Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

#एकादशी #

स — सतिश गावडे, Tue, 11/14/2017 - 07:52
तू उभा विटेवर तुझे हात कमरेवर आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला तू उभा विटेवर तुझे हात कमरेवर आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला तारी भवसागरी करी मज मोकळा देई तुझ्या रे चरणी तू ठाव मला झालो चिंब भक्तीत मीपणा नुरला माझा देह हा चंदनाचा रे झाला नामाचा गोडवा माझ्या ओठी आला पामर रे तुझा हा भक्ती रस प्याला पाहूनी राधेसी तुझिया रे अंकावरी होई रुकमाई रे कावरी बावरी झाले सहन न तिला आली दिंडीरवनाला देवा आला तू पाठी समजूत घालण्याला पाहूनी झोपडी रे चंद्रभागेतीरी देवा क्षण दोन क्षण तू थबकला देवा क्षण दोन क्षण तू थबकला आतून वीट फेकली पुंडलीक बोलला तू थांब मातापित्याची सेवा करु दे मला तू थांब मातापित्याची सेवा करु दे मला तू उभा विटेवर तुझे हात कमरेवर आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला लोटली युगे अठ्ठावीस किती काळ गेला विठू तू न विटेवरूनी रे हलला विठू तू न विटेवरूनी रे हलला येती दर्शनाला भक्त भेटायाला आषाढी आणि कार्तिकीच्या रे वारीला आषाढी आणि कार्तिकीच्या रे वारीला तू उभा विटेवर तुझे हात कमरेवर आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला तू उभा विटेवर तुझे हात कमरेवर आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला --यमकांकित (सतीश गावडे ) १४ नोव्हेंबर २०१७

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6748 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Tue, 11/14/2017 - 08:12 नवीन
आजच्या कार्तिकी एकादशीच्या सुमुहूर्थावर समयोचित कविता. 'मेरे रशके कमर' च्या चालीवर म्हणून पाहिली, परफेक्ट जुळतं.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 11/14/2017 - 08:13 नवीन
लय भारी बे !! नुसरत फतेह अली खाँ साहेबांनी अजरामर केलेल्या 'मेरे रश्के कमर'च्या चालीवर म्हणून पाह्यलं आणि पर्फेक्ट जमलं. =))
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Tue, 11/14/2017 - 08:23 नवीन
छान छान! आता आज वेगळे आळंदीला जायला नको!
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 11/14/2017 - 08:50 नवीन
कविता असेल तर चांगली आहे. विडंबन असेल तर फालतू आहे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 11/14/2017 - 09:14 नवीन
भक्ती भाव उतरले आहेत घरकोंबडा वारकरी नाखु
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 11/14/2017 - 09:51 नवीन
वाह!!
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 11/14/2017 - 13:51 नवीन
प्रेरणादायी कवितांपेक्षा बरंच उच्च प्रतीचं आहे.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Wed, 11/15/2017 - 06:40 नवीन
आधी हॅश टॅग बघून पोटात गोळा उठला, म्हटले ईक्षुदंड नाहीत म्हणजे कवीवर्यांनी ट्रॅक बदलला कि काय? ;-) पण तुमची कविता खरच छान आहे.
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 11/15/2017 - 06:45 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 11/15/2017 - 13:04 नवीन
सखूवाला धन्या आणी नवा स. गा. दोण्ही उ तरलेत काव्यात! ;)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 1 hour ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 1 hour ago
  • सुंदर !!
    3 days 1 hour ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 1 hour ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा