Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

विकासाच्या गोष्टी. .

V
vcdatrange
गुरुवार, 11/02/2017 - 09:36
💬 3 प्रतिसाद
मोखाड्यातलं एकदम दरीतला पाडा ' आमले ' गाव. जंगलात वसलेलं. वाड्याहुन खोडाळ्याकडे जाणार्‍या बाजुला हमरस्ता सोडुन दरीत उतरायचं. इनमिन ६५ कुटुंब. गावाशेजारुन वाहणार्‍या नदीमुळे पावसाळ्यातला चार महिने बाहेरच्या जगाशी संपर्क नाही अशी अवस्था होती, अगदी मागच्या वर्षापर्यंत. आता नदीवर लोखंडी पुल टाकलाय चालत जाण्यासाठी. गावात अजुनही महावितरण पोहोचलेले नाही. abc एका बहुराष्ट्रीय कंपनीने सीएसआर च्या माध्यमातुन राबवलेल्या विकास प्रकल्पांच्या viability Plan आखण्यासाठी ही भेट होती. सोलार युनिटच्या माध्यमातुन घरगुती वापर आणि पाण्याच्या मोटार बसवल्याय. चेक डॅमने पाणी अडवलयं. दुबार तिबार पिकांना सुरुवात झालीय. मधमाशी पालन, फुलशेतीतुन मोगरा, भाजीपाला असे नगदी पिक जवळ वाडा पर्यंत जातायेत. backyard poultries, community kitchen gardens असे छोटे छोटे उपक्रम प्रभावी अन् चिरकालीन बदलाचे संकेत दाखवतायेत. इतकी वर्ष जगाला अज्ञात असलेल्या पाड्यावर आताशी विकासाची नजर गेलीय. कुणी आजारी पडलं की डोली करुन रस्त्यापर्यंत उचलुन अन् मग पुढे खोडाळा असा प्रवास. महिन्याच्या तिसर्या बुधवारी नर्स ताइ लसिकरणासाठी येते. शौचालयांची अवस्था मात्र शोचनीय आहे. १२ ह्जार रुपये प्रती शौचालय या हिशोबाने ३० घरात अनुदानाचे शौचालय वापराविना पडुन आहेत. एकाने त्यात शेळ्या बान्धल्यायेत. वनहक्क वगैरे मात्र अजुन कागदावरचं बरं का . . .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1963 views

💬 प्रतिसाद (3)
ज
जानु गुरुवार, 11/02/2017 - 17:53 नवीन
आताशीच विकास जन्मला म्हणावा. तसे पालघर जिल्हा हगणदारी मुक्त झाला असे जिल्हाधिकारी यांनी जाहिर केल्याचे वाचले.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 11/03/2017 - 04:44 नवीन
थोडे अजून लिहिले आणि काही फोटो टाकले असते तर चांगले झाले असते. या गावाची कहाणी वाचकांपुढे आणल्याबद्दल धन्यवाद. या निमित्ताने सरकारचं लक्ष जाईल अशी क्षीण अपेक्षा.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Fri, 11/03/2017 - 11:14 नवीन
थोडी अजुन माहिती हवी होती . लेख अचानक संपल्यसारखा वाटला .
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा