Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

इतिहास व्याख्यान - पाक्षिक सभा

म
मनो
Sat, 10/28/2017 - 15:29
💬 10 प्रतिसाद
मी भारत इतिहास संशोधक मंडळात काही गोष्टींविषयी शुक्रवार दि. ०३ नोव्हेंबर २०१७ संध्याकाळी ६.३० वाजता एक व्याख्यान देतो आहे. इतिहासात रस असलेल्या सर्वानी जरूर या, तुमचे स्वागतच आहे. इतर तपशील, विषय, स्थळ इत्यादी ===================== श्री राजा शिवछत्रपती महाराज आणि ज्ञानियांचा राजा श्री ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राचे दोन मानबिंदू. भारत इतिहास संशोधक मंडळातल्या शुक्रवार ०३ नोव्हेंबरच्या पाक्षिक सभेत या दोन्ही विषयी एकत्रित आजपर्यंत अप्रकाशित आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे कागद आणि चित्रे याविषयी श्री मनोज दाणी यांच्या व्याख्यानाचा योग जुळून येत आहे. या सभेत मोगल बादशहा शहाजहान आणि औरंगझेब यांची एकूण चार अस्सल फारसी फर्माने, एक याददाश्त, एक दस्तक यांच्याविषयी श्री दाणी हे बोलतील. या कागदांतून महाराजा जसवंतसिंग यांची शिवाजी महाराजांवरची मोहीम, सरदारांची सैन्यसंख्या, त्यांच्या नेमणुकीची जागा अशी अत्यंत उपयुक्त आणि नवीन शिवचरित्रविषयक माहिती पुढे येत आहे. त्यातील एका फर्मानावर औरंगझेबाच्या स्वतःच्या हस्ताक्षरातील काही ओळी आहेत. महाराजा जसवंतसिंग याची काही चित्रे आणि त्याने रचलेल्या ग्रंथाविषयीही श्री दाणी बोलतील. आपल्या व्याख्यानाच्या दुसऱ्या भागात ते १७६३ साली लिहिलेल्या सचित्र ज्ञानेश्वरीतील निवडक चित्रे दाखवतील. अत्यंत सुंदर अशी ही चित्रे म्हणजे मराठी चित्रकलेचा मोगली सजावटीच्या बाद्शाहनामा आणि इतर सचित्र ग्रंथाच्या तोडीचा, किंबहुना सरस असा उत्कृष्ट नमुना आहेत. इतिहासाचे संशोधक, अभ्यासक आणि इतिहासात रस असणाऱ्या सर्वांसाठी ही एक पर्वणीच आहे, त्यामुळे शक्य असेल त्या सर्वानी या पाक्षिक सभेस जरूर उपस्थित राहावे. सभेची वेळ: शुक्रवार दि. ०३ नोव्हेंबर २०१७ संध्याकाळी ६.३० वाजता स्थळ: भारत इतिहास संशोधक मंडळ भरत नाट्य मंदिराशेजारी, सदाशिव पेठ पुणे =====================

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3326 views

💬 प्रतिसाद (10)
प
प्रचेतस Sat, 10/28/2017 - 15:42 नवीन
जबरी. येण्याचा अवश्य प्रयत्न राहील.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 10/28/2017 - 16:51 नवीन
अरे वा! प्रयत्न करतो येण्याचा.
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Sat, 10/28/2017 - 21:11 नवीन
दोबत Video shooting केलतर बर होईल म्हणजे सगळ्यांना पाहता येईल.
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Sat, 10/28/2017 - 21:11 नवीन
सोबत Video shooting केलतर बर होईल म्हणजे सगळ्यांना पाहता येईल.
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Sat, 10/28/2017 - 21:11 नवीन
सोबत Video shooting केलतर बर होईल म्हणजे सगळ्यांना पाहता येईल.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sun, 10/29/2017 - 06:03 नवीन
तुमच्या व्याखानाचा व्हिडीओची लिंक येथे शेअर करा किंवा किमान एखादे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तरी याच धाग्यावर द्या.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 10/29/2017 - 11:39 नवीन
कुणी कार्यक्रमाचा आढावा लिहा.
  • Log in or register to post comments
म
मनो Sun, 10/29/2017 - 12:19 नवीन
बॅटमॅन येणार आहे त्याला सांगतो - विडिओ जर काढला तर गरज नाही मग.
  • Log in or register to post comments
म
मनो Sun, 10/29/2017 - 12:07 नवीन
विडिओ शूटिंगची सोया मंडळात आहे का पाहतो. नक्कीच कारेन जर जमत असेल तर.
  • Log in or register to post comments
म
मनो Fri, 11/03/2017 - 05:07 नवीन
आज संध्याकाळी ६.३० वाजता सभा सुरु होईल, इतिहासात रस असलेल्या सर्वानी जरूर या.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 1 hour ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा