छायाचित्रण स्पर्धा क्र. १८. (रुमाल टाकून ठेवत आहे).
दिवाळी झाल्यावर साधारणतः एक महिन्याने छायाचित्रण स्पर्धेचं पुनरुज्जीवन करावं असा ठराव मांडतो आहे. निदान दोन महिन्यांतून एकदा का होईना, मिपा छायाचित्रण स्पर्धा घेतली जावी असे वाटते.
आत्ता केवळ प्रस्ताव मांडतो आहे. लवकरच सविस्तर रूपरेषा धाग्यात लिहितो.
विषय (खफवर चर्चा झाल्याप्रमाणे) (अजून बदल सुचवा).
१. प्रतिबिंब
२. मॅक्रो फोटोग्राफी
३. मोबाईल कॅमेऱ्याने काढलेले फोटो.
प्रत्येक स्पर्धकाला एका विभागात एकच प्रवेशिका पाठवता येईल. सर्व प्रवेशिका केवळ साहित्य-संपादक आयडीने व्यनिने स्वीकाराव्यात. मतदानाच्या धाग्यात स्पर्धकाचे नाव न देता केवळ प्रवेशिका द्याव्यात. मतदान खुले असावे. मिपाकरांनी नेहमीप्रमाणे एक, दोन व तीन असे क्रमांक प्रत्येक विभागात द्यायचे.
नंतर निकाल जाहीर करताना विजेत्या प्रवेशिका आणि स्पर्धक जाहीर करावेत, तसेच इतर सर्व फोटो व स्पर्धक त्याखाली द्यावेत.
सासं, तुमची मते मांडा.
असा एखादा उपक्रम पूर्ण न करता मध्येच सोडून देणे चुकीचे आहे.अगदी सहमत.मला यातले तीनच फोटो दिसत आहेत. इतरांना दिसत आहेत का?तिथे जीमेल वर बघितले तर दिसत होते फोटो पण येस, इथे टाकल्यावर दिसत नाहीयेत. वॉटरमार्क चाही प्रॉब्लेम आहेच. तिथे मिनियन, आणि स्मृति चाही काही रीप्लाय नाही. बरं आपण फोटो विषयी थोडं एक्ष्प्लेनशन लिहायला सांगितले होते तेही स्पर्धकांनी लिहिले नाहीये. आधीच उशीर झालाय त्यात हे सगळं निस्तर्ण्यात दोन तीन दिवस जाणार. एव्ह्ड सगळं उशिरा करून सुद्धा प्रवेशिका अगदी जेम तेम आहेत. माझा असा प्रस्ताव आहे की आता घोषणा करावी की काही तांत्रीक अडचणीं मुळे फार उशीर होतोय ( आधी एस नी हे धाग्यावर सांगितले आहेच. ) तर आम्ही प्रवेशिका देण्याची मुदत वाढवतोय. आधी ज्यांनी प्रवेशिका दिल्या आहेत त्यांनाही जर त्यांची प्रवेशिका बदलून द्यायची असेल तर द्यावी ( ते फेअर होईल ज्यांनी वेळेवर प्रवेशिका दिल्या आहेत ). असे करून काय होईल की स्पर्धेचा पूअर शो होणार नाही (जो की आता होऊ शकेल इतक्या कमी प्रवेशिकांवर). आपल्यालाही वेळ मिळेल लोकांना विनन्त्या करून प्रवेशिका मिळविण्यासाठी ( जे आपण दिवाळी अंकात केले होते). मला तरी वाटतं फ्रँकली सांगून वेळ वाढवून घेऊ या रादर दॅन की ज्या आहे त्यावरच स्पर्धा घेणे.(वरच्या चर्चेत एसभाऊ आणि पद्मावती सक्रिय सहभागी आहेत - त्या पुढाकार घेऊ शकतील का?)घरी सध्या फ्लू ची आजारपणे चालू आहेत, मी, दोघी मुली, एका मागून एक... :( इच्छा असूनही मला सध्या वेळ देता येणार नाही. आजारपणामुळे रोज मिपा वर लॉग इन करायलाही वेळ मिळत नाहीये. त्यामुळे एस आणि अजुन कोणी प्लीज पुढाकार घ्यावा अशी मी विनंती करते. प्रवेशिका मी इथे टाकल्या आहेतच पण तरीही एकदा व्यनी आणि जीमेल चेक करा जस्ट टू मेक शुअर.ऑन अ ब्रॉडर नोट - सासंमंने एखादा उपक्रम हाती घ्यायचा पण तो पूर्ण करायचा नाही / त्याला भयानक उशीर करायचा हे सासंमंच्या प्रतिमेला तडा देणारं आहे. उपक्रम हाती घेतानाच त्याचे मुख्य शिलेदार कोण हे ठरलं पाहिजे. मागे 'उपक्रम राबवायची चेकलिस्ट' असा काहीसा धागा चावडीवर होता. त्याचा वापर केला तर असे प्रसंग येणार नाहीत.सहमत.