Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

गाण्यांचे शब्द व आमचे मजेशीर शब्द

D
dadabhau
Tue, 10/17/2017 - 13:48
💬 5 प्रतिसाद
माझ्या मराठी शाळेच्या दिवसात म्हणजे बच्चनभौ शिखरावर असतांना (जेव्हा दूरदर्शन आमच्या गावात आलेले नव्हते) हिंदी मराठी गाणी फक्त रेडिओ वर च कानावर पडत ( विविधभारती म्हणजे जीव कि प्राण होता आमचा !!) आमच्या गावाच्या पूर्वेस एक ओपन टाकी ( टॉकीज नव्हे...टाकीच) होती , दर मंगळवारी म्हणजे बाजारच्या दिवशी शिनेमा बदलत असे. नवीन आलेल्या पिच्चर चे पोस्टर हातगाडीवर ठेवून ढोल ताशाच्या गजरात गावभर मिरवत असत. आम्ही मुले त्या गाडीमागे गावभर फिरून त्यांच्या जाहिरातीस हातभार लावत असू. देवीची यात्रा १५ दिवस चाले व आमच्या शाळेस सुट्ट्याच असत. दादा कोंडकेंचे सगळे रेकॉर्डब्रेक पिच्चर यात्रेच्या काळात लागत व तुफान गर्दीत १५ -२० दिवस चालत. आम्ही मुले त्यावेळी फेमस झालेली हिंदी-मराठी गाणी आम्हा मुलांना जशी ऐकू येत तशी जोरजोरात ओरडून म्हणत असू ....( त्यातल्या म्युझिक सह ). रेडिओवर गाण्याच्या शब्दांपेक्षा खरखर च जास्त असे त्यामुळे बोल नीट कळत नसत . काही वर्षांपासून रंगोली मध्ये गाण्याचे बोल ही दाखवायला लागले म्हणून बरीच गाणी clear झालीत. तर काही अजून ही नीट कळत नाहीत . मित्रांनो तुम्हीही लहानपणी अशी काही गाणी नक्कीच शब्द नीट न कळता म्हटली असतील ...काही गाणी उदा. म्हणून खाली देत आहे. १) बाप बन जाये ( हे कायम टॉप ला असते !!). २) विठ्ठला... पूर्वेला शनिमा ...( गावाच्या पूर्वेस टाकी होती तेव्हा ....) - विठ्ठला ... तू वेडा कुंभार ३) आणू नको ताट माझ्या माईला ( माई जेवायचे नाही म्हणतेय..तिला ताट नका आणू!!!) - आनंद पोटात माईना .... ४) एक फेमस ऍड - म्हाताऱ्या म्हाताऱ्या थोडं च खाय...म्हाताऱ्या म्हाताऱ्या थोडं च खाय ... - ओळखली असेलच !! अजून ही अशी बरीच गाणी व जाहिराती आम्ही आमच्या समजुतीप्रमाणे म्हणत असू... खरं तर आजकाल इतकी सुस्पष्ट आवाजाची साधने आलीत तरीही त्या बॉम्बे च्या एका गाण्यातील " दाबड़ दाबड़ ...दाबड़ दाबड़ भ्हेब " ह्या शब्दांचा अर्थ अजून नाही समजला !!!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2279 views

💬 प्रतिसाद (5)
अ
अत्रन्गि पाउस Wed, 10/18/2017 - 07:56 नवीन
च्यायला कित्येक गाणी , त्यातले शब्द मला अशीच ऐकू यायची आणि अजूनही येतात :-D -अजीपता सता है ये ....नमस्तमस सफिनही -माय नेम इज शिना शिना कि जबानी अमृतसर से आयी मै तेरे हात न आई -नभ मेघांनी आक्रमिले हा ब्रम्हे -छोटा गंधर्व आलापी करतांना 'आ SS जा ...किंवा हां SSS जा' असं म्हणतात असं वाटत -धुल्न्द एकाल्न्त हा ... अजून आठवली आणि ऑफिस मधून घरी गेलो कि टाकतो
  • Log in or register to post comments
अ
अनिता Wed, 10/18/2017 - 23:12 नवीन
आरओएफएल :)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 10/19/2017 - 19:22 नवीन
त्या गाण्याचा गायक रेमो फर्नांडिझ आहे, त्याला असे गाण्यात निरर्थक फिलर्स भरायची आणि पॉप सिंगर असलेने बेबे, बेब वगैरे शब्द वापरायची सवय आहे. ते रिदम मध्ये असते आणि ऐकायला छान वाटते.
  • Log in or register to post comments
त
तिमा गुरुवार, 10/19/2017 - 03:53 नवीन
अशी अनेक गाणी आठवून सांगता येतील. पण वानगीदाखल सध्या एकच लिहितो. उधळून येई वळु, जाहली रोमांचित ही तनु. आणि असे ऐकू आल्यामुळे कडव्यांचा अर्थ भलताच वाटायचा. जसे की, 'दवापरि ते सुख टपटपले, ओठांनी या अलगद टिपले....
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 10/19/2017 - 19:09 नवीन
चांद आया है जमी पे "अजगर" भै की रात मे....
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    4 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    4 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    4 days ago
  • सुंदर !!
    4 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    4 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा