Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

Making of photo and status : ५. गगनभरारी!

स
सचिन काळे
Sun, 11/05/2017 - 04:15
💬 22 प्रतिसाद
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी. http://www.misalpav.com/node/41232 तु नि:शंकपणे गगनात भरारी घे पिल्ला. घाबरू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत..... गोव्याच्या समुद्रकिनार्यावर पॅरासेलींगचा आनंद लुटताना तरुणी. Making of photo and status : हा फोटो मी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर काढला होता. फोटोमध्ये आकाशात उंचावर पॅराशूटला लटकलेली दिसते ती माझी मुलगी आहे. खरं तर एका फोटोत सर्व गोष्टींचा अंतर्भाव व्हावा म्हणून मी तो थोडा एडिट केला आहे. डावीकडे समुदकिनारा आणि वाळूवर रमलेली माणसं, उजवीकडे अथांग समुद्र, वरती निळेभोर आकाश आणि त्यावर तरंगणारे कापसासारखे दिसणारे पांढरे ढग. आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर दिसणारे पॅराशूट हा मूळ फोटो आहे. त्यामध्ये पॅराग्लायडिंगकरीता सुरक्षिततेची साधने मुलीच्या शरीराला बांधतानाचा दुसरा फोटो इन्सर्ट केला आहे. आणि मग मुलगी आकाशात किती उंचावर गेलेली आहे, हे सांगायला बाण वगैरे दाखवण्याचे त्यावर संस्कार केले आहेत. पॅराशूटने माझी मुलगी आकाशात अंदाजे पंधरा माळेतरी उंचावर गेली होती. एकुलती एक असूनसुद्धा, धोका पत्करून आम्ही तिला उंच आकाशात विहारण्याचा आनंद लुटण्यास प्रोत्साहन दिले. त्यावरून मला वरील स्टेटस बनवावेसे वाटले, की माझ्या मुली! तू तुझ्या आयुष्यात मोठे होण्याकरिता कितीही मोठे धोके पत्कर. नवीन नवीन आव्हाने स्वीकार. मग भलेही त्यात अपयश आले तरी बेहत्तर, आम्ही आईबाप कायम तुझ्या पाठीशी उभे असणार आहोत याची आम्ही तुला खात्री देतो. --- सचिन काळे. माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5337 views

💬 प्रतिसाद (22)
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 11/05/2017 - 06:24 नवीन
फोटो छान आहे.
  • Log in or register to post comments
स
सचिन काळे Sun, 11/05/2017 - 07:31 नवीन
@ अमरेंद्र बाहुबली, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 11/05/2017 - 07:16 नवीन
मिपाकरांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.;)
  • Log in or register to post comments
स
सचिन काळे Sun, 11/05/2017 - 07:33 नवीन
@ प्राची अश्विनी, हो! मीसुद्धा!!! :स्मित:
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Sun, 11/05/2017 - 10:56 नवीन
छळताय असे???
  • Log in or register to post comments
स
सचिन काळे Sun, 11/05/2017 - 11:39 नवीन
@ दिपक.कुवेत, का? छळताय असे??? >>> माझा असा काही उद्देश नाही हो!!! माफी असावी.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Sun, 11/05/2017 - 13:54 नवीन
आय मीन असे छान छान फोटो टाकून आणि त्याचं स्टेटस देउन का छळताय असे म्हणायचं आहे......
  • Log in or register to post comments
स
सचिन काळे Sun, 11/05/2017 - 14:23 नवीन
@ दिपक.कुवेत, मला माफ करा, माझा गैरसमज झाला म्हणून तसा प्रतिसाद दिला. माझ्या मालिकेचे कौतुक केल्याबद्दल आपले फार फार आभार.
  • Log in or register to post comments
ब
बाजीप्रभू Sun, 11/05/2017 - 11:00 नवीन
आयुष्यात मोठे होण्याकरिता कितीही मोठे धोके पत्कर. नवीन नवीन आव्हाने स्वीकार. मग भलेही त्यात अपयश आले तरी बेहत्तर, आम्ही आईबाप कायम तुझ्या पाठीशी उभे असणार आहोत
छान अभिमान वाटला तुमचा... आता परत पुढल्या रविवारची वाट पाहाणं आलं. :-(
  • Log in or register to post comments
स
सचिन काळे Sun, 11/05/2017 - 11:34 नवीन
@ बाजीप्रभू, धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
आ
आवडाबाई Sun, 11/05/2017 - 11:51 नवीन
फोटो आवडला . मयुरीची भरारी ! स्टेटस आधी चालीत म्हणण्याचा प्रयत्न केला, मग गद्य आहे हे लक्षात आले. :-) picture-in-picture पण आवडले. येउ द्या अजून
  • Log in or register to post comments
स
सचिन काळे Sun, 11/05/2017 - 16:46 नवीन
@ आवडाबाई, आपण देत असलेल्या प्रोत्साहनाकरिता मी आपला अत्यंत आभारी आहे.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 11/05/2017 - 12:16 नवीन
धोका पत्करून आपल्या ह्रदयावर दगड ठेवून एकुलत्या एक मुलीच्या पंखाना बळ देण्याचे आपण जे धाडस दाखवलंत त्याला माझा मनःपूर्वक सलाम. तुमच्या स्टेटसची एक आठवडाभर वाट पाहणे हा माझ्यासारख्या चाहत्यावरील अन्याय आहे. तरी आपण या स्टेटसला रविवारी सकाळी 9 वाजता असा मुहूर्त न ठेवता आपल्या सौंदर्यदृष्टीला जे नजरेस पडेल, आपल्याला ज्यावर भाष्य करावेसे तेव्हा ते लगेच करा अशी माझी नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 11/05/2017 - 15:01 नवीन
मीही तेच सांगितलं मागच्या भागात पण काळे साहेब आम्हा गरिबांच्या विनंतीला मान देणार नाहीत.
  • Log in or register to post comments
स
सचिन काळे Sun, 11/05/2017 - 17:11 नवीन
:स्मित:
  • Log in or register to post comments
स
सचिन काळे Sun, 11/05/2017 - 17:04 नवीन
@ सतिश गावडेजी, मुलीच्या पंखाना बळ देण्याचे आपण जे धाडस दाखवलंत >>> धन्यवाद! आपल्या सौंदर्यदृष्टीला जे नजरेस पडेल, आपल्याला ज्यावर भाष्य करावेसे तेव्हा ते लगेच करा >>> जरूर सर!!! प्रोत्साहन देण्याकरिता आपले आभार. :स्मित:
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Mon, 11/06/2017 - 10:42 नवीन
+१ . सहमत . असेच वेगवेगळ्या विषयांवरील कल्पक फोटो येउ देत .
  • Log in or register to post comments
स
सचिन काळे Mon, 11/06/2017 - 13:36 नवीन
@ सिरुसेरी, प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार!
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 11/06/2017 - 11:50 नवीन
आयुष्यात मोठे होण्याकरिता कितीही मोठे धोके पत्कर. नवीन नवीन आव्हाने स्वीकार. मग भलेही त्यात अपयश आले तरी बेहत्तर, आम्ही आईबाप कायम तुझ्या पाठीशी उभे असणार आहोत हे आवडले.
  • Log in or register to post comments
स
सचिन काळे Mon, 11/06/2017 - 13:37 नवीन
@ जागु, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
M
mr.pandit गुरुवार, 11/09/2017 - 03:30 नवीन
स्टेटस् आणि फोटो
  • Log in or register to post comments
स
सचिन काळे गुरुवार, 11/09/2017 - 05:20 नवीन
@ mr.pandit, धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा