हे सव्यसाची,
खुणावतील तुला जटिल गणिते-
विश्वाच्या महास्फोटी प्रसववेणांची
हाकारतील तुला कोडी-
* विस्कळखाईत क्षणोकणी होणार्या
विश्वाच्या अटळ अंताची#
या अपार भूतभविष्यादरम्यान
लीलया झेपावणारा तुझ्या प्रज्ञेचा झोका
कुठे खिळवलाय, हे सव्यसाची?
तो इथेय बघ,
निळ्या पाखरपंखावर
अथक थिरकणार्या
क्षणभंगूर वर्तमानात
(*entropic end of the universe#)
💬 प्रतिसाद
प
पुंबा
Mon, 10/23/2017 - 11:05
नवीन
वाह!!!
मस्त!!
सव्यसाची का(कुठला पुराणातला संदर्भ आहे का?)?
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Mon, 10/23/2017 - 12:15
नवीन
- सव्यसाची (= दोन्हीपैकी कोणत्याही हाताने एखादी क्रिया सारख्याच सफाईने करणारा/री) हे धनुर्धर अर्जुनाचे एक नाव होते.
- इथे मात्र हे संबोधन "unusually skillful ,versatile"या अर्थाने उत्तुंग प्रतिभेच्या मानवाला उद्देशून मी वापरलंय.
- Log in or register to post comments