Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

सनी दिवानी, आबा बंगाली आणि सदा' या कथेतील एक अंश.

ब
बोबो
Tue, 11/07/2017 - 08:21
💬 4 प्रतिसाद
"चला तर सदाशेठ. तुम्हाला अजिबात ताटकळत न ठेवता लवकरात लवकर तुमची इच्छा मी पूर्ण करून टाकतो." आपल्या छातीचे ठोके जोरजोरात पडताहेत हे सदाला जाणवलं. सनी दिवानी - मादक सौंदर्याचा ऍटमबॉम्ब, मदनिका, पूर्वाश्रमीची मादकपटांची नायिका व आताची चित्रपट अभिनेत्री.  सनी दिवानी, जिने संपूर्ण जगभरातील तरुणांची हृदयं आणि जिच्या मादक व्हिडीओजनी त्यांच्या मोबाईलमधली मेमरी आणि कॉप्युटर्समधली हार्ड डिस्क व्यापली होती, ती सनी दिवानी.  तिला भेटण्याच्या कल्पनेने सदाची अशी अवस्था झाली होती, त्यात नवल ते काय? जादूगाराने सदाला पुरुषभर उंचीच्या बंदिस्त अशा एका लाकडी खोक्याजवळ नेलं. त्याचा दरवाजा उघडून त्याने सदाला आत जायला सांगितलं. जादूगाराने डोळे मिटले आणि तो मंत्र पुटपुटणार एवढ्यात सदाने दरवाजा उघडला आणि त्याला अडवलं. "जादूगारसाहेब मंत्र व्यवस्थित म्हणा. नाहीतर सनी दिवानीऐवजी मी सनी देवल नामक मल्ल अभिनेत्याच्या बाहुपाशात जाऊन पोहोचायचो." *********** यंदाच्या आवाज दिवाळी अंकातील 'सनी दिवानी, आबा बंगाली आणि सदा' या माझ्या कथेतील एक अंश.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3111 views

💬 प्रतिसाद (4)
प
प्रचेतस Tue, 11/07/2017 - 09:07 नवीन
टाकायची असेल तर पूर्ण कथा टाका नपेक्षा ह्याला जाहिरातीपलीकडे जास्त महत्व नसेल.
  • Log in or register to post comments
ब
बोबो Tue, 11/07/2017 - 09:35 नवीन
प्रचेतस - नुकतीच प्रकाशित झालेली असल्याने ही पूर्ण कथा एवढयात नाही टाकता येणार. त्या ऐवजी दुसरी पूर्ण कथा टाकेन.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 11/07/2017 - 09:23 नवीन
अंश कसला साहेब, अगदीच अणू रेणू एवढा भाग टाकला आहे. यंदा आवाज वाचायला मिळाला नाही. दिवाळी फटाक्यांविनाच गेली म्हणायची !
  • Log in or register to post comments
ब
बोबो Tue, 11/07/2017 - 09:42 नवीन
धर्मराजमुटकेसाहेब - दुसरी पूर्ण कथा टाकता काही वेळाने. मलासुद्धा मी मुंबईत नसल्याने आवाजच काय, कुठलाच दिवाळी अंक अजून प्रत्यक्ष पाहायला मिळाला नाहीय. :-(
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 3 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा