट हा काय प्रकार आहे? कुणी थोडक्यात समजावून देईल का? २. अवकाळी पावसाने पीक बुडू नये म्हणून पाऊस कधी येईल / थांबेल हे प्रेडिक्शन करणारी काही मॉडॅल्स नसतात का? आता सगळीकडॅ कॉम्प्यूटर्स आलेत. ते वापरून मॉडॅल्स चालवून ती माहिती शेतकर्यांपर्यंत टीव्ही/रेडिओद्वारे पोचवता येणार नाही का? पाश्चात्य देशांत अशी प्रत्येक दिवशी माहिती लोकल रेडिओ/ टीव्ही स्टेशन्सवरून दिली जाते. उदा. आज दुपारी दोन ते सात पाऊस पडेल. जी बर्‍यापैकी अचूक असते (+/- ३० मिनिटे). अशी काही सोय प्रत्येक जिल्हा लेव्हलवर उपलब्ध होऊ शकणार नाही का? (पडणार्‍या पावसाबाबत काय उपाय योजायचे हा पुढला प्रश्न पण तो कधी पडणार हे जरी माहिती झालं तरी शेतकरी निश्चित काहीतरी उपाय शोधून काढतील.... अज्ञतेबद्दल क्षमायाचना.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 11/29/2017 - 07:46 नवीन
<<<१. शेतीतील फंड मॅनेजमेंट हा काय प्रकार आहे? कुणी थोडक्यात समजावून देईल का?>>> ==>> मोडक्या तोडक्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतो. हजारो कंपन्या त्यांचे हिशोब ठेवण्याकरिता मोठं मोठाले प्याकेज देऊन चार्टर्ड अकाउंटंट्स, कॉस्ट अकाउंटंट्स आणि इतर अकाउंटंट्स नेमतात. यांचे काम फक्त वैधानिक पालन (Statutory Compliance ) एवढेच नसून सिनियर मॅनॅजमेण्टला वेळो वेळी निर्णय घेण्याकरीत उपयुक्त लेखा आणि खर्चाबाबत माहिती पुरवणे हे सुद्धा असते. या माहितीच्या आधारे मॅनॅजमेण्ट यशस्वी निर्णय घेऊ शकते. हे तर सर्व सर्वसृत आहे. तसेच शेतीला व्यवसाय म्हणून आपण गणले तर शेतकऱ्यांजवळ सुद्धा अशा प्रकारची हिस्टोरिकल कॉस्ट बद्दलची माहिती भविष्यातील निर्णय घेण्याकरिता उपलब्ध असली पाहिजे. शेतकऱ्यांना जमा खर्च आणि ताळेबंद जर कोणी मांडून समजावून सांगितले तर ते किती पाण्यात आहेत हे समजेल. हवेच्या दिशेवर, वातावरणातील उष्णतेवरून, सूर्याच्या किरणांवरून हवामानाचा जवळपास अंदाज लावू शकणारा शेतकरी ह्या लेखा माहितीतून भविष्यातील आर्थिक अंदाज लावण्यात सक्षम होईल असा विश्वास आहे. मी जे अकाउंटिंग अँप सांगितले आहे हे फक्त सूचक आहेत. अशा प्रकारचे आणखी डीटेल्ड अँप प्लेयस्टोर उपलब्ध असतील. पण शेतकऱ्यांनी जमा खर्चाची नोंद करण्याची सवय लावून घेत सातत्य राखले तर कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आर्थिक दृष्ट्या किती पाण्यात आहात याचा अंदाज येईल. शेतकऱ्याने नेहमी conservatism principle पाळले तर तिकडे वादळ येऊ देत, गारपीट होऊ देत, भाव पडू देत नाहीतर रोग पडू देत सतत हाताचे राखून ठेवले जाऊ शकते. आंधळी आणि ऐकीव माहितीच्या आधारे जोखीम उचलण्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या डेटाबेसच्या आधार घेऊन घेतलेला निर्णय कधीही फायदेशीर होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 11/29/2017 - 18:19 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद विशुमीतजी. तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. शेती हा देखील शेवटी एक धंदा आहे. त्यामुळे शेतकर्यांना आपल्या शेतीचा जमाखर्च, ताळेबंद आणि बाजारपेठ यांची माहिती/ज्ञान असणं अतिशय आवश्यक आहे. जसं उत्तम स्वयंपाक करू शकणारी व्यक्ती यशस्वी रेस्टॉरंट चालवू शकेलच असं नाही, त्याप्रमाणेच हे देखील आहे.
  • Log in or register to post comments
अ
अँड. हरिदास उंबरकर Wed, 11/29/2017 - 04:52 नवीन
पिवळा डांबिस यांच्यासाठी.. *फंड मॅनेजमेंट* बाबत *विशुमित* जी यांनी सखोल माहिती दिली आहे.. त्यासाठी लागणारे ऍप्स ही त्यानी सांगितले आहे.. आपन उपस्थित केलेला दूसरा मुद्दा आवश्यक तितकाच चर्चा करन्यासरखा आहे... इंडियन मट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ज्याला आपण वेधशाळा म्हणतो, ही गेल्या 137 वर्षांपासून हवामानाचा अंदाज वर्तविण्याच काम करतेय. काळानुसार या संस्थेत सातत्यानं बदल घडवून आणल्या गेले, नवनवीन यंत्रणासाठी कोट्यावधीचा खर्च करून तिला नेहमी अद्ययावत करण्यात आले मात्र तरीही हवामानखात्याचे अंदाज सपशेल चुकतात.. परदेशात हवामानाचा अचूक अंदाज सांगणाऱ्या संस्था आहेत. त्यामुळे त्यांना नैसर्गिक आपत्तीची वेळेआधी माहिती मिळते आणि त्यावर उपाययोजना करायाला वेळ मिळतो. भारतातही अशी यंत्रणा उभी राहिल्यास त्याचा मोठा लाभ देशातील शेतकऱयांना होऊ शकेल.. आज संपूर्ण देशात शेती सुधारणेचा विषय ऐरणीवर आला आहे. आधुनिक तंत्रज्ञाने शेती करावी असा सल्ला देणारेही कमी नाहीत. मात्र ज्या अंदाजावर शेतीचे गणित अवलंबून असते त्याबाबत दुर्दैवाने कुणी काहीच बोलत नाही. पावसाचा अचूक अंदाज जर शेतकऱयांना समजला तर शेतीतील बरेचशे नुकसान टाळत येऊ शकेल. मान्सूनच्या अचूक आगमनावर शेतकर्याना पेरण्या करता येतील. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीठ याचाही अंदाज शेतकर्याना समजला पाहिजे. त्यासाठी अचूक हवामान अंदाज वर्तवणारी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. नुसती यंत्रणा उभारून चालणार नाही तर तिची उपलब्धता वेळोवेळी तपासली गेली पाहिजे. अतिवृष्टीचा इशारा असो की वातावरणातील उष्मा, नागरिकांना हवामानविषयक अधिकृत आण‌ि अचूक माहिती मोबाइलवर मिळावी अशी व्यवस्था उपलब्ध करणे गरजेचे आहे. आज हवामानविषयक माहिती देणारे अनेक अॅप्स मोबाईलवर उपलब्ध असले तरी त्यातून मिळणाऱ्या माह‌ितीच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह असते. विशेषतः पावसाळ्यात अनेकांना पुढील २४ तासांच्या पूर्वानुमानापेक्षा येत्या चार ते सहा तासांत आपल्या शहराचे हवामान कसे असेल हे जाणून घेण्यात अधिक रस असतो. ही सर्व माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवणारी विश्वासहार्य यंत्रणा कार्यन्वित करणे गरजेचे बनले आहे. अर्थात हवामानाचा अंदाज वर्तविणे साधेसोपे काम मुळीच नाही. मान्सूनचा अंदाज वर्तवण्यासाठी अनेक निकष पाहिले जातात. हे निकष अत्यंत किचकट तसेच गुंतागुंतीचे असतात. तापमान, हवेचा दाब, वाऱ्याची दिशा आदी अनेक बाबींच्या अभ्यासाअंती हवामनाचा अंदाज ठारविला जातो.. आजच्या आधुनिक युगात हे अश्यक्या नक्कीच नाही..
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 11/29/2017 - 08:02 नवीन
मागे एका धाग्यावर डॅशबोर्डबाबत मी लिहले होते. त्या अनुषंगाने प्रत्येक गावच्या ग्रामपंचायती समोर शेर मार्केट मध्ये जसा डॅश बोर्ड लावला जातो तसा शेतीविषयक माहितीसाठी डिजिटल डॅशबोर्ड लावणे आवश्यक आहे. जेणेकरून लोकांमध्ये चर्चा होऊन उपयुक्त निर्णय घेतले जाऊ शकतील. पारावरच्या गप्पाना शेतीच्या डॅशबोर्डचा नवीन विषय मिळाला तर मंथनातून चांगली वाईट रत्ने बाहेर पडतील. मोबाईल वर येणाऱ्या माहितीची एवढा परिणाम गाव पातळीवरती होणार नाही. या डॅशबोर्ड मध्ये हवामानाचा अंदाजाव्यतिरिक्त देश विदेश,राज्य आणि जिल्हास्तरीय शेतमालाचे उत्पादन, आवक, मागणी आणि दर रोजच्या रोज झळकले पाहिजे. त्याच बरोबर केंद्र आणि राज्य सरकारांनी शेतीविषयक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कोण कोणते निर्णय घेतले याबाबत सोप्या शब्दांमध्ये टॅगलाईन दिसल्या पाहिजेत.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 11/29/2017 - 18:47 नवीन
हरिदासजी, तुमच्या वर लिहिलेल्या विस्तृत माहितीशी मी सहमत आहे. हे सगळं व्हायला हवं हे मान्य, पण ते का होत नाही हा माझा प्रश्न (तुम्हाला नव्हे, इन जनरल) आहे. उदा. अद्ययावत यंत्रणा देऊनही हवामान खात्याचे अंदाज का सपशेल चुकतात? "कुलाबा वेधशाळा म्हणे पावसाच्या सरी आणि सांताक्रूझ म्हणे आकाश निरभ्र" हा पुलंचा साठीच्या दशकातला विनोद अजूनही का खरा वाट्तो? मी अमेरिकेत रहात असलो तरी मी रहात असलेला जिल्हा हा शेतीप्रधान आहे. मोसंबी, लिंबू, स्ट्रॉबेरी, द्राक्षं, अ‍ॅव्होकॅडो ही मुख्य पिकं. इथे पाच लोकल चॅनल्स आहेत (तीन वायुतरंगावर आणि दोन केबल), सगळ्याचे अंदाज जवळपास सारखे असतात. पुन्हा लोकल चॅनलना परवडतं म्हणजे हे तंत्रज्ञान फार महागही नसावं. मग आपल्याकडे ते का होऊ नये? महाराष्ट्रातली शेती गरीब असेल तर जिथे तो अडथळा नाही त्या पंजाब/ हरियाणामध्ये तरी ती सोय आहे का? आणि असल्यास आपल्याकडल्या प्रगतीशील शेतकर्‍यांना ते सुरू करता येणार नाही का? टीव्ही सोडा पण साधं एखादं एफेम रेडिओ स्टॅशन तरी? मी आरामखुर्चीत बसून फुकट सल्ले देण्याचा प्रयत्न खरोखरीच करत नाहिये. तर समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. चूक भूल द्यावी घ्यावी...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 11/29/2017 - 11:28 नवीन
अनेक जण सांगतात की शेतीत गुंतवणूक वाढली पाहिजे. शेतीत गुंतवणूक करायची म्हणजे नक्की कोणी व कशात गुंतवणूक करायची? ज्यांच्याकडे शेती नाही किंवा नव्हती त्यांना शेतजमीन विकत घेता येत नाही. म्हणजे अशी माणसे शेतीत गुंतवणूक करू शकतील का?
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 11/29/2017 - 12:00 नवीन
याबाबत माझ्या डोक्यात काही विचारचक्र चालू आहे. प्रतिक्रिया विस्कळीत असेल. कृपया कॅलॅरिटी साठी मदत करा. ज्यांच्याकडे शेती नाही किंवा नव्हती त्यांना शेतजमीन विकत घेता येत नाही, हा मुद्दा कायदेशीर प्रक्रियेचा भाग असल्याकारणाने तूर्तास बाजूला ठेऊ. आमच्याकडे गुंतवणूक करण्याचा एक प्रकार चालू आहे (नक्की शब्द आठवत नाही). फिरस्ती मेंढी/शेळी पालन करणारा समाज (मुख्यतः धनगर समाज) याला आपण मेंढ्या किंवा शेळी किंवा त्याची पिल्ले खरेदीसाठी पैसे द्यायचे. मग तो त्या शेळ्यामेंढ्याना संभाळत राहतो. त्या शेळ्यामेंढ्यापासून पुढे होणाऱ्या प्रत्येक येतानुसार जेवढी पिल्ले होतील तेवढी अर्धी अर्धी वाटून घेतली जातात. शेळ्यामेंढ्यांच दूध आणि लोकर संभाळणाऱ्याचे. नर पिल्ले असतील तर पैसे पुरवठादार त्याला विकू शकतो आणि जर मादी असेल तर ते चक्र पुढे तसेच चालू ठेऊ शकतो. रोगराई मुळे शेळ्यामेंढ्या दगावल्यातर त्याला सुद्धा काहीतरी तरतूद असते. आता नक्की संपूर्ण माहिती नाही. अशा प्रकारे गुंतवणूक करून एफ डी भिशी पेक्षा चांगले रिटर्न्स लोक मिळवतात असे ऐकून आहे. शेतकऱ्यांना सर्वात जास्त गरज वेळेवर फंड्स मिळण्याची असते. कष्ट तर तो करतच असतो. याच धर्तीवर शेतकऱ्यांना जर बाहेरून फंडिंग पुरवले आणि नगदी पिके घेतली तर शेतकऱ्यांबरोबर पत पुरवठादाराला सुद्धा चांगला फायदा होऊ शकतो. दोन्ही पार्टीनी जोखीम व्यवस्थापनाची बाजू नीट सांभाळली तर यश मिळू शकेल असे वाटते. लिखान विस्कळीत आहे, कृपया आशय समजून घ्या.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 11/29/2017 - 12:59 नवीन
विशुमित यांचे सारेच प्रतिसाद आवडले. उंबरकरांचा हवामान अंदाजाबाबतचा प्रतिसाददेखिल आवडला. पिडांकाका,
https://www.economist.com/blogs/economist-explains/2016/06/economist-explains-16 http://www.business-standard.com/article/economy-policy/has-india-s-met-dept-failed-us-111071300041_1.html http://www.thehindu.com/opinion/op-ed/reading-the-rain-is-like-science-fiction/article3683360.ece http://www.hindustantimes.com/editorials/india-has-failed-to-make-the-most-of-the-monsoon/story-2zXYK2LHHRuA2SkC8434lO.html https://thewire.in/180850/imd-weather-prediction-forecast-monsoons-drought-agrometeorology-kharif/ सगळ्यात महत्वाची लिंक https://www.quora.com/Indian-Meteorological-Department-IMD-Why-is-the-weather-forecast-in-India-so-inaccurate-when-compared-to-other-countries-like-USA
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Wed, 11/29/2017 - 13:36 नवीन
अशा प्रकारची गुंतवणूक उल्हासनगरचे सिंधी मुरबाड, शहापूर भागातील गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतीत करतात असं ऐकून आहे. अशा शेतकऱ्यांकडील पूर्ण शेतमाल (भात) कमी दरात विकत घेवून राईस मिलमध्ये सडून बाजारात तांदुळाची विक्री करून भरपूर नफा कमावतात. अर्थात अशा व्यवहारात कायदेशीर अडचणी येऊ शकतात. उदा. प्राप्तीकर (गुंतवणूकदारास ). विषय निघालाच आहे तर एक शंका विचारून घेतो. कधीकाळी शेतकरी असलेल्या एखाद्या व्यक्तीची कुळ कायद्यामुळे सगळी शेती गेली असल्यास ती व्यक्ती किंवा तीचे वारसदार कायदेशीरपणे शेतकरी राहू शकतात की नाही? किंवा एखाद्या शेतकऱ्याने आपली संपूर्ण शेती विकल्यास तो कायदेशीरपणे शेतकरी राहू शकतो का?
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 11/30/2017 - 10:23 नवीन
उत्तम चर्चा सुरू आहे. वाचतोय.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 6 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा