Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

||संत ज्ञानेश्वर ||

व — वैभवदातार, Fri, 11/17/2017 - 06:30
काल संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी दिवस होता . त्याचे निमित्त साधून मी खालील कविता केली होती ज्ञानियांचे राजे तुम्ही संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर आळंदीचा स्वर्ग करूनी दाविला आम्हां ईश्वर ||धृ|| पिता विठ्ठलपंत कुलकर्णी संन्यास धर्म आचरती ज्ञानदेव सोपान मुक्ताई आणि थोरले पुत्र निवृत्ती ||१ || बाळपणी माता पिता हरपले होती चार भावंडे अनाथ जगी तारण्या तूंचि विठ्ठला तूंचि असे श्री गुरुनाथ ||३ || ब्रह्मवृंदांनी शोषण करिता दूर पळाली सर्व सुखे वेद शास्त्र संपन्न पंडित ऐकती वेद रेड्यामुखे ||४|| हठयोगी चांगदेव महाराज लवाजम्यासह येती दर्शनास ज्ञानदेव चालवीती निर्जीव भिंत सृष्टी वरील सत्ता येई प्रत्ययास ||५|| पंचमहाभूतांवरी तुमचे असे प्रभुत्व पंचाग्नी तप्त करिती शरीर ज्ञानोबा मांडे भाजता मुक्ताई त्यावरी पाय धरण्यासी आले खेचर विसोबा ||६|| अमृताहुनी रसाळ मराठी प्राकृत लिहीले स्वये गीतेचे सार भावार्थदीपिका ज्ञानेश्वरी ही पारायण करिता होई आत्मोद्धार ||७|| आजि असे संजीवन समाधी दिन दर्शन घेण्या जमले भक्त वारकरी जन अखंडानंदात न्हाती वर्षतो अमृताचा घन ज्ञानेशाला वैभव करतो वंदन ||८|| --शब्दांकित (वैभव दातार ) १६ नोव्हेंबर २०१७

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 821 views

💬 प्रतिसाद
स
सूड Fri, 11/17/2017 - 14:19 नवीन
आले इक्षुदण्ड बोर्डी भय दाटतसे फार काव्य कोणते घेऊनि आले वैभव दातार ॥
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 1 hour ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 1 hour ago
  • सुंदर !!
    3 days 1 hour ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 1 hour ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा