Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

नेणिवेला जाणिवेने छेदता...

अ — अनन्त्_यात्री, Sun, 11/05/2017 - 13:41
नेणिवेला जाणिवेने छेदता जे उरतसे ते पुरे समजून घेणे कधिच का सोपे नसे? या क्षणी ते स्तंभ भासे, शूर्प ते पुढच्या क्षणी पाहू मी गजरूप कैसे, नेत्र माझे झाकुनी कोणी त्या म्हणतात माया; वास्तवाचा विभ्रम कोणी त्या म्हणती अविद्या; सर्जनोद्भव संभ्रम वास्तवाचे रूप कैसे? कोण जाणे सर्वथा? ज्ञेय-ज्ञाता भेद फिटता शेष आदिम शांतता

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1793 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 11/06/2017 - 10:20 नवीन
"ज्ञेय-ज्ञाता भेद फिटता शेष आदिम शांतता" हे कळाते पण वळत नाही, मग उगाच पाण्यावर काठी मारुन पाणी दुभंगवयचा प्रयत्न करत बसतो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Mon, 11/06/2017 - 10:38 नवीन
परमेश्वर
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 11/06/2017 - 13:50 नवीन
सुरेख. किती सुंदर शब्द वापरलेत.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 11/07/2017 - 11:16 नवीन
तुमचा हा प्रतिसाद, क्लिष्ट अध्यात्मिक संकल्पना तुम्हाला सुलभतेने समजातात हेच सिद्ध करतो. तर आपल्याला आवडलेल्या या काव्यातील कठीण शब्द आणि संकल्पनांचे अर्थ आणि जमल्यास रसग्रहण देऊ शक्ल्यास वाचणे आवडेल.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 11/08/2017 - 04:07 नवीन
:) आजकाल असे शब्द कोण वापरतं? वाचताना खरंच ज्ञानेश्वर कालीन वाटलं. प्रसन्न वाटलं.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Tue, 11/07/2017 - 10:57 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 1 hour ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 1 hour ago
  • सुंदर !!
    3 days 1 hour ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 1 hour ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा