Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

फूड प्रोसेसर

अ
अविनाशकुलकर्णी
Sat, 10/28/2017 - 16:47
🗣 8 प्रतिसाद
.. फूड प्रोसेसर घेण्याचा निर्णय आत्मघातकी ठरतो का? १७६० अट्याचमेंट्स असलेला मर्फी रिचर्ड चा फूड प्रोसेसर घेतला.. आटा मळणे..भाज्या कापणे चकत्या करणे ..ज्यूस काढणे..मिल्क शेक.आदी विविध ब्लेड्स व भांडी असलेल्या अट्याचमेंट्स ह्या फूड प्रोसेसर ला आहेत.. मुळात हल्ली परिवार ३-४ माणसांचा.. त्या साठी कापणे मळणे आदी क्रिया हाताने करणे परवडते.. कणीक छान मळली जाते पण ..त्या साठी तो पॉट लावा नंतर विसळा आदी कामे म्हणजे फुकटचा व्याप होऊन बसतो.. ताक दही आदी रवी नी काढले जाते १०-१५ दिवसातून एकदा.. मोठा जार पण वापरात नाही... एकुण काय तो महागडा प्रोसेसर केवळ दाण्याचा कूट.. वा चटण्या या साठीच वापरला जातो बाकीच्या सा-या अट्याचमेंट्स धूळ खात कपाटात पडतात... शेवटा काय? फूड प्रोसेसर नव्याचे ९ दिवस फूड प्रोसेसर असतो..मात्र तो अनंत काळचा मिक्सर बनून रहातो

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3418 views

🗣 चर्चा (8)
१
१.५ शहाणा Sun, 10/29/2017 - 06:47 नवीन
फूड प्रोसेसर नव्याचे ९ दिवस फूड प्रोसेसर असतो..मात्र तो अनंत काळाची अडचण होऊन जाते. तसेच टोस्टर , रोटि मेकर ,ओवेन चे होते.
  • Log in or register to post comments
अ
असंका Sun, 10/29/2017 - 07:18 नवीन
सोयी घरात हव्यात. कधीपण वापरता याव्यात म्हणून. सोय आहे म्हणून वापरायलाच हवी असं थोडंच असतं? पूर्ण वापर आपण कसचाच करत नाही. आजुबाजुला बघितलंत तर अशाच गोष्टी जास्त दिसतील. फोन, टीवी, म्युझिक सिस्टीम, फर्निचर, इ. इ....
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Sun, 10/29/2017 - 20:48 नवीन
मिक्सर + पीठ मळणे यापलिकडे फूड प्रोसेसरचा वापर होत नाही हे मान्य !!
  • Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ Mon, 10/30/2017 - 09:52 नवीन
आमच्या सौ.च्या आज्ञेवरून आमच्या घरीदेखील २ महिन्यांपूर्वी मर्फी रिचर्ड च्या फूड प्रोसेसरचे आगमन झाले. सध्या तरी दाण्याचं कूट, चटणी, भिजवलेली डाळ वाटणे आणि ज्यूस यापलीकडे मजल गेली नाही. कणिक मळण्यासाठी आपले हाथच योग्य आहेत. बाकी मोसंबीचा ज्यूस मस्त काढता येतो(सुरुवातीला १-२ वेळा ते भांडे लावण्यात तारेवरची कसरत करावी लागली होती...हे वेगळे). पण निर्णय आत्मघातकी वगैरे काही नाही...एवढंच कि आपली गैरसोय होऊ नये..म्हणून आपण सगळ्या सोयी वापरत नाहीत :P
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 10/30/2017 - 09:57 नवीन
वॅक्युम क्लीनरची देखील हीच अवस्था होते.
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 10/30/2017 - 11:50 नवीन
खरंच का?
  • Log in or register to post comments
I
II श्रीमंत पेशवे II Tue, 10/31/2017 - 05:13 नवीन
मुळात आपल्या वाड वडिलांपासून / पणजी , आजी पासून ज्या गोष्टी पाहत अथवा करत आलोय त्याच मनाला पटतात छोट्याशा घरातील केर काढायला हवाय कशाला व्ह्याकुम क्लीनर , तसच फूड प्रोसेसर च आहे ..... जाहिरात पाहून खूप वाटत घ्यावस पण ज्या घरी फावला वेळ खूप आहे शिवाय थोडसं नवीन तंत्रज्ञान शिकण्याची हौस आहे तिथे हा फूड प्रोसेसर खूप मोलाचीन मदत करतो धावपळी च्या आयुष्यात असली वस्तू पूर्ण वापरात आणायला वेळच नसतो त्यामुळे मिक्सर + पीठ मळणे यापलिकडे फूड प्रोसेसरचा वापर होत नाही हे खर आहे एखाद्या दिवशी मूड झाला तर जूस काढायला मजा वाटते , पण ति भांडी व्यवस्थित धुवून ठेवणे हि डोकेदुखी असते. पण माझे फूड प्रोसेसर बद्दल अडगळी ची वस्तू असे मत अजिबात नाही. त्याचा सुयोग्य नियोजनाने छान वापर करता येवू शकतो
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 10/31/2017 - 05:53 नवीन
मी फूड प्रोसेसर मध्ये ज्या जमतील त्या गोष्टी करतो उदा. कांदा बारीक चिरून हवा आहे पाव भाजी साठी.काकडीचे काप काढून हवे आहेत. फळांचा रस काढायला ती अतिशय बारीक चिरून हवी आहेत. ( मी बहुसंख्य फळांचा रस त्यात फळांचे अगदी तुकडे राहतील अशा रीतीने काढतो) यानंतर तो शांतपणे मोलकरणीला धुवायला टाकतो. स्वयंपाकघरातील पदार्थ करण्यापेक्षा नंतरची साफसफाई हा सर्वात कंटाळवाणा प्रकार असतो तो सरळ बाईच्या गळ्यात टाका. कारण फूड प्रोसेसर न वापरता फुकट जाण्यापेक्षा वापरून बिघडलेला बरा अशी माझी वृत्ती आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 8 hours ago
  • सुंदर !!
    3 days 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा