Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

Making of photo and status : ७. गोलुमोलु

स
सचिन काळे
Sun, 11/19/2017 - 04:05
💬 9 प्रतिसाद
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी. http://www.misalpav.com/node/41232 काय ? कसं काय ? ठिक आहे ना ? येता का सोबतीला ? जाऊ आपलं सावकाश रांगत रांगत जोडीने नाक्यापर्यंत, दुध आणायला. टाकू हो एखादी चक्कर, टकाटक !!! Making of photo and status : कार्टून चित्रांमध्ये मला सर्वात जास्त आवडलेल्या चित्रांपैकी हे एक आहे. पहाताक्षणीच ह्या रांगणाऱ्या बाळाच्या मी प्रेमात पडलो होतो. बघा ना, आपल्याकडे पाहून कित्ती गोड हसतंय ते. त्याचं स्माईल बघा कसं ह्या कानापासून त्या कानापर्यंत पसरलंय. त्याच्या वाटोळ्या टकलावर उभा असलेला एकुलता एक कुरळा केस पाहिलात का? cute ना!! अगदी जवळ जवळ आलेले इवलेसे त्याचे दोन डोळे आणि भुवया किती खट्याळपणाचा भाव दर्शविताहेत. आणि छोटुकले कान तर त्याच्या गोलमटोल चेहऱ्यावर अगदी शोभून दिसताहेत. चित्रात अगदी त्याच्या कंबरेला बांधलेल्या लंगोटीची गाठसुद्धा दिसून येतेय. त्याचा गोल चेहरा आणि गुबगुबीत हातपाय पाहून मी त्याचे नांव काय ठेवलंय माहितेय का? गोलुमोलू! हा! हा!! हा!! हा खट्याळ आणि गुबगुबीत गोलुमोलू मला एवढा आवडला की मला त्याच्यावर काहीतरी स्टेटस लिहावेसे वाटू लागले. गोलुमोलुकडे पाहिल्यावर असं वाटतंय की तो आपल्याशी काहीतरी बोलू पहातोय. हो की नाही!!!? आणि म्हणून मी त्याने आपल्याशी साधलेल्या संवादाचेच स्टेटस लिहायचे ठरवले. माझ्या मनात विचार आला की आपण गोलुमोलुच्या तोंडी मोठ्याव्यक्तींच्या बोलण्याचा टच देऊन पाहिला तर किती मज्जा येईल!! आता पहा! गोलुमोलु आपल्याकडे पहातोय, आपण सुद्धा त्याच्याकडे पहातोय, त्याबरोबर आपले आपसात पहिले बोलणे काय असेल? बरोबर!! आपण एकमेकांना अभिवादन करू. होय ना!!? इथे तर गोलुमोलुच पुढाकार घेऊन विचारतो, "काय ? कसं काय ? ठिक आहे ना ? " हा! हा!! हा!! आता गोलुमोलू पुढे काय म्हणतोय पहा! "येता का सोबतीला?" गोलुमोलु आपल्याला सोबत चलण्याचं आमंत्रण देतोय. आणि ते पण कसं? तर "जाऊ आपलं सावकाश रांगत रांगत जोडीने नाक्यापर्यंत" आपल्या गोलुमोलुला चालता येत नाही, म्हणून तो म्हणतोय, जाऊ सावकाश रांगत रांगत." आणि ते पण कसं? तर जोडीनं!! म्हणजे तो आपल्यालाही जोडीनं नाक्यापर्यंत रांगत रांगत सोबत चलण्याचं आमंत्रण देतोय. आणि नाक्यावर जाऊन आणायचं काय? तर दूध!! गोलुमोलुचं फेवरेट!! वर आपल्यालाच तो सांगतोय, "टाकू हो एखादी चक्कर, टकाटक !!!" बघा ना! आपला गोलुमोलु कसा मोठ्या माणसांसारखा 'टकाटक' म्हणतोय. तर असा आहे आपला लब्बाsssड गोलुमोलु. आवडला ना तुम्हाला? मग!!?.... जाताय ना गोलुमोलुच्या सोबतीने रांगत रांगत जोडीनं नाक्यापर्यंत? दूध आणायला हो!!! टकाटक!! हा! हा!! हा!! --- सचिन काळे. माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2475 views

💬 प्रतिसाद (9)
स
सचिन काळे Sun, 11/19/2017 - 10:23 नवीन
@ स्पा, पुन्हा एक दणकुन जिलबी टाकलीय. या चाखायला! हा! हा!! हा!!
  • Log in or register to post comments
ब
बाजीप्रभू Sun, 11/19/2017 - 19:02 नवीन
गोलुमोलु थोडा मोठा होऊ द्यात मग जातो त्याच्या सोबतीने हलत-डुलत नाक्यापर्यंत? बाटली आणायला हो!!! टकाटक!! हा! हा!! हा!!
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sun, 11/19/2017 - 19:16 नवीन
येता बाटलीचा परिमळू झिंगला गो गोळूमाळू मी म्हणे सचिनाळू फोटो आला गे मीपे.
  • Log in or register to post comments
स
सचिन काळे Mon, 11/20/2017 - 02:55 नवीन
@ चामुंडराय, फारच सुंदर रचना केलीय आपण. आवडली!
  • Log in or register to post comments
स
सचिन काळे Mon, 11/20/2017 - 02:25 नवीन
@ बाजीप्रभू, मग जातो त्याच्या सोबतीने हलत-डुलत नाक्यापर्यंत? बाटली आणायला हो!!! >>> हा! हा!! हा!! लई भारी!!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Mon, 11/20/2017 - 07:15 नवीन
...हा आपल्या लिखाणाचा ट्रेडमार्क होतोय असं नाही वाटत?
  • Log in or register to post comments
स
सचिन काळे Mon, 11/20/2017 - 07:40 नवीन
@ अनन्त_ यात्री, ...हा आपल्या लिखाणाचा ट्रेडमार्क होतोय असं नाही वाटत? >>> अरे खरंच की!!! हा! हा!! हा!!!
  • Log in or register to post comments
स
सचिन काळे Mon, 11/20/2017 - 07:46 नवीन
गंमतच आहे नाही!!? यापुढे माझं नांव घेताना लोकं बोलतील "सचिन काळे म्हणजे ओ तेच हो! हा! हा!! हा!! वाले!!" हा! हा!! हा!!
  • Log in or register to post comments
स
सचिन काळे Wed, 11/22/2017 - 16:44 नवीन
काही जणांना लेखातील फोटो दिसत नाही म्हणून मी खाली पुन्हा तो फोटो टाकत आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा