दमण - एक धावती भेट
*** *** *** *** ***
कंजूस
यांचे सर्व लेखन इथे पाहा
*** *** *** *** ***
वापी हे शहर मुंबईस जवळ असणाय्रा गुजरातमधल्या इतर सुरत,वलसाड,नवसारीप्रमाणेच औद्योगिक शहर ही ओळख बाळगून आहे. पण त्याची आणखी एक ओळख म्हणजे पश्चिमेकडे असणारे दमण, पुर्वेकडचे असणारे दादरा नगरहवेली या केंद्रशासीत भागांसाठी जवळचे रेल्वे स्टेशन. त्र्यंबकेश्वरच्या थोड्या पुर्वेकडच्या डोंगरांतून उगम पाऊन पश्चिमेकडे वाहात जाणारी दमणगंगा नदी समुद्राला मिळते ते दमण. या भागाचे समुद्री महत्व ओळखून सोळाव्या शतकापासून पोर्तुगिज लोकांनी इथे येऊन व्यापारानिमित्त किल्ला बांधला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर दमणचे महत्त्व एका वेगळ्याच कारणासाठी वाढले. तर पुर्वेकडच्या दादरा नगरहवेलीत पर्यटनाचा व्यवसाय हॅाटेलवाल्यांनी वाढवला. सिल्वास,खानवेल हे ते भाग. दमणगंगेवर झालेल्या मोठ्या मधुबन तलावाने पाण्याची सोय झाली. दादरा इथले वनगंगा गार्डन ( वापी - दादरा १२ किमि) बोटिंगमुळे पर्यटकांचे आकर्षण आहे.पंधरा वर्षांपुर्वी बोर्डी, दादरा,खानवेल,सिल्वास हे भाग फिरलो होतो. त्यावेळी रेल्वेतल्या प्रवाशांनी माहिती दिली तसे गेलो. "दमणला जाऊ नका तिथे तुमच्या कामाचे काही नाही" हा सल्ला मानून दमण वगळले होते. आता दमणची जुनी प्रसिद्धी ( दारु पिण्यासाठीची) अशी काही विशेष उरली नाही त्यामुळे चला दमणला काय आहे हे एक दिवसात पाहू म्हणून गेलो. कसे जावे दमण मुंबई अहमदाबाद वेएवे रस्त्याने वापीला (१६० किमि) डावीकडे वळल्यास दहा किमिवर दमण आहे. जाताना पोलुशन फार वाटले तरी दमणला अजिबात नाही. वेस्टर्न रेल्वेच्या सर्वच गाड्या वापीला थांबतात. स्टेशनच्या पश्चिमेस टॅक्सी,ओटोरिक्षा आणि बसेस दमणला (१० किमि.) तर पुर्वेच्या दादरा,नगरहवेली ,खानवेलसाठी. वापी बस स्टँड पश्चिमेला पाचसे मिटर्सवर आहे. नदीच्या उत्तर भागाला 'नानी दमण' - फक्त दमण म्हणतात. इथून एका पुलाने दक्षिणेकडचे 'मोटी दमण' ( याच नावाने ओळखतात) जोडले आहे. एक वेगळा पादचारी पूल आहे. दमण स्टँडवरून जांपोरे बीच (६ किमि )जाण्यासाठी बस ,ओटो मिळतात. दोन किमिवर फोर्ट आहे, पण स्टँडवरून अर्धा तासात पुलावरून चालतही जाता येते. कसे जावे दादरा, नगरहवेली हे भाग वापीच्या पुर्वेस/आग्नेय दिशेस आहेत. सिल्वास - वापीअगोदरच्या भिलाड स्टेशनपासून उजवीकडे १८ किमि. खानवेल याहीपुढे. वापी - सिल्वास २४. काय पाहावे दमण स्टँडपासून दमण जेट्टी/ दरिया पाचशे मिटर्स अंतरावर आहे. उत्तरेस ६ किमिवर देवका बीच, मिरासोल वाटरपार्क आहे. दक्षिणेस पुल ओलांडल्यावर अर्धा किमीवर फोर्ट मोटी दमण भागात आहे. किल्ल्याच्या भिंती चांगल्या स्थितीत आहेत. याच भागात सचिवालय,परगोला गार्डन,नगरपालिका इमारत,दोन चर्चेस जवळच आहेत. एन्ट्री फी नाही. फक्त सकाळी साडेसहाला एक मास/सर्विस असते. दिवसभरात कुणी येत नाही चर्चमध्ये. इमारती पाहात फोर्टात रस्त्याने फिरायला मजा वाटते. स्वच्छता आणि शांतता आहे. पाच किमिच्या जांपोरे बीचला गेलो होतो. इथले बीच काळपट वाळूचे आहेत. चांगले नाहीत. दमण दरियावर "बीच टॅाइलेटसाठी वापरू नका" ही पाटी दिसली. जांपोरे किनाय्राला सुरुची झाडे आहेत, खाण्याच्या टपय्रा आहेत. देवका बीचला गेलो नव्हतो. दमणमध्येच एरपॅार्ट आहे. मोटी दमण भाग टापटीप आहे. राहाणे हॅाटेल्स, खाणे सर्व हॅाटेल्स दमण स्टँड ते दरिया या रस्त्यावर आहेत. बार आणि रेस्टॅारंट्स बरेच आहेत पण ते खरेतर बारच असावेत. दुपारचे वातावरण अर्थातच सुस्त होते. दमण - धावती फेरीमधली काही चित्रे. खालील फोटो गायब झाल्याने हे टाकत आहे. १ ) सचिवालय इमारत

२ ) शाळा

३ ) शाळेतल्या मुलांच्या सायकली

४ ) परगोला गार्डन

५ ) बॅाम जेझस चर्चमध्ये

६ ) किल्ल्यातला एक रस्ता.

७ ) किल्ल्यातला एक रस्ता.

८ ) पादचारी नवीन पुलावरून पश्चिमेकडे दिसणारे दमणगंगा नदीचे मुख, उजवीकडे दमण( नानी दमण), डावीकडे मोटी दमण आणि जेट्टी.

१ ) अहमदाबाद हायवेने १६०~ किमि वापी - पश्चिमेस दहा किमि दमण आहे.
२ ) दमण ते जांपोरे बीच पाच किमि.
३ ) दमण बीच
४ ) जांपोरे बीच
५ ) मोटी दमण किल्ला, दक्षिण दरवाजा
६ ) दमण नगरपालिका इमारत
७ ) बॅाम जेझस चर्चमधला एक सज्जा
८ ) रोझारिओ चर्चमधला एक सज्जा
९ ) सचिवालय इमारत
१० ) शाळा
११ ) शाळेतल्या मुलांच्या सायकली
१२ ) टेक्निकल स्कूल प्रवेशद्वार
१३ ) परगोला गार्डन
१४ ) किल्ला, नदीकडचा उत्तरेचा दरवाजा.
१५ ) किल्ला, नदीकडचा उत्तरेचा दरवाजा.
१६ ) किल्ल्यातला एक रस्ता.
१७ ) पादचारी नवीन पुलावरून पुर्वेकडचा दिसणारा दमणगंगा नदीवरचा वाहनांसाठीचा राजीव गांधी सेतू.
१८ ) पादचारी नवीन पुलावरून पश्चिमेकडे दिसणारे दमणगंगा नदीचे मुख, उजवीकडे दमण( नानी दमण), डावीकडे मोटी दमण आणि जेट्टी.
माहितीसाठी--
१९ ) रोझारियो फरशीवरील नोंद
२० ) रोझारियो चर्च पाटी
२१ ) बॅाम जिझस चर्च पाटी
तुम्हाला काही आणखी माहिती असेल तर द्या.

११ ) शाळेतल्या मुलांच्या सायकलीसयकली मुलींच्या असाव्यात...Photo १
पाटी. प्रवेश ..
सूचना
१. फक्त मोबाईल कॅमेरा फोटोग्राफी करता येते. फी नाही. मोठे कॅमेरे, गोप्रो, नेता येणार नाही.
२. खाद्य वस्तू असलेली बॅग आत नेता येत नाही. गेटवर ठेवता येते.
३. प्रवेश फी तिकिट रु १०० आहे. फक्त ओनलाईन पेमेंट घेतात.
Photo २
.माहितीचित्रे
Photo ३
.प्रवेशद्वार
Photo ४
.मकाव पोपट दक्षिण अमेरिका
Photo ५
.गोल्डन फेजंट,चीन
वापीला उतरल्यावर पश्चिमेला नानीदमणला(११किमी) जाणारा रस्ता आहे. तिथून दमणगंगानदी ओलांडून गेल्यावर मोटीदमण आणि पुढे सहा किमीवर दक्षिणेकडे जांपोरे किनारा लागतो. तिथेच बाजुला हे चिडियाघर/Aviary आहे.
कसे जावे ...
मुंबई ते वापी बऱ्याच रेल्वे आहेत आणि वापीला काही थांबतात.
१.वापी स्टेशन ते नानी दमण बस स्टँडला शेअर रिक्षा मिळतात पन्नास रुपये सीट. बस चौदा रु तिकिट आहे पण तो स्टँड स्टेशनपासून एक किलोमिटरवर आहे.
२. नानी दमण बस स्टँडला दर पंधरा मिनिटांनी एसी बस जांपोरे बीचला जातात. दहा रु तिकिट. सकाळ संध्याकाळी असतात, दुपारी कमी. ओटो रिक्षा १२० रु
३. वापी स्टेशन ते थेट जांपोरे बीच ओटो रिक्षा रुपये पाचशे घेतात.
४. जांपोरे बीचला खाण्याचे रेस्टारंट्स नाहीत. बीच काळा आहे. बरेच प्रवासी मुंबई ते गुजरात कारने जातात तेव्हा इकडे एक चक्कर मारतात. त्यामुळे त्यांना रेस्टॉरंटची गरज लागत नाही. पार्किंग दिलेले आहे.
५. दमणला प्रथम इकडे जावे ( दुपारी बंद असते, सोमवारी बंद). नंतर येताना वाटेत मोठी दमण किल्ला पाहून नदी पुलावरून नानी दमण किल्ला पाहावा. नंतर परत.
६. देवका बीच आणि मिरासोल गार्डन या दोन जागा नानी दमणच्या उत्तरेला सहा किमीवर आहेत. संध्याकाळी जाण्यासाठी योग्य आहे. सकाळी जाऊ नका.