Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

लोक स्वतःला सुंदर का समजतात?????

स
सिंथेटिक जिनियस
Tue, 11/14/2017 - 12:25
🗣 11 प्रतिसाद
लोक स्वतःला सुंदर का समजतात हा प्रश्न मला अनेक दिवसापासून पडला आहे. अग्दी कालपरवापर्यंत मी ही स्वतःला फार छान समजत होतो ,पण प्रत्यक्षात आपण दिसायला ॲवरेजही नाही हे लक्षात आले.इंटरनेटवर एक ॲप आहे ,त्यावर मी माझा फोटो अपलोड करुन ॲनालीसिस केल्यावर मी सुंदर तर सोडाच पण अगली (कुरुप) आहे असा त्या ॲपचा रिझल्ट होता जो मला आधीच माहीत होता. स्वतःला सुंदर समजण्यात महीला आघाडीवर असतात .प्रत्येकीला वाटत असतं की आपण बर्फी आहोत.प्रत्यक्षात अशा मुली व महीला दिसायला ॲवरेजच असतात.पण नखरा असा असतो की साला दिपिका करीनाला कॉम्प्लेक्स देतील. पुरुषही यात मागे नाहीत शीट कलर्ड स्कीन,सुटलेले पोट,केसांनी पुकारलेला असहकार असे असुनही वावर मात्र मिलिंद सोमन किंवा जॉन अब्राहम सारखा असतो. खरच,का समजत असावेत लोक स्वतःला सुंदर??????

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3494 views

🗣 चर्चा (11)
म
मराठी कथालेखक Tue, 11/14/2017 - 12:56 नवीन
लोक स्वतःला लेखक का समजतात हा प्रश्न मला अनेक दिवसापासून पडला आहे. अग्दी कालपरवापर्यंत मी ही स्वतःला फार चांगला लेखक समजत होतो ,पण प्रत्यक्षात आपण लिहायला ॲवरेजही नाही हे लक्षात आले.इंटरनेटवर एक ॲप आहे ,त्यावर मी माझा लेख अपलोड करुन ॲनालीसिस केल्यावर मी चांगले तर सोडाच पण जंक(बकवास) लिहितो आहे असा त्या ॲपचा रिझल्ट होता जो मला आधीच माहीत होता. स्वतःला लेखक समजण्यात मिपाकर आघाडीवर असतात .प्रत्येकाला वाटत असतं की आपण फाडू लेखक आहोत.प्रत्यक्षात असे लेखक व कवी लिहायला ॲवरेजच असतात.पण जिलब्या अशा टाकतात की साला पुलं , वपूना कॉम्प्लेक्स देतील. काथ्याकूट वाले यात मागे नाहीत.. पांचट जिलब्या ,फसलेले विडंबन ,कल्पनाशक्तीने पुकारलेला असहकार असे असुनही वावर मात्र रामदास किंवा रातराणी सारखा असतो. खरच,का समजत असावेत लोक स्वतःला लेखक??????
  • Log in or register to post comments
स
सरल मान Tue, 11/14/2017 - 13:26 नवीन
जाऊ द्यात ना! ते synthetic genius अहेत, original genius नव्हे!
  • Log in or register to post comments
स
सरल मान Tue, 11/14/2017 - 13:26 नवीन
जाऊ द्यात ना! ते synthetic genius अहेत, original genius नव्हे!
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 11/14/2017 - 13:48 नवीन
वरच्या लिस्टमध्ये एक सुटलेलं पोट वगळता मला नाही वाटत बाकीच्या गोष्टींसाठी व्यक्ती स्वत: जबाबदार असतील.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Wed, 11/15/2017 - 05:49 नवीन
अस कसं अस कसं, ते म्हणताय ना मग ते असेलच
  • Log in or register to post comments
न
निरंजन._. गुरुवार, 11/16/2017 - 06:40 नवीन
लोकं सतत तुमची टर उडवतात, घालून पाडून बोलतात, तरीही तुम्हाला असलं लिखाण करण्याचा उत्साह कसा राहतो??
  • Log in or register to post comments
M
mayu4u गुरुवार, 11/16/2017 - 08:49 नवीन
हा आयडी का बॅन झाला असावा?
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 11/16/2017 - 09:30 नवीन
माहित नाही, आम्ही स्वतःला सुंदर समजतोच पण लेकिला,लेकाला, मित्राला सर्वांना जे जे निर्व्याज प्रेमळ आणि मनाने निष्कपट आहेत त्या सगळ्यांना सुंदर समजतोय
गोस्वामी तुलसीदास ने रामचरित मानस में लिखा है: ' मन मलीन तन सुंदर कैसे। विष रस भरे कनक घट जैसे।। ' बहुत गहरी बात है। यदि मन में मलिनता हो तो भला तन की सुंदरता किस काम की ? क्योंकि वह शरीर तो विष भरे स्वर्ण कलश के समान होगा
यावर विश्वास असलेला अंधश्रध्दाळू नाखु
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 11/16/2017 - 10:37 नवीन
लोक स्वतःला सुंदर का समजतात-- अंधविश्वास.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 11/16/2017 - 10:38 नवीन
लोक स्वतःला सुंदर का समजतात-- अंधविश्वास. आता हेच पहा ना. तुम्ही स्वतःला जिनियस समजता.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 11/16/2017 - 10:51 नवीन
चालायचचं. आपणच आपली लाल नाही केली तर दुसर्‍यांना काय पडलय ?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 8 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 9 hours ago
  • सुंदर !!
    3 days 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा